Jump to content

सुशी (खाद्यपदार्थ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Суши; suši; σούσι; суши; sushi; سۇشى; sushi; suşi; susyi; Sushi; 寿司; Սուշի; sushi; സുഷി; суши; ຊູຊິ; sushi; 壽司; susyi; sushi; suši; soshí; суші; sushi; 壽司; Sushio; Maqpiġaaġmiŋa; 스시; চুশ্বি; suŝio; suši; Suschi; Sushi; সুশি; sushi; sushi; سوشي; سوشی; 寿司; ཧྲོའུ་སི།; суши; सुशी; sushi; sushi; सूशी; suši; soesji; सुशी (जापानी व्यंजन); Isushi; сушы; ಸೂಶಿ; sushi; сүши; sú-sih; sushi; suşi; sushi; сусі; 鮨; سوشی; 壽司; سوشي; súchi; sushi; ဆူရှီ; 壽司; szusi; 寿司; 壽司; sushi; 寿司; suxi; سوشی; Суши; Sushi; sushi; Sushi; سوشی; soesie; sushi; სუში; 寿司; Սուշի; suchîn; سوشى; سوشی; סושי; sushi; суши; ស៊ូស៊ី; సుషి; Sushi; Souchi; Sushi; ਸੂਸ਼ੀ; السوشي; sushi; சுசி; sushi; суши; suši; sushi; 寿司; सुसी; суши; su-sí; sushi; sushi; sushi; суши; Sushi; sušis; suši; sushi; ⵙⵓⵛⵉ; ᏑᏏ; ซูชิ; sushi; susi; 壽司; súisí; sushi; 寿司; suši; suxi; Sushi; Sushi; Sushi; plato japonés de arroz con vinagre y mariscos; 傳統日本食品; főtt, ecetes rizs, amit leggyakrabban hallal tálalnak; platu típicu xaponés; preparació culinària d'origen japonès; традицион япон аштарының бер ризығы; japanisches Gericht aus erkaltetem, gesäuertem Reis, ergänzt um rohen oder geräucherten Fisch; خوراکی برنجی در آشپزی ژاپنی; 日本料理; portionsfremstillet ris toppede eller rullede med andre ingredienser; orez preparat cu oțet, porționat, acoperit sau rulat cu alte ingrediente; 米飯と主に魚介類を組み合わせた日本料理; japonské jedlo z ryže; מאכל יפני המורכב מאורז בחומץ המשולב עם מרכיבים שונים כגון דג נא או מעושן, אצות מאכל וירקות; शी(すし, 寿司, 鮨, 鮓, 寿斗, 寿し, 壽司) एक जापानी भोजन है जिसमें पके हुए विनेगर चावल और अन्य सामग्री के साथ आमतौर पर कच्ची मछली या अन्य समुद्री खाद्य शामिल किया जाता है।; 식초밥에 해산물이나 달걀 등을 조합한 일본 요리; japonské jídlo z okyselené rýže s dalšími přísadami; specialità della cucina giapponese a base di riso guarnito con pesce o altri ingredienti; riz vinaigré garni ou roulé avec d'autres ingrédients, plat traditionnel japonais; рысавая страва з рыбай; खाद्यपदार्थ; Một món ăn; portioned prepared vinegared rice topped or rolled with other ingredients; japanilainen ruoka; jed iz kepic okisanega riža, na katerem so druge sestavine; Japonya kökenli bir balık yemeği; sejenis makanan jepun; традиційна страва японської кухні; salah satu jenis hidangan nasi; gotowany ryż pomieszany z kawałkiem ryby; ഒരു പരമ്പരാഗത ജാപ്പനീസ് വിഭവം; voedsel uit Japan; salah satu jiniah makanan japang; блюдо традиционной японской кухни; Prato japonês de arroz avinagrado e geralmente frutos do mar; japansk matrett; arroz cocido con peixe cru; طعام ياباني يصنع من الرز المخلل مع تغطيته بشرائح سمك; Hapõ rembi’u teete; japansk maträtt; 鮨; 鮓; 寿司; sushis; souchi; sushi; sushi; sushi; சுஷி; Suschi; sudare; sushi; sushi; 壽司; sushi; suši; sushi; 鮓; おすし; スシ; 酸し; 鮨; 壽司; 寿し; お寿司; 寿斗; すし; суси; сушы; sushi; suszi; הומצא ע"י ישראלי שהיה לא עצירות מבננות על המנגל; сушилар; sushi; sushi; sushi; 초밥; sushi; السوشي; sushi; Sushi
सुशी 
खाद्यपदार्थ
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • type of food or dish
उपवर्ग
  • raw fish dish
  • seafood dish
  • Japanese rice dish
वापरलेली सामग्री
  • raw fish
  • sumeshi
मूळ देश
पासून वेगळे आहे
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q46383
जीएनडी ओळखण: 4134879-5
एलसीसीएन ओळखण: sh85130895
बीएनएफ ओळखण: 13514685g
एनडीएल ओळखण: 00571755
BNCF Thesaurus ID: 54602
एनकेसी ओळखण: ph337744
बीएनई ओळखण (datos.BNE.es): XX552947
J9U ID: 987007551013905171
विकिडाटावर माहिती संपादित करा

सुशी हा एक जपानी खाद्यप्रकार आहे . माशांचे कच्चे मांस, पांढरा तांदूळ किवा हातसडीचा तांदूळ, शिरका (व्हिनेगर), भात, साखर, मीठ आणि इतर पदार्थ वापरून सुशी बनवली जाते. माशांशिवाय विविध प्रकारचे समुद्री खाद्य, जसे खेकडा, झिंगे, इ. चाही वापर सुशीमध्ये होतो.

शाकाहारी सुशी बनवताना लोणच्या सारखे मुरवलेले आले, वासाबी नावाची चटणी, फळे, सोयाबीन पासून बनवलेला सोयासॉस आणि दाईकोन नावाचा एक प्रकारचा मुळा असे पदार्थ वापरले जातात.

कुठल्याही सुशी मध्ये मुख्य पदार्थ असतो तो म्हणजे सुशी भात . सुशी या शब्दाचा मूळ जपानी अर्थ आंबट चवीचा असा आहे पण आजकाल या शब्दाचा अर्थ खाद्य प्रकार याच अंगाने घेतला जातो. सुशी भाताला शारी अथवा सुमेशि असेही ओळखले जाते.

साशिमी नावाचा एक जपानी पदार्थ , मांस वापरून भाताबरोबर खाल्ला जातो. या पदार्थाशी अनेक जण सुशी सुशी समजून गोंधळ करतात. पण दोन्ही पदार्थ वेगवेगळे आहेत. तसेच जपानी उच्चार पद्धती प्रमाणे सुशी हा शब्द लिहिताना zu असे वापरले जाते त्यामुळे काही ठिकाणी पदार्थांची नवे झुशी अश्या शब्दांनी संपतात. हे पदार्थ म्हणजेच सुशीच आहेत.

सुशीचा इतिहास

[संपादन]

नारेझुशी नावाच्या एका मूळ चीनी पदार्थापासून सुशीची उत्पत्ति झाली आहे. चीनमध्ये इसविसनाच्या दुसऱ्या शतकपासून आंबवून साठवलेल्या कडक तांदूळात खारवलेले मासे दीर्घकाळ मुरवले जायचे. तांदुळामुळे मासे सडण्याची प्रक्रिया थांबवली जायची. हे मासे खाताना सोबत असणारा तांदूळ काढून टाकला जायचा. साधारण सातव्या शतकापर्यंत ही पद्धत संपूर्ण चीनमध्येच वापरली जाऊ लागली. जपानी लोकांनी माशाबरोबर असणारा तांदूळ सुद्धा खाण्यास सुरुवात केली[]. नाझेरुषी हा पदार्थ त्याच्या आंबट आणि उमामी (ही एक प्रकारची चव आहे जिच्यात खारट ,आंबट, गोड आणि तुरट चवींचे मिश्रण असते) चवीमुळे प्रसिद्ध होता.

मुरोमाची साम्राज्य (1336 ते 1573) या काळात नारेझुशी मध्ये शिरका म्हणजेच व्हीनेगरचा वापर करण्यास सुरुवात झाली. शिरका घातल्यामुळे पदार्थ अजून आंबट तर झालाच शिवाय दीर्घकाळ टिकण्यास मदत झाली. नामानारे या शिजवलेल्या भाताबरोबर मुरवलेले मासे खाण्याची पद्धत मुरोमची काळात लोकप्रिय झाली[]. ओसाका शहरात अनेक शतके सुशी या पदार्थाचा विकास होत होता. सुरुवातीच्या काळात बांबूच्या साच्यात भात आणि मासे घालून त्यांना 'ओशी झुशी ' या नावाने ओळखले जायचे .

