Jump to content

सुनंदा पोद्दार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुनंदा पोद्दार - (जन्म - २४ फेब्रुवारी १९३४, नैरोबी, केनिया) श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनमधील शिक्षिका, लेखिका []

जीवन व कार्य

[संपादन]

सुनंदा यांच्या आईवडिलांनी आफ्रिकेत जाण्यापूर्वी, महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. गुजराथमध्ये काही लोकोपयोगी कामात देखील ते सहभागी होते. १९२० साली ते दोघेही श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे अनुयायी बनले. वडील शिवाभाई अमीन हे वकील होते. १९२९ साली हे कुटुंब नैरोबी येथे स्थायिक झाले.[]

१९५७ साली त्यांचा बाळकृष्ण पोद्दार यांच्याशी विवाह झाला. [] त्यांच्या समवेत सुनंदा श्रीअरविंद आश्रमाच्या प्रकाशन विभागात काम करत असत. त्या प्राणिक उपचार देण्याचे काम देखील करत असत. १९८९ पासून त्यांच्यावर श्रीस्मृती या श्रीमाताजींच्या वस्तुसंग्रहालयाची जबाबदारी सोपविण्यात आली.

प्रकाशित लेखन

[संपादन]

पूरक

[संपादन]

सुनंदा पोद्दार यांची मुलाखत - मुलाखतकार अ‍ॅनी नन्नली []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Annie Nunnally (2004). The Golden Path. California: East West Cultural Center, The Sri Aurobindo Center of Los Angeles, California. ISBN 0-930736-05-2.
  2. ^ "Balkrishna Poddar - his life & work at SABDA - by Sunanda". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-12 रोजी पाहिले.
  3. ^ "Sunanda Poddar - caretaker of 'SriSmriti'". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-12 रोजी पाहिले.
  4. ^ a b AZ (2020-12-24). "The Golden Path: Sunanda Poddar". AuroMaa (इंग्रजी भाषेत). 2025-03-12 रोजी पाहिले.