Jump to content

सुजाता साहू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sujata Sahu (it); সুজাতা সাহু (bn); Sujata Sahu (fr); Sujata Sahu (da); Sujata Sahu (hr); Sujata Sahu (es); Sujata Sahu (ast); Sujata Sahu (nl); Sujata Sahu (en); सुजाता साहू (mr); ᱥᱩᱡᱟᱛᱟ ᱥᱟᱦᱩ (sat); ਸੁਜਾਤਾ ਸਾਹੂ (pa); সুজাতা চাহু (as); Sujata Sahu (de); సుజాతా సాహు (te); சுஜாதா சாகு (ta) Indian social entrepreneur (en); Indian social entrepreneur (en); Indiaas sociaal ondernemer (nl); entamadora social india (ast)
सुजाता साहू 
Indian social entrepreneur
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
व्यवसाय
  • social entrepreneur
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सुजाता साहू ही एक भारतीय सामाजिक उद्योजिका आहे. शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर, लडाख आणि सिक्कीममधील दुर्गम गावांमधील शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी तिने 17000ft फाउंडेशन नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या स्वयंसेवी संस्थेने संपूर्ण शालेय परिवर्तन प्रकल्प हाती घेतले आहेत. यासाठी शिक्षकांना कठोर प्रशिक्षण दिले. दुर्गम सीमावर्ती शाळांना ग्रंथालये, क्रीडांगणे आणि डिजीलॅब्स प्रदान करून दिले. साहू यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१५ चा नारी शक्ती पुरस्कार आणि २०१९ चा वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (WTI) पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कारकिर्द

[संपादन]

साहू नी अमेरिकेत नऊ वर्षे उद्योग क्षेत्रात (कॉर्पोरेट क्षेत्रात) काम केले. त्यानंतर ती गुरगांव येथे स्थलांतरित झाली. तिने दिल्लीच्या एनसीआर येथील श्री राम शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. या महाविद्यालयात तिने गणित आणि संगणक विज्ञान विषय शिकवले.[][][] जून २०१० मध्ये, ती लडाख मध्ये एकट्याने पर्वतारोहण केले. परंतु तिथे पोहोचल्यावर तिला फुफ्फुसाचा आजार झाला. सर्वसाधारण क्षेत्रातील व्यक्ती जेव्हा अती उंचीवर जाते हा आजार होत असतो. प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी ती एका दुर्गम गावात थांबली.[] तेथील परिस्थिती पाहून, तिने स्थानिक शाळेतील मुलांना आधुनिक सुविधा पुरवण्यासाठी एक गैर-सरकारी संस्था (एनजीओ) स्थापन करण्याचा निर्णय घेतला.[]

17000ft फाउंडेशन

[संपादन]

२०११ साली साहूने तिचे पती संदीप साहू आणि दावा जोरा यांच्यासोबत 17000ft फाउंडेशन नावाची sanstha स्थापन केली. तिने आपल्या एनजीओचे हे नाव समुद्रसपाटीपासून १७,००० फूट उंचीवर केलेल्या पर्वतारोहणावरून ठेवले.[] स्वयंसेवकांमार्फत अभ्यास आणि निरीक्षण करून तिने लडाखमधील ६०० शाळांची आखणी केली. या sansthene १४० शाळांना खेळाचे मैदान उपलब्ध करून दिले, २३० शाळांना ग्रंथालये दान केलीत. या ग्रंथालयात हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील पुस्तके आहेत. २०१५ मध्ये लडाखी भाषा, 'भोटी' मध्ये पुस्तके नसल्याने, या संस्थेने भाषांतरासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि २१,००० पुस्तके पुरवली.[] २०१३ मध्ये या संस्थेने व्हॉलंटूर कार्यक्रम सुरू केला, ज्यामध्ये स्वयंसेवक शिक्षकांची शाळांशी जोडणी करून दिली जाते.[] स्वयंसेवकांची संख्या दरवर्षी प्रति शाळा एकपर्यंत मर्यादित आहे.[] तिच्या सामाजिक उद्योजकतेसाठी तिला २०१५ चा नारी शक्ती पुरस्कार दिल्या गेला.[] २०१९ मध्ये, तिला नीती आयोगाने वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्काराने सन्मानित केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d Chakrabarty, Roshni (21 December 2018). "This Iron Lady's haunting Ladakh trek is helping her transform govt schools at 17000 ft". India Today (इंग्रजी भाषेत). 12 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 January 2021 रोजी पाहिले.
  2. ^ a b c Joshi, Komal (24 July 2020). "Making Education and Technology Reach the Remote Villages of Ladakh". The Stories Of Change. 10 January 2021 रोजी पाहिले.
  3. ^ a b Pais, Nichola. "Sujata Sahu: Transforming lives of thousands of children in remote Ladakh". Scoo News (इंग्रजी भाषेत). 12 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 January 2021 रोजी पाहिले.
  4. ^ Burman, Partho (8 November 2014). "A teacher treks to a high altitude desert, only to reach out to underprivileged students". The Weekend Leader (इंग्रजी भाषेत). 12 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 January 2021 रोजी पाहिले.
  5. ^ Ramesh, Rashmi (19 May 2018). "Take a break, opt for some 'me-time': Brilliant options to make solo travel a dream". The Economic Times. 12 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 January 2021 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]