Jump to content

सुपर्णा बक्षी गांगुली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
সুপর্ণা বক্সী গঙ্গোপাধ্যায় (bn); Suparna Baksi Ganguly (fr); ᱥᱩᱯᱚᱨᱱᱟ ᱵᱟᱠᱥᱤ ᱜᱟᱝᱜᱩᱞᱤ (sat); Suparna Baksi Ganguly (en); Suparna Baksi Ganguly (ast); Suparna Baksi Ganguly (nl); Suparna Baksi Ganguly (sq); सुपर्णा बक्षी गांगुली (mr); సుపర్ణ బక్సీ గంగూలీ (te); ਸੁਪਰਨਾ ਬਖਸ਼ੀ ਗਾਂਗੁਲੀ (pa); সুপৰ্ণা বাকসী গাংগুলী (as); Suparna Baksi Ganguly (de); Suparna Baksi Ganguly (mul); சுபர்ணா பக்சி கங்குலி (ta) activista india (es); militante indienne (fr); aktibista indiarra (eu); activista india (ast); activista índia (ca); Indian activist for elephants (en); indische Tierrechtsaktivistin (de); ativista indiana (pt); activista india (gl); Indian activist for elephants (en); attivista indiana (it); Indiaas activiste (nl)
सुपर्णा बक्षी गांगुली 
Indian activist for elephants
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
व्यवसाय
  • कार्यकर्ता
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सुपर्णा बक्षी गांगुली ह्या एक भारतीय सामाजिक पशुप्रेमी कार्यकर्त्या असून, त्या विशेष करून बंदिवान हत्तींच्या देखभाल, पुनर्वसन आणि अधिकाराबद्दल काम करतात. याकामासाठी त्यांना २०१६ साली भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जीवन

[संपादन]

गांगुली ह्या १९९१ मध्ये बंगळूरात स्थापन झालेल्या कम्पॅशन अनलिमिटेड प्लस ॲक्शन (CUPA) च्या संस्थापकांपैकी एक आहे. त्यांनी CUPA च्या विश्वस्त आणि सचिव म्हणून काम पाहिले. ही संस्था माकडे, साप, पक्षी आणि इतर वन्यजीवांचे बचाव आणि पुनर्वसन करणारी चार केंद्रे चालवत होती.[]

१९९९ मध्ये[] गांगुली यांनी वाइल्ड लाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलीटेशन सेंटर (WRRC) ची सह-स्थापना केली आणि या संस्थांचे मानद अध्यक्ष पद देखील भूषविले.[]

गांगुलीने २०१३ मध्ये भारताच्या हत्तींवरील कार्य दलात काम केले. त्यांच्या मते भारतातील बंदिस्त हत्ती हे संकटात आहेत. गांगुली यांच्या मते सुमारे ४,००० हत्तीं बंदिवासात असून त्याचे हाल होत आहेत. तसेच यापैकी जवळजवळ सर्वच हत्तींची बेकायदेशीरपणे तस्करी करण्यात आलेली आहे. पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी म्हणून हत्तींचा वापर केला जातो. यात हातींद्वारे रस्सीखेच, फुटबॉल आदी खेळ खेळवून घेतले जातात. तसेच हत्तींची रंगरंगोटी केली जाते.. गांगुली नमूद करतात की भारतातील लोकांच्या प्रेमात हत्तींना विशेष स्थान आहे. पण यामुळे हत्तींचे जगणे दुश्वर होते.[]

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना (२०१६)

मार्च २०१६ मध्ये गांगुली यांना भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हे पुरस्कार निवड झालेल्या महिलाना प्रदान करण्यात आले. महिला आणि बालविकास मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी देखील यावेळी उपस्थित होत्या.[]

२०१६ मध्ये WRRC ने हत्तींना बंदिवान ठेवणे बेकायदेशीर आहे, त्यामुळे त्यावर बंदी आणावी अशा स्वरूपाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.[]

२०१९ मध्ये, पारंपारिक राजस्थान महोत्सवात हत्तींना सर्वोत्तम हत्ती निवडण्यासाठी स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी रंगवले जात होते. गांगुली यांनी या गोष्टीचा प्रखर विरोध केला. ज्यामुळे अंततः हा महोत्सव बंद करण्यात आला. रंगवलेल्या हत्तींचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यामुळे प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी त्यावर संताप व्यक्त केला. तर काहींनी हत्तींची रंगरंगोटी ही एक परंपरा आहे असे कारण देऊन या गोष्टीचे समर्थन केले, परंतु गांगुलीने प्राण्यांचे हक्क परंपरेपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे हे उत्तर देत याला विरोध केला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "President Pranab Mukherjee presented 2015 Nari Shakti awards". Jagranjosh.com. 2016-03-09. 2020-07-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Board of Trustees". helpanimalsindia.org (इंग्रजी भाषेत). 2020-07-07 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Optimism As Fate Of India's Captive Elephants Hangs In Balance". HuffPost Canada (इंग्रजी भाषेत). 2016-09-29. 2020-07-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Painted Elephants". Magazine (इंग्रजी भाषेत). 2013-08-01. July 8, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-08 रोजी पाहिले.
  5. ^ Dhawan, Himanshi (८ मार्च २०१६). "Nari Shakti awards for women achievers". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-07-07 रोजी पाहिले.
  6. ^ "Czy one są szczęśliwe? Malowanie i przystrajanie słoni to tradycja festiwalu w Radżastanie [GALERIA]". www.national-geographic.pl (पोलिश भाषेत). 2020-11-20 रोजी पाहिले.