सुरेशचंद्र आर्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य (जन्म: मे १८,इ.स. १९१२) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन हैदराबाद राज्यातील (सद्यकालीन महाराष्ट्र राज्यातील) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.