Jump to content

सोरेंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोरेंग
भारतातील गाव
देशभारत, सिक्कीमचे राज्य संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीसोरेंग जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानसोरेंग जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक२७°१०′०″N ८८°१२′०″E संपादन
Map

सोरेंग हे सिक्कीम राज्यातील सोरेंग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. २१ डिसेंबर २०२१ रोजी पूर्वीच्या पश्चिम सिक्किममधून सोरेंग हा नवीन जिल्हा म्हणून निर्माण करण्यात आला.[१]

सोरेंग हे संत्री, आले, मोठी वेलची, भाजीपाला आणि फुलांच्या उत्पादनासाठी ओळखले जाते.[२] येथील लोक उपजीविकेसाठी प्रामुख्याने शेती, फलोत्पादन आणि पर्यटनावर अवलंबून आहेत आणि ते बहुतांशी सिक्किमी व नेपाळी आहेत. समुदायातील बहुसंख्य लोक हिंदू आणि बौद्ध धर्माचे पालन करतात, तर उर्वरित लोक ख्रिश्चन आहेत.

सोरेंग सुमारे दार्जिलिंगपासून रस्त्याने ४५ किलोमीटर (२८ मैल) आहे आणि राजधानी गंगटोक पासून १०२ किलोमीटर (६३ मैल) वर आहे. हा प्रदेश एक पर्यावरण-पर्यटन स्थळ असून, दरवर्षी हजारो लोक येथे भेट देतात.

या भागातील प्रमुख आकर्षणे म्हणजे येथील निसर्गरम्य दृश्ये, मत्स्यव्यवसाय, कांचनजंगा पर्वताची दृश्ये, वनस्पती आणि प्राणीजीवन, आणि तीस्ता नदीवरील व्हाईट रिव्हर राफ्टिंग.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "The Sikkim (Re-organization of Districts) Act, 2021" (PDF). Sikkim Government Gazette (367): 2–3. 2026-02-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2026-08-13 रोजी पाहिले.
  2. ↑ "West Sikkim - Executive Summary" (PDF). NABARD - National Bank For Agriculture And Rural Development.