सुधीर कक्कड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुधीर कक्कड (इ.स. १९३८) एक भारतीय मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ आहेत. त्यांनी भारतीय समाजाची मानसिकता, आधुनिक जगातल्या, पण विशेषतः आधुनिक भारतातल्या, धार्मीक श्रध्दांमागची मानसिक भूमिका, आणि पाश्चिमात्य व भारतीय मानसशास्त्रीय परंपरांची तुलना हे तीन अभ्यास केलेले आङेत. त्यांचे काम अनेक इंग्लिश पुस्तकांत प्रकाशित केले आहे. त्यांचे आत्मचरित्र व निवडक लेखांचा संग्रह इंग्रजी भाषेत प्रसिद्ध आहे. कक्कड यांच्या अनेक पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. त्यांना अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून फ्रांसमधल्या ल नुव्हेल ऑब्झरवातूअर या पत्रिकेने त्यांची जगातल्या पंचवीस सर्वात महत्त्वाच्या विचारवंतांमध्ये गणती केली आहे.

कक्कड यांचे बालपण पंजाबमध्ये एका क्षत्रिय कुटूंबात गेले. त्यांचे शिक्षण अहमदाबाद, जर्मनीतील मानहाइमफ्रांकफुर्टऑस्ट्रियातील व्हिएन्ना या शहरांत झाले. नंतर त्यांनी पिएच्डीसाठीचे संशोधन अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एरिक एरिकसन यांच्या मार्गदर्शनाखाली केले. शिक्षणपश्चात त्यांनी अहमदाबादच्या भारतीय प्रबंध संस्थेतदिल्लीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत संघटनांचे मानसशास्त्र शिकवले. नंतर त्यांनी दिल्लीच्या सेंटर फॉर स्टडी ऑफ डिव्हेलपिंग सोसायटीज या संस्थेत संशोधन केले. या शिक्षक-संशोधक कामापश्चात त्यांनी दिल्लीत मानसोपचारतज्ञ म्हणून काम केले. पाश्चिमात्य पद्धतीची मानसोपचार सेवा पुरवणारे ते भारतातले पहिले मानसोपचारतज्ञ होते. या संस्थेत त्यांनी भारतातल्या मानसशास्त्रीय लोकपरंपरा, हिंदू धर्माची मानसिक बैठक, महात्मा गांधी, रामकृष्ण परमहंस, व स्वामी विवेकानंद यांचे मानसिक जीवन, भारतातल्या हिंदू-मुसलमान द्वेषामागची मानसिक कारणे, इत्यादी विषयांवर महत्त्वाचे संशोधन केले. याच सुमारास त्यांनी कादंबरी देखील लिहीली.

कक्कड त्यांच्या पत्नीसमवेत गोव्यात राहतात.