Jump to content

सुधागड वन्यजीव अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुधागड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत. महाराष्ट्र शासनाने २७ ऑगस्ट २०१४ रोजी सुधागड वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषीत केले.[]

भौगोलिक आणि वन्यजीव

[संपादन]

सुधागड व सभोवतालची ७६.८८ चौ. किलोमीटर परिसराची अभयारण्य म्हणून घोषणा २७ ऑगस्ट २०१४ रोजी अधिसुचना क्रमांक डब्ल्यूएलपी. २०१४/प्र.क्र. ३७/फ-१ नुसार झाली. पुण्यापासून साधारणतः ११५ ते १३५ किमी. अंतरावर रायगड व पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये हे अभयारण्य पसरलेले आहे. सुधागड व परिसर हा दाट वनराईने नटलेला आहे. गडाची समुद्र सपाटीपासूनची उंची ६१९ मीटर इतकी आहे. सुधागड परिसरात २२०० वर्षांपूर्वीची ठाणाळे लेणी आहे. गडावर अनेक तलाव आहेत. गडाच्या सभोवतालच्या परिसरात अनेक प्रजातीच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत व वन्यजीव चा वावर पण खूप आहे. एकूणच काय ऐतिहासिक व वनभ्रमंतीसाठी हे अभयारण्य संशोधकांना व हौशी पर्यटकांना नेहमीच खुणावत आले आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "राज्यात तीन नवीन अभयारण्ये". loksatta.com (Marathi भाषेत). 7 September 2014. 25 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "वन पर्यटन : सुधागड". loksatta.com (Marathi भाषेत). 17 May 2017. 25 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)