सुभा वारियर
एक भारतीय अंतराळ अभियंता | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
नियोक्ता | |||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
सुभा वारियर ह्या एक भारतीय अंतराळ अभियंता आहेत. भारतीय उपग्रह प्रक्षेपणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चित्रफित प्रणालीमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. २०१७ मध्ये एकाच वेळी १०४ उपग्रहांचे विक्रमी प्रक्षेपण करण्यात आले होते. यात वारियर देखील सहभागी होत्या. या कामासाठी त्यांना महिलांसाठीचा भारतातील सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वारियर अलापुझा येथे लहानाच्या मोठ्या झाल्या.[१] पुढे त्यांनी त्रिवेंद्रम येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून वैद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली.[२]
१९९१ मध्ये त्या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेत रुजू झाल्या.[२] विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या एव्हियोनिक्स विभागात त्या कार्यरत होत्या.[२]
पीएसएलव्ही सी-३७ अंतराळ मोहीम[३] १५ फेब्रुवारी २०१७ रोजी १०४ उपग्रह सूर्य-समकालिक कक्षेत स्थापित करण्याचे उद्दिष्ट होते.[४] हे उपग्रह अमेरिका, जर्मनी, इस्रायल, कझाकिस्तान, नेदरलॅंड, स्वित्झर्लंड आणि फ्रांस अशा वेगवेगळ्या राष्ट्रांचे होते आणि प्रत्येक उपग्रह दुसऱ्या उपग्रहाला स्पर्श न करता प्रक्षेपित करायचे होते. याच सोबत, याचा पुरावा म्हणून याची थेट चित्रफित देखील बनवायची होती. प्रक्षेपणाची चित्रफित सुस्थितीत असायला हवी होती आणि हे काम वारियरला देण्यात आले होते.[२] प्रक्षेपण यशस्वी झाले आणि ते आठ वेगवेगळ्या कॅमेऱ्यांनी चित्रित केले. परिणामी चित्रफित नंतर संपादित करून, त्यावर प्रक्रिया करून, संकुचित करून ती पृथ्वीवर परत पाठवण्यात आली. उपग्रह सोडले जात असताना चित्रफित संकेत-उकल (डीकोड करण्यात आली आणि तात्कालिक वेगाने (रिअल टाइममध्ये) प्रसारित करण्यात आली. ही चित्रफित तपासून पाहिल्यानंतर त्या संचिका VSSC संकेतस्थळ भांडारात (वेब रिपॉझिटरीमध्ये) पाठवण्यात आल्या.[२]
मार्च २०१७ मध्ये, पुरस्कारासाठी निवडलेल्या तीन शास्त्रज्ञांपैकी त्या एक होत्या. इतर दोघी अनत्ता सोनी आणि बी. कोडानायगुय ह्या होत्या.[३] २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी, नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[५] प्रत्येक पुरस्कार विजेत्याला प्रशस्तिपत्र आणि १००,००० रुपये देण्यात आले.[२]

वारियर आणि त्यांचा पती रघु यांना दोन मुले आहेत. त्यांचे पती देखील VSSC मध्ये काम करतात. हे कुटुंब कौडियार जवळील अंबालमुक्कु येथे राहते.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "VSSC Engineer Subha Varier conferred with Nari Shakti Puraskar". pib.gov.in. 2020-04-21 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f "Cruising through constraints, this Malayali brings home laurels - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-04-21 रोजी पाहिले.
- ^ a b Rai, Arpan (March 8, 2017). "International Women's Day: 33 unsung sheroes to be awarded Nari Shakti Puraskaar". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-04-06 रोजी पाहिले.
- ^ "PSLV-C37 / Cartosat -2 Series Satellite - ISRO". www.isro.gov.in. 2019-12-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-06 रोजी पाहिले.
- ^ "Nari Shakti Awardees – Ms. Subha Varier. G, Kerela | Ministry of Women & Child Development | GoI". wcd.nic.in. 2020-04-21 रोजी पाहिले.