Jump to content

सुनयना पांडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुनयना पांडा - श्री अरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनमधून पदवीधर झालेल्या सुनयना पांडा या अभिनेत्री आणि लेखिका आहेत. []

जीवन

[संपादन]

सुनयना या द गोल्डन चेनच्या संपादकीय सदस्यांपैकी एक आहेत. गोल्डन चेन हे श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनच्या माजी विद्यार्थ्यांचे नियतकालिक आहे.[]

त्या वीस वर्षे फ्रेंच शाळेत शिकवीत असत. त्या लंडन आणि पाँडिचेरी येथे वास्तव्यास असतात.

प्रकाशित पुस्तके

[संपादन]
  • सेव्हन डेडिकेटेड लाईव्हज (जुलै २००९), - श्रीअरविंद आश्रमात आश्रमवासी म्हणून राहणाऱ्या निरोदबरन, तेहमी, रिषभचंद, मिली, कृष्णलाल, मोना पिंटो, उदार यांच्या जीवनावर आधारित लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
  • फॉलोइंग इन देअर फूटस्टेप्स (ऑक्टोबर २०१०) - श्रीअरविंद यांचे इंग्लंडमधील जीवनावर आणि श्रीमाताजींच्या जपानमधील जीवनावर आधारित पुस्तक
  • श्री अरबिंदो अँड द क्रिप्स मिशन (जून २०१२)
  • द ल्युमिनस पास्ट (ऑगस्ट २०१४) - प्रमिला देवीच्या आठवणींचे बंगालीतून इंग्रजीत केलेले भाषांतर, सहलेखन - प्रमिला देवी आणि सुनयना पांडा. - प्रमिला देवी या श्रीअरविंद आश्रमात १९४१ ते १९८० या कालावधीत राहत होत्या. त्यांच्या या आठवणी प्रथम मदर इंडियाच्या अंकात सदर रूपाने प्रकाशित झालेल्या होत्या. ISBN: 978-0-9562923-3-9
  • मीरा अल्फासा - द मदर, हर लाईफ अँड हर वर्क (फेब्रुवारी २०१९)
  • द ब्रिज ऑफ लव
  • मीरा अल्फासा - द मदर (जानेवारी २०२४)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Ira-di by Sunayana Panda – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2015-08-10. 2025-03-25 रोजी पाहिले.
  2. ^ "The Golden Chain (journal) - Auroville Wiki". wiki.auroville.org.in. 2025-03-25 रोजी पाहिले.