सुनील आनंद
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| दिलेले नाव | Suneil |
| जन्म तारीख | ३० जून 1956 |
| जन्मस्थान | झ्युरिक |
| मृत्यू तारीख | २८ जुलै 2026 |
| वडील | देव आनंद |
| आई | कल्पना कार्तिक |
| व्यवसाय | अभिनेता, चित्रपट-दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, पटकथाकार |
सुनील आनंद (३० जून, १९५६ - २८ जुलै, २०२६) हे एक भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. ते अभिनेते देव आनंद[१] आणि अभिनेत्री कल्पना कार्तिक यांचे सुपुत्र होते. देव आनंद यांच्या मालकीच्या नवकेतन फिल्म्सचे व्यवस्थापनही ते पाहत होते.
प्रारंभिक जीवन
[संपादन]त्यांचा जन्म १९५६ मध्ये स्वित्झर्लंडमधील झ्युरिक येथे झाला. त्यांचे आई-वडील कार्लोव्ही व्हेरी चित्रपट महोत्सवास जात असताना त्यांचा जन्म झाला आणि ते त्या महोत्सवाचे सर्वात तरुण प्रतिनिधी ठरले होते.
त्यांनी वॉशिंग्टन, डी.सी. येथील अमेरिकन विद्यापीठ मधून व्यवसाय प्रशासनाची (Business Administration) पदवी घेतली होती[१]. चेतन आनंद आणि विजय आनंद हे त्यांचे काका होते. त्यांचे चुलत भाऊ-बहिणी भारतीय चित्रपट दिग्दर्शक केतन आनंद, विवेक आनंद, अभिनेते व चित्रपट-निर्माते शेखर कपूर, नीलू आणि अरुणा हे आहेत. नीलू यांचा विवाह अभिनेता नवीन निश्चल यांच्याशी झाला होता, तर अरुणा यांचा विवाह बलराज साहनी यांचे सुपुत्र परीक्षित साहनी यांच्याशी झाला आहे. त्यांनी हाँगकाँगमध्ये 'विंग त्सुन' (Wing Tsun) या युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले होते.[१]
कारकीर्द
[संपादन]
त्यांनी आनंद और आनंद (१९८४),[२] कार थीफ (१९८६), मैं तेरे लिये (१९८८), आणि मास्टर (२००१) या चित्रपटांमध्ये काम केले होते.[३] त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आणि मार्शल आर्ट्सवर आधारित मास्टर हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. २०१४ मध्ये त्यांनी वागाटर मिक्सर (Vagator Mixer) या हॉलीवूड चित्रपटाचे काम सुरू केले.[४]
चित्रपट सूची
[संपादन]| वर्ष | चित्रपट | टीप |
|---|---|---|
| १९८४ | आनंद और आनंद | |
| १९८६ | कार थीफ | |
| १९८८ | मैं तेरे लिये | |
| २००१ | मास्टर | दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण |
| वागाटर मिक्सर | अभिनेता आणि दिग्दर्शक |
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 "Suneil Anand makes India's first martial arts movie : Bollywood News : IndiaExpress.Com". 29 सप्टेंबर 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 जुलै 2008 रोजी पाहिले.
- ↑ Chaitanya Padukone (2007-10-03). "DNA – After Hrs – Anand to direct Anand – Daily News & Analysis". 6 June 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-07-16 रोजी पाहिले.
- ↑ Alter, Stephen (2007). Fantasies of a Bollywood Love Thief: Inside the World of Indian Moviemaking. Harvest Books. p. 79. ISBN 978-0-15-603084-7.
- ↑ "Suneil Anand announces Navketan Films' next". DNA India. 26 September 2012.
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
