Jump to content

सुमिता घोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुमिता घोष
जन्म सुमिता घोष
राष्ट्रीयत्व भारतीय
मालक रंगसूत्र कलेक्टिव
जोडीदार संजय घोष
पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार

सुमिता घोष ह्या एक भारतीय उद्योजिका आहेत. त्यांनी रंगसूत्र कलेक्टिव नावाचा व्यवुाय सरू केला ज्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांना नारी शक्ती पुरस्कार दिला गेला. या समूहात शेकडो कारागीर रंगसूत्राचे सह-मालक आहेत आणि कंपनीच्या माध्यमातून ते इकीया सारख्या विविध जागतिक ग्राहकांना त्यांच्या वस्तू विकतात.

जीवन

[संपादन]

घोषचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेण्यापूर्वी मुंबईत पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी राजस्थानमधील आरोग्य शिक्षण सुधारण्यासाठी ग्रामीण समुदायांसोबत काम केले. त्यांचे पती संजय घोषचे आसाममध्ये उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) या दहशतवादी संघटनेद्वारे अपहरण केले गेले आणि त्यानंतर त्याचा पत्ता लागलाच नाही.[]

घोष यांनी अनेक वर्षे भारतातील ग्रामीण भागात काम करून त्यांचा समाज आणि अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला.[] २००७ मध्ये त्यांनी ग्रामीण कारागिरांना चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी एक व्यवसाय स्थापन करण्याचे ठरवले. यासाठी त्यांना मुख्य म्हणजे काही खेळते भांडवल उभारणे आवश्यक होते. त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते आणि बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी कोणते तारण देखील नव्हते. घोषने कारागिरांना या व्यवसायात गुंतवणूक करण्यास राजी केले आणि त्या बदल्यात त्यांना उदयोन्मुख कंपनीत शेअर्स दिले. याचा परिणाम चांगला झाला, काही गुंतवणूकदार आणि घोष यांच्या मालकीचा रंगसूत्र कलेक्टिव नावाचा व्यवसाय सुरू झाला. त्यांच्याकडील सर्व काही, जे त्यांच्या पतींचे होते, ते यात गुंतवले असल्याने ही त्यांची एकमेव मालमत्ता झालीय.[]

२०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी घोष यांना नारी शक्ती पुरस्कारासाठी निवडण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या दिवशी आणखी चौदा महिला आणि सात संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[] त्यावेळी रंगसूत्र कलेक्टिव मध्ये २००० कारागीर गुंतवणूकदार होते.[]

२०२० मध्ये, इकीयाने थायलंड, रोमानिया, जॉर्डन आणि भारतातील सामाजिक उद्योजकांच्या सहकार्याने त्यांच्या डिझायनर्सनी तयार केलेली बोटानिस्क श्रेणी लाँच केली. घोष अजूनही ज्या कंपनीचे नेतृत्व करतात, ती रंगसूत्र ही इंडस्ट्री आणि रमेश फ्लॉवर्स यांच्यासोबत त्यांच्या भारतातील पुरवठादारांपैकी एक होती. रंगसूत्र वनस्पतीशास्त्रीय थीमशी जुळणारे शाश्वत साहित्यापासून बनवलेले कुशन कव्हर्स पुरवत आहे. ते आणि आयकिया हातमाग विणकर आणि इतर ग्रामीण कारागिरांसाठी काम तयार करत आहेत.[]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "जिद को जुनून बनाने से मिलती है जीत, रंगसूत्र : 50 देशों में करोड़ों का कारोबार". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2015-09-08. 2020-07-11 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Sumita Ghose". The Resource Alliance (इंग्रजी भाषेत). 2020-07-11 रोजी पाहिले.
  3. ^ "One Woman Is Changing Lives of 3,000 Artisans from Remote Indian Villages with Their Own Help". The Better India (इंग्रजी भाषेत). 2017-01-04. 2020-07-11 रोजी पाहिले.
  4. ^ "Give women freedom to exercise choices at home, workplace: President Pranab Mukherjee". The Economic Times. 2016-03-08. 2020-07-09 रोजी पाहिले.
  5. ^ "IKEA India unveils BOTANISK, a handcrafted series created in collaboration with six social entrepreneurs". Architectural Digest India (इंग्रजी भाषेत). 2020-03-18. 2020-07-11 रोजी पाहिले.