Jump to content

सुनील भट्टाचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुनील भट्टाचार्य - (जन्म व बालपण - ०३ नोव्हेंबर १९२०[] कृष्णनगर, प.बंगाल[], मृत्यू - ३० एप्रिल १९९९) सुनील भट्टाचार्य श्रीअरविंद आश्रमातील संगीतकार आणि वादक होते.

जीवन व कार्य

[संपादन]

सुनील भट्टाचार्य श्रीअरविंद आश्रमातील संगीतकार आणि वादक होते.ते सतार वाजवत असत. त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज, कलकत्ता येथे विज्ञानाचे (रसायनशास्त्र) शिक्षण घेतले असले तरी ते एक उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू, वनस्पतिशास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञ होते. ते श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते येथे गणित, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र, भूगर्भशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र आणि फुटबॉल शिकवत असत. गणित, बुद्धिबळ, कुंडलीअभ्यास हे त्यांचे आवडीचे विषय होते.

त्यांचे वडील हे होमिओपॅथीचे डॉक्टर होते, वडिलांकडून होमिओपॅथीचे ज्ञान आत्मसात केले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते होतकरू व्यक्तींना मोफत औषधोपचार देत असत.[]

१९४२ साली ते प्रथम श्रीअरविंद आश्रमाशी संबंधित झाले.

१९४५ पासून त्यांनी नृत्य सादरीकरणाच्या साथीने संगीत रचना करण्यास सुरुवात केली. अखेर संगीत हेच त्यांच्या साधनेचे साधन बनले आणि अनेक वर्षांनी त्यांनी अध्यापन सोडून स्वतःला पूर्ण वेळ संगीतात वाहून घेतले. १९६५ पासून त्यांना श्रीमाताजींनी नवीन वर्षाचे संगीत रचण्याची जबाबदारी सोपवली. १९६६ मध्ये श्रीमाताजींनी त्यांना सावित्री या महाकाव्याच्या वाचनासाठी संगीत रचण्याची विनंती केली, हे काम त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत चालू ठेवले. []

श्रीमाताजी यांनी सुनील यांचे संगीत हे भविष्यकालीन संगीत असल्याचे सांगितले.[][]

प्रकाशित लेखन

[संपादन]

सुनील - द मदर्स म्युझिशीअन (इंग्रजी), संपा.. क्लीफोर्द गिब्सन, प्रकाशन वर्ष - २०१४, पृष्ठसंख्या - ३४८ - १९६६ ते १९९८ या कालावधीत सुनील यांचा मित्रपरिवार व त्यांच्या संगीताचे चाहते यांच्याशी जो पत्रव्यवहार झाला आहे त्यातून हे पुस्तक तयार झाले आहे. श्रीमाताजींबरोबर झालेला पत्रव्यवहार देखील या पुस्तकात समाविष्ट आहे.

सुनील भट्टाचार्य यांच्या संगीत रचना

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "About Sunil Bhattacharya (musician) by Batti". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2026-01-30 रोजी पाहिले.
  2. Clifford Gibson (2014). SUNIL - The Mother’s Musician. the Late Shrimati Kokilaben Mehta.
  3. 1 2 Anie Nunnally (2004). The Golden Path. California: East West Cultural Center, The Sri Aurobindo Center of Los Angeles. ISBN 0-930736-05-2.
  4. 1 2 "Personalia / Sunil Bhattacharya". sri-aurobindo.co.in. 2026-01-30 रोजी पाहिले.