Jump to content

सुझान कार्पेलेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुझान कार्पेलेस (भारती-दी) या पानावरून पुनर्निर्देशित)

सुझान कार्पेलेस (भारती-दी) Suzanne Karpelès- (जन्म - १७ मार्च १८९०, मृत्यू - ०७ नोव्हेंबर १९६८, पॉन्डिचेरी) [] या एक फ्रेंच अभ्यासक होत्या. श्रीअरविंद आश्रमातील फ्रेंच भाषेच्या शिक्षिका. [] त्यांना फ्रांसीसी इंडोनेशियाच्या अनेक भाषा अवगत होत्या. सुझान या 'नोम पेन्ह'च्या रॉयल लायब्ररीच्या पहिल्या अभिरक्षक (क्युरेटर) होत्या.

जीवन व कार्य

[संपादन]
सुझान कार्पेलेस (१९२०)

सुझान यांचा जन्म पॅरिसमध्ये हंगेरियन ज्यूंच्या एका श्रीमंत कुटुंबात झाला आणि त्यांचे बालपण पॉन्डिचेरी येथे गेले. १९१७ मध्ये पॅरिसमध्ये, त्यांनी संस्कृत, पाली, नेपाळी, तिबेटी भाषा आणि तिबेटी धर्म यासह पूर्वेकडील संस्कृती आणि भाषांचा अभ्यास केला. त्यांना ख्मेर भाषादेखील अवगत होती.

१९२३ साली तौलनिक अभ्यास करण्यासाठी त्यांना बँकॉक, थायलंड येथे जाण्याची संधी मिळाली.

१९२५ साली त्यांची कंबोडिया येथे नियुक्ती झाली. तिथे पोहोचताच, त्यांनी पाली भाषेतील श्रीलंकेच्या हस्तलिखिताचे, ख्मेर भाषेतील आवृत्तीसह एकत्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्याला 'कनिखावितरणी' म्हणतात. त्या 'नोम पेन्ह'च्या रॉयल लायब्ररीच्या पहिल्या अभिरक्षक (क्युरेटर) होत्या.

१९२९ साली त्यांनी कंबोडियामध्ये बौद्ध इन्स्टिट्यूटच्या स्थापनेची संकल्पना मांडली. आणि तिथे त्यांनी सेक्रेटरी-जनरल या पदावर काम पाहिले. []

त्यांनी कंबोडिया देशातील पहिले बौद्ध नियतकालिक प्रकाशित केले. फिरते ग्रंथालय प्रकल्प सुरू केला आणि कंबोडियातील प्रत्येक मठात ख्मेर लिपीतील टिपिटका वितरित करण्याची व्यवस्था केली.

श्रीअरविंद आश्रमात

[संपादन]

सुझान या श्रीमाताजी यांच्या अनुयायी होत्या. श्रीअरविंद आश्रमामध्ये त्या भारती-दी या नानाने ओळखल्या जात.[] १९५५ साली सुझान पॉन्डिचेरी येथे श्रीअरविंद आश्रमात राहायला गेल्या.[] तेथे जाण्यापूर्वी त्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या होत्या. [] आश्रमात त्या फ्रेंच भाषा आणि साहित्य शिकवत होत्या. शोभा मित्रा, सुप्रभा नहार इत्यादी विद्यार्थिनींना त्यांनी फ्रेंच शिकविले होते.[]

७ नोव्हेंबर १९६८ रोजी पॉन्डिचेरी येथे सुझान यांचे निधन झाले.[]

प्रकाशित लेखन

[संपादन]
  • अ फिंगर फ्रॉम द मून (हिंदू प्रेमकहाणी) (१९१९)
  • धम्मपदात्तकथ मधील सहा पाली कहाण्या (१९२४)
  • ॲन एपिसोड ऑफ द सयामीज रामायणा (१९२५)
  • ॲन एक्झाम्पल ऑफ इंडो-ख्मेर स्कल्प्चर (१९२८)
  • सिस्टर बेगर्स, ब्रदर्स बेगर्स ऑफ बुद्धिस्त डॉक्टरीन (१९३४) - पाली मधून अनुवादित
  • अ केस ऑफ इंटरनॅशनल मॅरीटाईम लॉ (१९४८)
  • इनिसिएशान टू द हिस्ट्री ऑफ हिंदू आर्ट (१९४८-१९४९)
  • धम्मपदाचे फ्रेंच भाषांतर (१९६०)
  • न्यानातिलोकाच्या बौद्ध शब्दकोशावरील काम (१९६१) []

पूरक

[संपादन]

सुझान यांनी केलेल्या अभ्यासाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "Suzanne Karpelès". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2024-10-12.
  2. ^ a b "Suprabha Nahar: In Memoriam by Anurag Banerjee – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2020-10-23. 2025-03-05 रोजी पाहिले.
  3. ^ Satprem (1979). Mother's Agenda (1964). 05. Paris: Institut de Recherches Évolutives.
  4. ^ Wolfson-Ford, Ryan (2024-05-27). "From The Library of Suzanne Karpelès: Jewels of Early Cambodian Buddhist Printing and Modernist Khmer and Pali Manuscripts | 4 Corners of the World". The Library of Congress. 2025-03-08 रोजी पाहिले.
  5. ^ Satprem (1981). Mother's Agenda (1968). 09. Paris: Institut de Recherches Évolutives.
  6. ^ "Living in The Presence - Book by Shobha Mitra : Read online". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-07 रोजी पाहिले.