सेक्चुएलिटी (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सेक्चुएलिटी[१] हे पुस्तक २००८ ला प्रकाशित झाले. यामध्ये भारतामधील 'नियम/ मर्यादा तोडणाऱ्या’ व ‘परीघावारील’ लैंगिकतेच्या विषयांवरील निबंधाचे संकलन आहे. हे प्रमुख स्त्रीवादी अभ्यासक निवेदिता मेनन[२] यांनी संपादित केले आहे. या निबंधाशिवाय या पुस्तकात देशामध्ये झालेल्या विविध लैंगिकतेवरच्या चळवळीच्या मोहिमेची निवडक माहिती आहे.

योगदान[संपादन]

भारतातील स्त्री चळवळ, स्त्रीवादी राजकारणामधील संस्थीकरण व गमावण्याचे व दुखाचे राजकारण या विषयांवरील अभ्यास आणि आराखडा मांडणाऱ्या पुस्तकांमध्ये मेनन यांच्या पुस्तकाला मोठ्या प्रमाणात उद्धृत केलेले दिसते. बिंद्रा बोस यांच्या जागतिकीकरण आणि वसाहतवादानंतरच्या भारतीय चित्रपटांमधली आधुनिकता या अभ्यासामध्येही यांच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. या पुस्तकाचे दक्षिणा आशियाई स्त्रीवाद व त्यामधील असमाधानावरील अभ्यासाचे मोठे योगदान आहे.

सन्दर्भ सुची[संपादन]