Jump to content

सेनो त्सुहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेनो त्सुहा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
व्यवसायकार्यकर्ता संपादन
पुरस्कारनारी शक्ती पुरस्कार संपादन

सेनो त्सुहा (Seno Tsuhah) या नागालँडमधील 'चिझामी' येथील 'चखेसंग नागा' समुदायातील एक प्राथमिक शिक्षिका आणि स्वदेशी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ईशान्य भारतामध्ये लिंग न्याय आणि शाश्वत शेती या विषयांवरील त्यांच्या कार्यासाठी त्या ओळखल्या जातात. त्या गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ 'नॉर्थ ईस्ट नेटवर्क' (NEN) या स्त्रीवादी संघटनेशी जोडल्या गेल्या आहेत.

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

सेनो त्सुहा या नागालँडमधील चिझामी येथील चाखेसंग नागा समुदायाचा भाग आहेत.[] 'चिझामी स्टुडंट्स युनियन'चा हिस्सा म्हणून त्या सामाजिक कार्यात सहभागी होऊ लागल्या. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या आपल्या मूळ गावी परतल्या आणि शेजारच्या गावातील प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. याच काळात त्या 'चिझामी वुमेन्स सोसायटी'मध्ये (CWS) सामील झाल्या. १९९६ मध्ये फुत्सेरो येथे 'नॉर्थ ईस्ट नेटवर्क'च्या (NEN) एका प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान त्यांची भेट मनीषा बहल यांच्याशी झाली आणि दोन वर्षांनंतर त्या अधिकृतपणे NEN मध्ये सामील झाल्या. तेथे त्यांनी महिला हक्कासाठी कार्यकर्त्या म्हणून काम करण्यास सुरुवात केली.[][] आठ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर, त्सुहा यांनी चिझामी ग्रामपरिषदेला हे पटवून देण्यात यश मिळवले की, अकुशल मजुरीमध्ये महिलांना पुरुषांइतकीच समान मजुरी मिळणे आवश्यक आहे. २०१४ मध्ये, ग्रामपरिषदेने शेतमजूर महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान मजुरी देण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतरच्या वर्षी, परिषदेचे सदस्य म्हणून दोन महिलांची निवड करण्यात आली. अत्यंत पुरुषप्रधान असलेल्या नागा समाजात, महिलांना सक्रिय सदस्य म्हणून स्थान देणाऱ्या मोजक्या ग्रामपरिषदांपैकी चिझामी ग्रामपरिषद एक आहे.[]

स्वदेशी शेती

[संपादन]

त्सुहा या एक स्वदेशी 'अन्न सार्वभौमत्व' कार्यकर्त्या आहेत.[] त्यांनी चिझामी येथे 'नॉर्थ ईस्ट नेटवर्क'चे (NEN) एक केंद्र स्थापन केले, ज्याद्वारे तृणधान्यांच्या १५ विविध वाणांचे संकलन करण्यात आले आहे.[] त्सुहा यांनी २००९ मध्ये डेन्मार्क मधील कोपनहेगन येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत चाखेसंग नागा समुदायाचे प्रतिनिधित्व केले.[] स्थानिक शेती पद्धतींमध्ये आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यामध्ये स्वदेशी महिलांच्या भूमिकेवर त्सुहा यांनी नेहमीच भर दिला आहे. २०१७ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बोलताना त्या म्हणाल्या, "आपल्या समुदायांमध्ये पर्यावरणपूरक शेती करणाऱ्या स्त्री-पुरुष शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी, या व्यासपीठाचा वापर करून आपण आपल्या दृष्टिकोनाचा पुनर्विचार आणि पुनर्रचना करूया."[] त्सुहा या पिकांची निवड आणि बियाणे जतन करण्यातील महिलांच्या महत्त्वाच्या भूमिकेवरही लक्ष केंद्रित करतात.[]

पुरस्कार

[संपादन]

महिला अधिकार, सुशासन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि शाश्वत उपजीविका या क्षेत्रातील योगदानाबद्दल सप्टेंबर २०२० मध्ये त्सुहा यांना दिमापूर येथे १३ व्या 'पीस चॅनल पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. आपला पुरस्कार स्वीकारताना त्यांनी गेल्या अनेक वर्षांच्या प्रवासात सोबत असलेल्या महिलांचे, विशेषतः महिला शेतकरी, कारागीर, विक्रेते, ज्येष्ठ नागरिक आणि पारंपरिक ज्ञान जपणाऱ्या महिलांचे आभार मानले.[][] दोन वर्षांनंतर, 'चिझामी विव्हज' मधील त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेऊन 'बालिपारा फाउंडेशन'तर्फे त्यांना 'नेचरनॉमिक्स पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्यांनी हा पुरस्कार त्या विणकर महिलांना समर्पित केला ज्या "स्वतःच्या गावातील सामुदायिक कार्यात अधिक सक्रिय झाल्या असून, त्यांच्या कामामुळे महिलांचे योगदान समाजासमोर ठळकपणे आले आहे." कापड विणकामाच्या माध्यमातून शाश्वत उपजीविका निर्माण करण्याच्या प्रयत्नांची ही पावती असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.[१०]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Sustainability lessons". Deccan Herald. 23 August 2010. 6 May 2025 रोजी पाहिले.
  2. "Changemaker Interview Series: Chapter 3". North East Network (इंग्रजी भाषेत). 31 May 2022. 2022-12-30 रोजी पाहिले.
  3. Pal, Sanchari (11 August 2016). "A Tiny Naga Village Has Been Spearheading Women's Rights & Sustainable Farming for Almost a Decade". The Better India. 15 February 2024 रोजी पाहिले.
  4. Kalra, Silvy (2016-09-12). "Changing Lives of Women in Rural India: Small Nagaland Village Leads the Way to Gender Equality". www.vagabomb.com (English भाषेत). 2022-12-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. Tula, Meenal; Karlsson, Bengt G. (2025-04-13). "Miracle millets: Indigenous food sovereignty and the revival of ancient grains in Northeast India". South Asia: Journal of South Asian Studies (इंग्रजी भाषेत): 1–23. doi:10.1080/00856401.2025.2478718. ISSN 0085-6401.
  6. 1 2 Rehman, Teresa (27 April 2010). "Bringing back millet to cope with climate change, empower women". Thomson Reuters Foundation News. 3 January 2022 रोजी पाहिले.
  7. Moitra, Aheli (9 March 2017). "Women & Men: Relook. Rethink. Restrategise". The Morung Express. p. 1.
  8. Morung Express Network (22 September 2020). "Seno Tsuhah dedicates 'Peace Award' to resilient women farmers". The Morung Express. 30 December 2022 रोजी पाहिले.
  9. ICM Team (2020-09-23). "Nagaland: Activist Seno Tsuhah Conferred Peace Award 2020". Indian Catholic Matters (इंग्रजी भाषेत). 2022-12-30 रोजी पाहिले.
  10. "Two Nagas receive Balipara Foundation Awards". Eastern Mirror. 6 December 2020. 6 May 2025 रोजी पाहिले.