सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनडीन्झ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
Saint Vincent and the Grenadines
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचा ध्वज सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Pax et Justitia" (लॅटिन)
शांतता व न्याय
राष्ट्रगीत: "Saint Vincent, Land so beautiful"
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचे स्थान
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
किंग्सटाउन
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार संविधानिक एकाधिकारशाही
 - राष्ट्रप्रमुख एलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधान राल्फ गोन्साल्वेस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २७ ऑक्टोबर १९७९ युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ३८९ किमी (१९८वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १,०३,००० (१९६वा क्रमांक)
 - घनता ३०७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.२५९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ११,७०० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२००७) ०.७७२ (उच्च) (९१ वा)
राष्ट्रीय चलन पूर्व कॅरिबियन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी−०४:००
आय.एस.ओ. ३१६६-१ VC
आंतरजाल प्रत्यय .vc
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ७८४
राष्ट्र_नकाशा


सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स (Saint Vincent and the Grenadines) हा कॅरिबियनमधील एक छोटा द्वीप-देश आहे. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स कॅरिबियन समुद्रातील अँटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून त्याच्या उत्तरेला सेंट लुसिया, पूर्वेला बार्बाडोस तर दक्षिणेला ग्रेनेडा हे देश आहेत. ह्या देशाच्या अखत्यारीमध्ये सेंट व्हिन्सेंट हे मध्यम आकाराचे बेटग्रेनेडीन्स ह्या द्वीपसमूहामधील अनेक लहान बेटे आहेत.

इ.स. १७१९ मध्ये हा प्रदेश फ्रेंच वसाहती साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. इ.स. १७६३ साली फ्रेंचांनी सेंट व्हिन्सेंटचा ताबा ब्रिटिशांकडे दिला. त्यापुढील २०० वर्षे ब्रिटिश साम्रज्याचा भाग राहिल्यानंतर १९७९ साली सेंट व्हिन्सेंटला स्वातंत्र्य मिळाले. सध्या राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असणाऱ्या सेंट व्हिन्सेंटमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही प्रकारचे सरकार आहे. युनायटेड किंग्डमची राणी एलिझाबेथ दुसरी ही सेंट व्हिन्सेंटची राष्ट्रप्रमुख असून राल्फ गोन्साल्वेस हा विद्यमान पंतप्रधान आहे.

केळ्याची लागवड व पर्यटन हे प्रमुख उद्योग असणाऱ्या सेंट व्हिन्सेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. सतत येणाऱ्या वादळांमुळे येथील अर्थव्यवस्थेला सर्रास धक्का बसतो.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

क्रिकेट हा येथील एक लोकप्रिय खेळ असून सेंट व्हिन्सेंट वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भाग आहे. अर्नोस व्हेल हे येथील एक प्रमुख स्टेडियम आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: