सुशीला गणेश मावळणकर
सुशीला गणेश मावळणकर (४ ऑगस्ट, १९०४:मुंबई इलाखा, ब्रिटिश भारत - ११ डिसेंबर, १९९५:अहमदाबाद, गुजरात, भारत) या भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेविका होत्या. १९५६ मध्ये त्या अहमदाबादमधून पहिल्या लोकसभेवर बिनविरोध निवडून आल्या.
सुरुवातीचे जीवन
[संपादन]सुशीला मावळणकरांचा जन्म रामकृष्ण गोपीनाथ गुर्जर दाते यांच्याकडे ४ ऑगस्ट, १९०४ रोजी मुंबई राज्यात झाला. त्यांनी मेट्रिक-पूर्वपर्यंतचे शिक्षण घेतले. [१]
कारकीर्द
[संपादन]मावळणकर यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय भाग घेतला आणि महात्मा गांधींच्या आवाहनावरून १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीत भाग घेतला, ज्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. [२] जून १९५३ मध्ये झालेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्याभिषेकाला त्या उपस्थित होत्या. [१]
फेब्रुवारी १९५६ मध्ये त्यांचे पती गणेश मावळणकर यांच्या निधनामुळे अहमदाबाद मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणूकीत सुशीला मावळणकर काँग्रेस पक्षातर्फे पहिल्या लोकसभेत बिनविरोध निवडून आल्या. [३] [४] त्या एक वर्ष या पदावर होत्या. [२] त्या अनेक सामाजिक संस्थांच्या सदस्या होत्या आणि भगिनी समाजाच्या अध्यक्षा होत्या. [२]
वैयक्तिक जीवन
[संपादन]सुशीला यांनी मार्च १९२१मध्ये गणेश वासुदेव मावळंकर यांच्याशी विवाह केला, त्यांना चार मुले झाली. [५] गणेश मावळणकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. सुशीला माळवणकर ११ डिसेंबर, १९९५ रोजी अहमदाबाद मृत्यू पावल्या. [२] त्यांचा मुलगा पुरुषोत्तम मावळंकर हे देखील खासदार होते. [६]
संदर्भ
[संपादन]- ^ a b Jain, C. K. (1993). Women Parliamentarians in India. Surjeet Publications. p. 697 – Google Books द्वारे. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "Jain" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ a b c d "Obituary References". Parliament of India. 22 December 1995. 24 January 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 June 2024 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "PI" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Results of Bye-elections. Election Commission of India. 1957. p. 11.
- ^ Gazette of India. Controller of Publications. 1956. p. 615.
- ^ Jain, C. K. (1993). Women Parliamentarians in India. Surjeet Publications. p. 697 – Google Books द्वारे.Jain, C. K. (1993). Women Parliamentarians in India. Surjeet Publications. p. 697 – via Google Books.
- ^ Press Trust of India (15 May 2002). "Pusushottam Mavalankar passes away". The Times of India. 25 November 2017 रोजी पाहिले.