सुबल सरकार
सुबल सरकार | |
---|---|
आयुष्य | |
जन्म स्थान | बांगलादेश |
मृत्यू | १२, नोव्हेंबर, २०११ |
मृत्यू स्थान | मुंबई, महाराष्ट्र |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
संगीत कारकीर्द | |
पेशा | नृत्य दिग्दर्शक |
सुबल सरकार (अंदाजे १९३५ - १२ नोव्हेंबर, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे बंगाली नृत्यदिग्दर्शक होते. त्यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत सुमारे ९५ मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, नेपाळी चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले[१].
सरकारांचा जन्म बांग्लादेशात झाला. नंतर त्यांचे कुटुंबीय कोलकात्यास हलले. कलाकार म्हणून कारकीर्द घडवायचे स्वप्न उराशी घेऊन सुबल सरकार मुंबईत आले. मुंबईत आल्यावर आरंभी त्यांनी फळविक्रीचा व्यवसाय केला[२]. या काळात नृत्यदिग्दर्शक सचिन शंकर यांच्याशी त्यांची ओळख झाली[२]. सचिन शंकरांकडून सरकारांनी नृत्यप्रशिक्षण घेतले. ते सचिन शंकरांच्या नृत्यपथकातून काही काळ काम करत होते[२]. काही काळाने त्यांनी स्वतःचे नॄत्यपथक स्थापून भारतभर दौरे करण्यास सुरुवात केली. इ.स. १९७५ साली सोयरीक या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून पदार्पण केले[३]. त्यांनी नॄत्यदिग्दर्शन केलेले माहेरची साडी, पांडू हवालदार, रामराम गंगाराम हे मराठी चित्रपट खूप गाजले.
१२ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथील परळ उपनगरातल्या निवासस्थानी त्यांचा मॄत्यू झाला[२].
संदर्भ
[संपादन]- ^ "ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांचे निधन". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b c d "सुबल सरकार यांचं निधन". 2011-11-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "कॉरिओग्राफर सुबल सरकार डेड (नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार मृत)" (इंग्लिश भाषेत). १३ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)