सुनीता विल्यम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुनीता विल्यम ही एक भारतीय मूळ असलेली अंतराळवीर आहे.

सुनीताचे वडील डॉ. दीपक पंड्या हे जन्माचे भारतीय आणि आई बोनी ही स्लोव्हियन. अभ्यासात सुनिता काही फार हुशार विद्यार्थिनी नव्हती. पण तिला लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती. एक जलतरणपटू म्हणून ती मोठी होऊ लागली. मोकळा वेळ असो, नाहीतर शाळा सुटल्यानंतर, सुनीता कायम स्विमिंग टँकवरच असे. पोहण्याच्या छंदामुळे सुनीताला डायव्हर – पाणबुडे व्हायचे होते.परंतु डायव्हर बनण्याइतके ग्रेड पॉइन्ट्स तिच्यापाशी नव्हते. त्यामुळे डायव्हर न होता ती वैमानिक झाली.. सुनीताने पायलट व्हायचे ठरवल्यावरही तो मार्ग सुकर नव्हता. लढाऊ विमानांचे वैमानिक बनण्याची संधी त्यावेळी अमेरिकेतही महिलांना दिली जात नव्हती. घोंगावत येणारे जेट विमान उडवण्याऐवजी हेलिकॉप्टर उडवणे, हाही खरे तर सुनीताच्या आयुष्यातला तिला अंतराळाच्या दिशेने घेऊन जाणारा टर्निंग पॉइन्ट ठरला.. मेरीलँड टेस्ट पायलट स्कूलमध्ये तिने शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मास्टर डिग्री झाल्यावर तिने चंद्रावरच्या स्वारीसाठी अर्ज केला. अडथळ्यांची शयर्त तिने जिंकली. १० डिसेंबर, २००६ रोजी सकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी सुनीताचे डिस्कव्हरी अंतराळयान अवकाशात झेपावले. अवघ्या दोन दिवसांत ती इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचली. १६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्त पाहण्याचा अपूर्व योग तिला मिळाला. आता तिचे पुढचे लक्ष मंगळावर जाण्याचे आहे. 

‘तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, कारण ती स्वप्ने निश्चितच वास्तवात येऊ शकतात. हा सुनीताने मुंबईभेटीत संदेश दिला.