सुरेंद्रनाथ जौहर
सुरेंद्रनाथ जौहर ऊर्फ चाचाजी ऊर्फ फकीर (जन्म - १३ ऑगस्ट १९०३, मृत्यू - ०२ सप्टेंबर १९८६ [१]) स्वातंत्र्यसैनिक, लेखक, उद्योजक, श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखेचे संस्थापक आणि श्रीमाताजी यांचे अनुयायी म्हणून ओळखले जातात. [२]
जीवन
[संपादन]सुरेंद्रनाथ यांचा जन्म पंजाब मधील वाहाली या गावात झाला, ते गाव आता पाकिस्तानात आहे.इ.स. १९१९ मध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याने प्रभावित होऊन स्वातंत्र्यचळवळीत स्वतःला झोकून दिले.[३] १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते चळवळीत सक्रीय होते.[२]
डिसेंबर १९३९ मध्ये त्यांची व श्रीमाताजी यांची प्रथम भेट झाली. सुरेंद्रनाथ यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य श्रीमाताजी यांच्या कार्याशी या ना त्या प्रकारे जोडलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी - दयावती, अपत्य - अनिल, पद्मश्री पुरस्कार-प्राप्त तारा जौहर, स्नेहलता, पूर्णिमा, नरेंद्र, जितेंद्र, चित्रा, प्रोमेसी (मुलगा), व्हिक्टर यांचा समावेश आहे.[४]
कार्य
[संपादन]स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग
[संपादन]१९१९ साली लाहोर येथे ब्रिटिशांना विरोध केल्याबद्दल लाठीमार सहन करावा लागला.
१९३० साली नागरी असहकार चळवळीत सहभाग आणि चांदणी चौक, दिल्ली येथे कपड्यांची होळी आयोजित करून पूर्ण स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. त्याबद्दल त्यांना मुलतान येथे १५ महिने कारागृहात राहावे लागले. गांधी-आयर्विन करारानुसार सुटका झाल्यावर अरुणा असफ अली यांच्यासमवेत भूमिगत राहून चळवळ केली.
१९४२ ते १९४४ मध्ये तुरुंगवास सोसावा लागला.[५]
श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी
[संपादन]सुरेन्द्र्नाथ यांच्या मुलांची सोय व्हावी म्हणून, त्यांच्या विनंतीवरून आश्रमाच्या पहिल्या बोर्डिंग हाऊसची स्थापना करण्यात आली. १५ जानेवारी १९४५ रोजी ही स्थापना झाली.[४]
श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनच्या स्थापनेमध्ये एका प्रकारे सुरेंद्रनाथ यांचे साहाय्य झाले. त्यांच्या परिचयामुळे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी या सेंटरच्या उद्घाटन समारंभास आले होते.[४]
श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा
[संपादन]जौहर यांनी १२ फेब्रुवारी १९५६ रोजी, श्रीमाताजींच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने श्रीअरविंद आश्रमाची दिल्ली येथे शाखा स्थापन केली. त्याच वेळी तेथे श्रीमाताजींच्या संकल्पनेनुसार एका शाळेचीही स्थापना केली. [१]
लेखन
[संपादन]- Surendranath Jauhar's Correspondence with The Mother - हे सुरेंद्रनाथ आणि श्रीमाताजी यांच्यातील पत्रव्यवहारावर आधारित पुस्तक आहे. [६]
- My Mother - (श्रीमाताजी यांच्याशी संबंधित १०१ आठवणी) प्रकाशन - श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा, प्रथम आवृत्ती - १९८२, चौथी आवृत्ती - २०२१, ISBN:978-81-952762-5-7
गौरव
[संपादन]- Surendranath Jauhar: His Life, Work and Thought - सुरेंद्रनाथ यांच्या जीवनकार्याचा परिचय देणारे पुस्तक आहे. ले. - डॉ. के.आर.श्रीनिवास अय्यंगार, ISBN: 9788190015509
- A Fiery Patriot Speaks (Interview with Shri Surendra Nath Jauher), मुलाखतकार - डॉ. हरी देव शर्मा, प्रकाशन - श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा,पहिली आवृत्ती - २००३, चौथी आवृत्ती - २०१६, ISBN:81-88847-74-7
संदर्भ
[संपादन]- 1 2 "Read Surendranath Jauhar's correspondence with The Mother". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-12-25 रोजी पाहिले.
- 1 2 "Sri Aurobindo Ashram - Delhi Branch Trust". sriaurobindoashram.net. 2025-12-24 रोजी पाहिले.
- ↑ "Surendranath Jauhar - Auroville Wiki". www.wiki.auroville.org.in. 2026-01-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-12-24 रोजी पाहिले.
- 1 2 3 My Mother - (श्रीमाताजी यांच्याशी संबंधित १०१ आठवणी) प्रकाशन - श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा, प्रथम आवृत्ती - १९८२, चौथी आवृत्ती - २०२१, ISBN:978-81-952762-5-7
- ↑ A Fiery Patriot Speaks (Interview with Shri Surendra Nath Jauher), मुलाखतकार - डॉ. हरी देव शर्मा, प्रकाशन - श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा,पहिली आवृत्ती - २००३, चौथी आवृत्ती - २०१६, ISBN:81-88847-74-7
- ↑ "Surendranath Jauhar - founder of Ashram, Delhi Branch". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-12-24 रोजी पाहिले.
