सुरिंदर कपूर
film producer (1925–2011) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | डिसेंबर २३, इ.स. १९२५ पेशावर | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | सप्टेंबर २४, इ.स. २०११ मुंबई | ||||
| मृत्युची पद्धत |
| ||||
| मृत्युचे कारण | |||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय | |||||
| अपत्य | |||||
| वैवाहिक जोडीदार |
| ||||
| |||||
सुरिंदर कपूर (२३ डिसेंबर १९२५ - २४ सप्टेंबर २०११) हे एक भारतीय चित्रपट निर्माते होते. त्यांनी हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. याच सोबत त्यांनी १९९५ ते २००१ पर्यंत फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
कपूर यांचा जन्म ब्रिटिश भारतातील पेशावर येथे (सध्याच्या पाकिस्तानमध्ये) झाला. सुरिंदर कपूर यांचे कुटुंब हे पंजाबी हिंदू असून, आर्य समाजाच्या परंपरांचे पालन करत असे.[१] याशिवाय ते कपूर कुटुंबाचे दूरचे नातेवाईक आहेत.[२] त्यांचे चुलत भाऊ पृथ्वीराज कपूर यांनीच त्यांना हिंदी चित्रपट उद्योगात येण्यासाठी मुंबईला आमंत्रित केले होते.[२] त्यांनी १९५० च्या दशकातील हिंदी चित्रपट अभिनेत्री गीता बालीचे सचिव म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली.[३]
२००९ मध्ये दादासाहेब फाळके अकादमीने त्यांना श्री एलव्ही प्रसाद फाळके पुरस्काराने सन्मानित केले.[४] एसकेइंटरनॅशनल फिल्म्स ही त्यांनी स्थापना केलेली संस्था असून तिच्या यशाचे श्रेय त्यांनी अभिनेते राजेश खन्ना यांना दिले."[५] निर्माता म्हणून त्यांचा हिंदीतील पहिला यशस्वी चित्रपट के. शंकर दिग्दर्शित 'शहजादा' हा होता. हा तमिळ चित्रपट 'इधु साथियम' (१९६३) चा रिमेक होता. तथापि, कपूर यांचे त्यानंतर प्रदर्शित झालेले 'फूल खिले हैं गुलशन गुलशन' आणि 'विकास राव' हे दोन्ही चित्रपट अयशस्वी ठरले. या अपयशामुळे कपूर मोठ्या कर्जात बुडाले होते. नंतर मात्र १९८० च्या दशकात निर्माता म्हणून त्यांनी यशस्वी चित्रपटांची निर्मिती करत नुकसान भरून काढले. यातील काही चित्रपट म्हणजे हम पाच, वो सात दिन, लोफर, जुदाई, हमारा दिल आपके पास है, पुकार, नो एन्ट्री हे कन्नड, तमिळ किंवा तेलुगू चित्रपटांचे रिमेक होते. तसेच या सर्व चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत मुलगा अनिल कपूर हे होते. तसेच त्यांचा धाकटा मुलगा संजय कपूर सिर्फ तुममध्ये मुख्य भूमिकेत होते.
२४ सप्टेंबर २०११ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने कपूर यांचे निधन झाले.[६][७]
कपूर यांचे तीन मुलगे, बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर हे देखील चित्रपट उद्योगात गुंतलेले आहेत. अनिल कपूर हे एक यशस्वी बॉलिवूड अभिनेता आहेत. भारतीय चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी यांचे लग्न त्यांच्या मोठ्या मुलाशी, बोनी सोबत झाले होते. बोनी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आहेत. त्यांची मुलगी रीना हिचे लग्न मारवाह फिल्म्स अँड व्हिडिओ स्टुडिओजचे संदीप मारवाह यांच्याशी झाले आहे.
चित्रपट सूची
[संपादन]- मिलेंगे मिलेंगे (२०१०), निर्माता
- नो एंट्री (२००५), निर्माता
- हमारा दिल आपके पास है (२०००), निर्माता
- पुकार (२०००), निर्माता
- सिर्फ तुम (१९९९), निर्माता
- जुदाई (१९९७), निर्माता
- लोफर (१९९६), निर्माता
- वो सात दिन (१९८३), निर्माता
- हम पांच (१९८०), निर्माता
- फूल खिले हैं गुलशन गुलशन (१९७८), निर्माता
- पोंगा पंडित (१९७५), निर्माता utv
- बिकाश राव
- शहजादा (१९७२)
- एक श्रीमान एक श्रीमती (१९६९), निर्माता
- जब से तुम्हे देखा है (१९६३), निर्माता
- टार्झन कम्स टू दिल्ली (१९६५), निर्माता
- फरिश्ता (१९५८), निर्माती
संदर्भ
[संपादन]- ↑ Vasisht, Divya (13 April 2003). "Boney Kapoor: A retake of life". The Times of India. 10 December 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
I am a God-fearing person, but not a ritualistic one. My grandparents were followers of Arya Samaj values and pujas were never a regular feature at home.
- 1 2 "Surinder Kapoor & Prithviraj Kapoor" Check
|url=value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 4 May 2009. 2 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 February 2016 रोजी पाहिले. - ↑ "Its all in the family". The Times of India. 2 October 2009. 8 July 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 March 2012 रोजी पाहिले.
- ↑ "Bollywood veteran Manoj Kumar felicitated with Phalke Ratna award". Zee news. 4 May 2009. 28 March 2012 रोजी पाहिले.
- ↑ "ETimes BFFs: Did you know Sonam Kapoor's grandfather was a freedom fighter? Find out all about the Kapoor clan". The Times of India. 9 July 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ "Film producer Surinder Kapoor dies". Daily Bhaskar. 25 September 2011. 16 March 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 March 2012 रोजी पाहिले.
- ↑ Pradhan, Bharathi (2 October 2011). "Separation pangs for Sri". The Telegraph. 6 November 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 March 2012 रोजी पाहिले.