सुरु नदी
Appearance
सुरु नदी
| जलस्रोताचे मूळ | Pensilungpa Glacier |
|---|---|
| नदीचे मुख | शिंगो नदी |
| Tributary | Wakha |
| Drainage basin | Indus basin |
| देश | भारत |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | कारगिल जिल्हा, लडाख |
| Located in/on physical feature | Suru Valley |
| भौगोलिक गुणक | ३४°३५′३५″N ७६°७′१४″E, ३३°५१′५″N ७६°१९′४″E |

सुरु नदी ही सिंधू नदीची एक उपनदी आहे जी भारतातील लडाखमधील कारगिल जिल्ह्यातून पाकिस्तानमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये वाहते. सुरू खोरे कारगिल तहसीलच्या समविस्तारित आहे. त्याच्या काठावर कारगिल शहर वसलेले आहे. ही नदी गिलगिट-बाल्टिस्तानच्या खरमांग जिल्ह्यात प्रवेश करते व थोड्या अंतरावर वाहत जाऊन मरोळजवळ सिंधु नदीला मिळते.[१]
सुरु नदी १८५ किलोमीटर (११५ मैल) लांब आहे, जी द्रांग द्रंग हिमनदीजवळील पेन्सी ला खिंडीत असलेल्या पॅनझेला हिमनदीतून उगम पावते. द्रांग द्रंग हिमनदी डोडो नदीला देखील जन्म देते जी सुरुच्या विरुद्ध दिशेने वाहते. सुरू नदीचा उगम कारगिल शहराच्या दक्षिणेस १४२ किलोमीटर (८८ मैल) वर आहे.[२][३][४]
संदर्भ
[संपादन]- ↑ Joldan, Sonam (Autumn 2006), "Relationship between Ladakh and Buddhist Tibet: Pilgrimage and trade", The Tibet Journal, 31 (3): 43–76, JSTOR 43300982
- ↑ "Rivers of Ladakh". ladakh.com. 2 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-08-29 रोजी पाहिले.
- ↑ Prem Singh Jina (1996). Ladakh: The Land and the People. Indus Publishing, 1996. p. -16. ISBN 978-81-7387-057-6. 29 August 2012 रोजी पाहिले.
- ↑ Omacanda Hāṇḍā (2001). Buddhist Western Himalaya: A politico-religious history. Indus Publishing, 2001. p. -67. ISBN 978-81-7387-124-5. 27 August 2012 रोजी पाहिले.