सुष्मिता मुखर्जी ही एक भारतीय अभिनेत्री आणि लेखिका आहे जिने हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.
तिने दिल्ली विद्यापीठाच्या जीझस अँड मेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. ती १९८३ मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालयची विद्यार्थिनी आहे.
सुष्मिताचे लग्न दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्याशी झाले होते. घटस्फोटानंतर तिने अभिनेता, निर्माता आणि नागरी कार्यकर्ते राजा बुंदेला यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. तिचे 'बांझ: इनकम्प्लीट लाईव्हज ऑफ कम्प्लीट वुमन' हे पुस्तक जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेले ११ लघुकथांचा संग्रह आहे.[१]
तिने खलनायक आणि किंग अंकल यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने सोनी टीव्हीवरीलजगन्नाथ और पूर्वी की दोस्ती अनोखी या मालिकेत कुसुम मिश्रा आणि स्टार भारत वरील मेरी सास भूत है मध्ये रेखाची भूमिका साकारली आहे.[२]