सुनीता सिंग चोकन
Indian activist and mountaineer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | इ.स. १९८५ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
सुनीता सिंग चोकन (जन्म: १९८५) ही एक भारतीय गिर्यारोहक आणि चळवळ कार्यकर्ती आहे. तिने २०११ मध्ये माउंट एव्हरेस्ट सर केले. त्यानंतर तिने पर्यावरण आणि बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी दोन लांब पल्ल्याच्या सायकल सहली केल्या. तिला २०१६ सालच्या नारी शक्ती पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
प्रारंभिक आयुष्य
[संपादन]चोकन चा जन्म १९८५ मध्ये एका हिंदू गुर्जर कुटुंबात झाला.[१] तिचे बालपण हरियाणा मधील रेवाडी आणि राजस्थान मधील किशोरपुरा येथे गेले. तसेच तिचे शालेय शिक्षण पंजाब मधील अमृतसर, येथे पूर्ण झाले.[२][३] तिचे वडील सीमा सुरक्षा दलात काम करायचे यामुळे तिचे आयुष्य भारतातील वेगवेगळ्या भागात गेले.[२] चोकनने मनाली आणि दार्जीलिंग मध्ये गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले.[३]
कारकिर्द
[संपादन]चोकनने मनाली, दार्जिलिंग आणि उत्तरकाशी येथील पाच ठिकाणी पर्वतरोहण केले. त्यानंतर नेपाळ येथील माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर जाणाऱ्या मोहिमेत सामील होण्यासाठी तिची निवड झाली.[३] तिने २०११ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी एव्हरेस्ट सर केले. ज्यामुळे एव्हरेस्ट शिखर सर करणारी हरियाणातील सर्वात तरुण महिला म्हणून तिची ओळख निर्माण झाली.[१][४] त्यानंतर पुढील टप्प्यात तिने हिमालयातील इतर अनेक शिखरे सर केली.[५]
२०१७ मध्ये, चोकनने सायकल सहल सुरू केली. बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि "पर्यावरण जपा" या मोहिमांना प्रोत्साहन देण्यासाठीची ही सहल कन्याकुमारी ते लेह पर्यंतची ४२०० किमी एवढी दीर्घ होती.[१][३] या सहली मध्ये तिने एकूण ४,६५६ किमी अंतर पार केले, तसेच या मार्गावर २२० झाडे देखील लावली.[२] सहलीनंतर, विवेकानंद केंद्राच्या निमंत्रणावरून ती अमृतसरला योग शिकवण्यासाठी परतली.[२] ममता सोढा यांच्या डीएसपी पदाच्या नियुक्तीला गृहीत धरून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर चोकन यांना २०१८ मध्ये हरियाणा पोलिसात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्त करण्यात आले.[६] २०१८ मध्येही तिने बेटी बचाओ, बेटी पढाओ या कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी आणखी एक सायकल सहल केली, यावेळी तिने ५,००० किमी अंतर कापले. ही सहल गुजरात येथील सोमनाथ मंदिरापासून ते नेपाळ पर्यंतची होती.[५]
पुरस्कार आणि मान्यता
[संपादन]चोकनला २०१६ सालचा नारी शक्ती पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[४] तिला सीमा सुरक्षा दलाचा शूर कन्या, भारत गौरव आणि कल्पना चावला आदी पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c Sharma, Kumar; Saini, Ravinder; Sharma, Sumedha; Dhawan, Sunit; Malik, B. S.; Sharma, Shiv Kumar (24 July 2017). "Everester pedals for girls, environment". The Tribune India (इंग्रजी भाषेत). 23 January 2021 रोजी पाहिले.
- ^ a b c d Sharma, Divya (21 November 2017). "Everest conqueror in city for yoga". The Tribune India (इंग्रजी भाषेत). 23 January 2021 रोजी पाहिले.
- ^ a b c d Wilson, Jaison (8 March 2018). "Rewari to Mt. Everest: Journey of a young girl". United News of India. 16 February 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 January 2021 रोजी पाहिले.
- ^ a b "President honours Everest climber from Haryana". Hindustan Times. HTC. 9 March 2017. 1 February 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 January 2021 रोजी पाहिले.
- ^ a b c "Somnath Temple to Nepal (5000 km) Solo Cycling Expedition by Sunita Singh Chocken (Jenny Chocken) 15th July – 23rd August". Travelogues (इंग्रजी भाषेत). 14 July 2018. 2021-01-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 January 2021 रोजी पाहिले.
- ^ Sura, Ajay (8 March 2018). "Mount Everest: Everest summiteers demand DSP posts; sports department in a tizzy". The Times of India (इंग्रजी भाषेत). 23 January 2021 रोजी पाहिले.