सुरभी लक्ष्मी
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| दिलेले नाव | Surabhi |
| आडनाव | Lakshmi |
| जन्म तारीख | ११ नोव्हेंबर 1986 |
| जन्मस्थान | Narikkuni |
| वैवाहिक जोडीदार | अनोळखी किंमत |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | मलयाळम |
| व्यवसाय | अभिनेता, दूरदर्शन अभिनेता |
| शिक्षण घेतलेली संस्था | Mahatma Gandhi University, Kerala, Sree Sankaracharya Sanskrit University |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 2005 |
| पुरस्कार | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री |
| अधिकृत संकेतस्थळ | http://www.surabhilakshmi.com |
सुरभी सी.एम., जिला सुरभी लक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते, ही एक भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य अभिनेत्री आहे जी मल्याळम चित्रपट आणि दूरदर्शनमध्ये काम करते.[१] २०१६ मध्ये मल्याळम चित्रपट मिन्नामिनुंगु मध्ये एका संघर्षशील मध्यमवयीन आईची भूमिका साकारल्याबद्दल तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[२]
मीडिया वन टीव्हीवर २०१४ मध्ये सुरू झालेल्या मल्याळम कॉमिक टेलिव्हिजन मालिका एम८० मूसा मधील पथूच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते.[३]
वैयक्तिक जीवन
[संपादन]लक्ष्मीचा जन्म १६ नोव्हेंबर १९८६ रोजी अँडी आणि राधा यांच्या घरी झाला. ती केरळमधील नारिककुनी, कोळिकोड येथील आहे.[४][५][६] तिने कलाडी येथील श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये कला शाखेची पदवी (बीए) मिळवली आणि प्रथम क्रमांक मिळवला.[१] लक्ष्मीने त्याच विद्यापीठातून थिएटर आर्ट्समध्ये मास्टर ऑफ आर्ट्स (एमए) पदवी आणि महात्मा गांधी विद्यापीठातून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मास्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी पूर्ण केली.[५] २०१७ पासून, ती श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठात परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पीएच.डी. करत आहे.[७]
कारकीर्द
[संपादन]२००८ मध्ये, लक्ष्मीने अमृता टीव्हीवरील रिॲलिटी शो "बेस्ट अॅक्टर" जिंकला. त्या आधी २००५ मध्ये जयराज दिग्दर्शित बाय द पीपल या मल्याळम चित्रपटातून तिने आपली कारकीर्द सुरू केली. २००८ मध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकरल्या. २०१४ मध्ये, मल्याळम आणि तमिळ चित्रपट वायाई मूडी पैसुम प्रदर्शित झाला.
२०१७ मध्ये तिचा प्रमुख भूमिकेतला तिला चित्रपट मिन्नामिनुंगु प्रदर्शित झाला. ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[८][९] तसेच केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष ज्युरी उल्लेख हे तिला तिच्या भूमिकेसाठी मिळाले.[१०] केरळ फिल्म क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कारांमध्ये तिला ह्याच चित्रपटासाठी दुसरा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.[११] या चित्रपटात, सुरभी एका एकटी आईची भूमिका साकारते, जिला पोट भरण्यासाठी आणि तिच्या मुलीला चारूला शिक्षण देण्यासाठी अनेक नोकऱ्या कराव्या लागतात. मोठी झाल्यावर, चारू तिच्या प्रियकरासोबत कॅनडाला पळून जाण्याचा निर्णय घेते; परंतु ती तिच्या आईला सांगते की ती उच्च शिक्षणासाठी जात आहे. सुरभी एका वृद्ध आईची भूमिका साकारते, जिच्या पात्राचे नाव चित्रपटात सांगितलेले नाही. गरीब परिस्थितीत, तिला आता तिच्या मुलीसाठी ६ लाख रुपये साठवावे लागतात.[१२]
२०२० मधील ज्वालामुखी चित्रपटातील कामगिरीसाठी देखील तिला फिल्म क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.[१३]
संदर्भ
[संपादन]- 1 2 "Six things you did not know about national award winning Surabhi Lakshmi". The New Indian Express. 22 August 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-03 रोजी पाहिले.
- ↑ "National Film Awards 2017: Surabhi Lakshmi bags Best Actress award, five facts you must know". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2017-04-07. 2019-09-03 रोजी पाहिले.
- ↑ "നാലാം ക്ലാസ്സില് നാലു വട്ടം തോറ്റ പാത്തു: സുരഭിയുടെ പ്രസംഗത്തിന് കൈയടിച്ച് സദസ്". Mathrubhumi (इंग्रजी भाषेत). 3 September 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-03 रोजी पाहिले.
- ↑ "The Scent Of Acting - Trivandrum News - Yentha.com". 27 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 October 2014 रोजी पाहिले.
- 1 2 "About Surabhi Lakshmi, Indian National Award winner for best actress 2016". 2019-09-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "Surabhi is taking a big leap". 3 September 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 October 2014 रोजी पाहिले.
- ↑ "I Don't Want To Be A Star, I Want To Be A Good Artist, Says Surabhi Who Won The National Award For Best Actress". Outlook (India). 27 January 2018. 2019-09-03 रोजी पाहिले.
- ↑ "National Film Awards 2017: Malayalam wins big, Surabhi Best Actress Times of India". The Times of India. 2017-04-10 रोजी पाहिले.
- ↑ "National Film Awards 2016: Best Actress Surabhi for Minnaminungu". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 2017-04-07. 2017-04-10 रोजी पाहिले.
- ↑ "Surabhi Lakshmi Malayalam Actress Encyclopedia,Profile,Biography,Bio Data,Portfolio,Personal Details". Filmiparadise. 22 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 October 2014 रोजी पाहिले.
- ↑ Staff Reporter. "Film critics awards announced". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2017-04-10 रोजी पाहिले.
- ↑ Soman, Deepa (२२ जुलै २०१७). "Minnaminungu: The Firefly".
- ↑ "Film Critics Awards 2020: The Great Indian Kitchen wins the best film". Malayala Manorama (इंग्रजी भाषेत). 13 September 2021. 28 January 2023 रोजी पाहिले.