एडो साम्राज्य (1603 - 1868 )काळात शिरका घातलेला भात किंवा नोरी नामक समुद्री शेवाळ यावर ताजे मासे वाढून सुशी बनवण्याची पद्धत सुरू झाली[]. आजकाल जपान मध्ये विशेष प्रसिद्ध असणाऱ्या निगेरोझुशी या सुशीची सुरुवात तोक्यो मध्ये रोगोक्यु नामक हॉटेलचा आचारी हानाया योहेइ याने 1824 मध्ये केली.

सुशीचे काही प्रकार

[संपादन]
चिराशी सुशी
[संपादन]

- चिराशी म्हणजे विखरून टाकलेली . एका भांड्यात भात घेऊन त्यावर कच्चे मासे आणि भाज्या विखुरल्या जातात[]. दरवर्षी मार्च महिन्यातील हिनोमत्सूरी सणाला या प्रकारची सुशी खाल्ली जाते.

एव्हील ज्युलिया यांनी काढलेले चिराशी सुशीचे छायाचित्र
इनारी सुशी
[संपादन]

- टोफू म्हणजे सोयाबीन पासून बनलेले पनीर ज्याच्या आत मध्ये सुशी भात भरून तळले जाते. शिंतो धर्मीय देवता इनारी याच्या नावाने ही सुशी ओळखली जाते. कोल्हा हा इनारी देवतेचा दूत समजला जातो आणि टोफुच्या गोळ्यांना दिला गेलेला आकार कोल्हयाच्या कानांप्रमाणे दिसतो म्हणून हे नाव.

माकी सुशी
[संपादन]

- या सुशीचा आकार लंबगोलाकार सिलेंडर सारखा असतो. नोरी हे समुद्र शेवाळ , अंड्याचे आमलेट, काकडी किंवा शिसो झाडाची पाने वापरून हा लंबगोल बनवला जातो. आतमध्ये भात तसेच इतर पदार्थ भरले जातात.

टेक्का माकी सुशी
[संपादन]

- कच्चा ट्यूना मासा भरून केलेली ही सुशी छोट्या लंबगोलाकार आकाराची असते. टेक्का या जपानी शब्दाचा अर्थ लाल तापलेले लोखंड असा आहे. ट्यूना किंवा सॅमन माशांचे मांस पण याच रंगाचे असल्याने टेक्का हे नाव या सुशीला मिळाले असा समज आहे. परंतु टेक्काबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुगार गृहांमध्ये पटकन खाण्यासाठी या प्रकारची सुशी बनवली जायची म्हणून हे नाव.

इहोमाकी सुशी
[संपादन]

- जपानमध्ये सेत्सुबून सणाला या प्रकारची सुशी खाणे शुभ समजले जाते. कानप्यो नावाचे कंदमुळाचे काप, अंडी, इल मासे, शिटाके अळंबी (मशरूम ) असे सात वेगवेगळे घटक वापरून ही सुशी बनवतात. त्या वर्षी शुभ मानल्या गेलेल्या दिशेला तोंड करून ही सुशी खाल्ली जाते.

सुशीचा पाश्चात्य जगातील प्रसार

[संपादन]

१९६० च्या दशकात अनेक जपानी व्यावसायिक मारेकेत जाऊ लागले. या व्यवसायिकांच्या सोयीसाठी अमेरिकेत सुशी हा खाद्यप्रकार मिळू लागला. अमेरिकेत कच्चे मासे वापरण्यावर बंधन असल्याने अगदी जपानी चवीच्या सुशी मिळत नसल्या तरी पाश्चात्य जगाला आवडतील असे गोमांस, खेकडे, तीळ, मेयोनीज, आव्हाकडो फळ, गाजर असे पदार्थ वापरूनही सुशी बनवल्या जातात.

1980च्या दशकात योर्न एरिक ओलसन या नोर्वे मधील व्यवसायिकाने सलमोन माशांचा खप वाढावा म्हणून नोर्वे रोल्स या नावाने सुशी हा खाद्यप्रकार लोकप्रिय केला.

संदर्भ

[संपादन]
  1. "संग्रहित प्रत". 2019-05-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-16 रोजी पाहिले.
  2. "संग्रहित प्रत". 2018-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-16 रोजी पाहिले.
  3. "संग्रहित प्रत". 2018-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-16 रोजी पाहिले.
  4. https://norecipes.com/chirashi-sushi