Jump to content

सुप्रभा नहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुप्रभा नहार - (जन्म - ०९ ऑगस्ट १९३०, मृत्यू - ०७ ऑक्टोबर २०२०) श्रीअरविंद आश्रमाच्या टपाल तिकिटे विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. []

कौटुंबिक जीवन

[संपादन]

सुप्रभा ही पृथ्वी सिंग नहार (१८९८ ते १९७६) आणि सुहाग कुमारी (१९०० -१९३२) यांची ही तृतीय कन्या होती. यांच्या कुटुंबात सुजाता, सुमित्रा, (सुप्रभा यांच्या बहिणी) आणि धीर सिंग, बीर सिंग, निर्मल, नोरेन सिंग नहार, अभय सिंग नहार (सुप्रभा यांचे बंधू) यांचा समावेश होता. सुप्रभा यांचे बालपण शांतिनिकेतनमध्ये गेले. १९३८ साली ज्येष्ठ कन्या सुजाता नहार हिच्या समवेत पृथ्वी सिंग हे आश्रमवासी बनले. १९३९ मध्ये नोरेन सिंग तर १९४० मध्ये अभय सिंग आश्रमवासी बनले. ऑक्टोबर १९४१ साली सुप्रभा आश्रमवासी झाल्या.[]

शिक्षण

[संपादन]

श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळात श्रीमाताजी सुप्रभा आणि सुमित्रा या दोघींना फ्रेंच व चित्रकला शिकवत असत. या शाळेची सुरुवात झाल्यावर त्या दोघी शाळेच्या पहिल्या तुकडीच्या विद्यार्थिनी बनल्या. सुप्रभा यांनी सत्प्रेम आणि सुझान कार्पेलेस (भारती-दी) यांच्याकडून फ्रेंच भाषेचे शिक्षण घेतले. सुप्रभा यांनी श्रीमाताजींकडून नाटक व टेबल टेनिसचे काही प्रशिक्षण देखील घेतले. []

कारकीर्द

[संपादन]

१९४५ मध्ये आश्रमाच्या छापखान्याची सुरुवात झाल्यावर सुप्रभा यांनी तेथे जुळणीच्या कामास सुरुवात केली. नंतर त्या मोनो-टाईप यंत्रावर काम करू लागल्या. पुस्तक-बांधणी विभागात सुद्धा त्यांनी काम केले.

१९४९ मध्ये, त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर श्रीमाताजींच्या सांगण्यावरून सुप्रभा यांनी शाळेत फ्रेंच आणि गणित शिकविण्यास सुरुवात केली. एक दशक शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर १९५९ साली त्या 'अल्केमी' या प्रयोगशाळेत पवित्रदा यांच्या बरोबर काम करू लागल्या.

सुप्रभा त्यांच्या वडिलांच्या मदतीसाठी प्रकाशन विभागात सुद्धा १९७५ सालपर्यंत कार्यरत होत्या. १९७५ पासून पुढे त्यांनी आश्रमाच्या टपाल तिकिटे विभागात मोठे बंधू नोरेन सिंग यांच्या बरोबर काम करण्यास सुरुवात केली.[]

गौरव

[संपादन]

सुप्रभा इंडो-फ्रेंच फिलाटेलिक और न्यूमिस्मेटिक असोसिएशनच्या अध्यक्ष होत्या. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d "Suprabha Nahar: In Memoriam by Anurag Banerjee – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2020-10-23. 2025-03-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Honoring Philatelists". stampsofindia.com. 2025-03-05 रोजी पाहिले.