Jump to content

सुझॅन बी. अँथोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुझन बी. अँथोनी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावSusan B. Anthony संपादन
जन्म-नावSusan Anthony संपादन
दिलेले नावSusan संपादन
आडनावAnthony संपादन
जन्म तारीख१५ फेब्रुवारी 1820 संपादन
जन्मस्थानAdams संपादन
मृत्यू तारीख१३ मार्च 1906 संपादन
मृत्यूस्थानरॉचेस्टर संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणheart failure, न्युमोनिया संपादन
चिरविश्रांतीस्थानMount Hope Cemetery संपादन
वडीलDaniel Anthony संपादन
आईLucy Read संपादन
भावंडेDaniel Read Anthony, Mary Stafford Anthony, Jacob Merritt Anthony संपादन
वैवाहिक जोडीदारकिंमत टाकलेली नाही संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
कार्यक्षेत्रमहिलांचा मताधिकार संपादन
राजकीय पक्षाचा सभासदरिपब्लिकन पक्ष संपादन
उल्लेखनीय कार्यThe Revolution संपादन
सदस्यताDaughters of the American Revolution संपादन
पुरस्कारNational Women's Hall of Fame संपादन
Depicted bySusan B. Anthony chasing Grover Cleveland, National Portrait Gallery संपादन
Related categoryCategory:Cultural depictions of Susan B. Anthony संपादन

सुझन ब्राउनेल अँथोनी (१५ फेब्रुवारी, १८२९:ॲडम्स, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - १३ मार्च, १९०६:रॉचेस्टर, न्यू यॉर्क, अमेरिका) या अमेरिकेतील स्त्रीवादी कार्यकर्त्या व समाजसुधारक होत्या. अमेरिकेत स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळण्यात यांचा मोठा वाटा होता.

क्वेकर कुटुंबात जन्मलेल्या अँथॉनी यांनी वयाच्या सतराव्या वर्षी गुलामगिरीविरुद्ध जाहीर याचिका काढल्या व नंतर १८५६मध्ये त्या अमेरिकन अँटी-स्लेव्हरी सोसायटीच्या न्यू यॉर्क राज्यातील संघटक झाल्या.

अँथोनी यांनी स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी देशभर प्रवास करून भाषणे दिली व जनतेस यासाठी उद्युक्त केले. वर्षाकाठी त्यांनी ७५-१०० भाषणे दिली तसेच अनेक राज्यांमधून यासाठी प्रचार केला.

सुरुवातीला अँथोनी यांच्यावर कडाडून टीका झाली आणि त्यांचे चरित्रहननही केले गेले. नंतरच्या काळात त्यांच्या कामाची कदर केली गेली व त्यांची जाहीर क्षेत्रातील प्रतिमा सुधारली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिनलीने अँथोनी यांच्या ८०वा वाढदिवसाचा सोहळा व्हाइट हाउसमध्ये आयोजित केला होता.

१९७९ साली अँथोनी यांची प्रतिमा एक अमेरिकन डॉलरच्या नाण्यावर प्रकाशित झाली. अमेरिकन चलनावर प्रतिमा असणाऱ्या अँथोनी या सर्वप्रथम महिला आहेत.