सुखदेव सिंग धिंडसा
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | एप्रिल ९, इ.स. १९३६ संगरूर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मे २८, इ.स. २०२५ मोहाली | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
सुखदेव सिंग धिंडसा (९ एप्रिल, १९३६ - २८ मे, २०२५) हे राज्यसभेचे सदस्य होते. ते शिरोमणी अकाली दल (संयुक्त) चे एकेकाळी अध्यक्ष होते. या पक्षाची स्थापना धिंडसा यांनी केली होती. त्यांचा यापूर्वीचा पक्ष शिरोमणी अकाली दल (डेमोक्रॅटिक) आणि रणजितसिंग ब्रह्मपुरा यांचा शिरोमणी अकाली दल (टकसाली) यांच्या विलीनीकरणातून स्थापन करण्यात आला होता. मार्च २०२४ मध्ये त्यांनी शिरोमणी अकाली दल मध्ये त्यांचा पक्ष विलीन करत मूळ पक्षात परत प्रवेश केला. ते यापूर्वी पंजाबमधील संगरूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भारताच्या १४ व्या लोकसभेचे सदस्य होते. २६ जानेवारी २०१९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तथापि, डिसेंबर २०२० मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी हा पुरस्कार परत केला होता.[१]

सुखदेव सिंह धिंडसा यांचा जन्म ९ एप्रिल १९३६ रोजी पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील उबवाल गावात झाला. त्यांनी संगरूर येथील सरकारी रणबीर कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.[२]
२००० ते २००४ पर्यंत ते तिसऱ्या वाजपेयी मंत्रिमंडळात क्रीडा आणि रसायने आणि खते मंत्री होते. ते १९९८ ते २००४ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते त्यांचा मुलगा परमिंदर सिंग धिंडसा २०१२ ते २०१७ पर्यंत पंजाबचे अर्थमंत्री होते.[३]
राजकीय कारकीर्द
[संपादन]धिंडसा हे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे सहकारी राहिले आहेत. त्यांचे पुत्र परमिंदर सिंग धिंडसा हे देखील पंजाब सरकारमध्ये अर्थमंत्री राहिले आहेत. धिंडसा यांनी १९७२, १९७७, १९८० आणि १९८५ मध्ये अशा एकूण चार विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या. त्यांनी वाहतूक, क्रीडा, पर्यटन, सांस्कृतिक व्यवहार आणि नागरी विमान वाहतूक यासारख्या खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले होते. यासोबतच ते १९९८ ते २००४ आणि २०१० ते २०२२ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. सुखबीरसिंह बादल यांना पक्षात बढती देण्यात आली तेव्हा धिंडसा यांनी अकाली दल सोडले होते. त्यानंतर त्यांनी २०२१ मध्ये शिरोमणी अकाली दल (टकसाली) आणि शिरोमणी अकाली दल (लोकशाही) यांचे विलीनीकरण करून शिरोमणी अकाली दल (संयुक्त) ची स्थापना केली. यानंतर त्यांनी भाजपसोबत युतीही केली. मार्च २०२४ मध्ये त्यांनी या पक्षाचे शिरोमणी अकाली दलात विलीनीकरण केले. २०१४ मध्ये, संगरूर लोकसभा मतदारसंघात सुखदेव सिंह धिंडसा आणि भगवंत मान यांच्यात थेट लढत झाली होती. यामध्ये भगवंत मान जिंकले. ही त्यांची पहिलीच लोकसभा निवडणूक होती. भगवंत मान यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मान यांना ५,३३,२३७ आणि सुखदेव सिंह धिंडसा यांना ३,२१,५१६ मते मिळाली होती[२]
२०२४ साली, धिंडसा यांना श्री अकाल तख्त साहिबच्या जत्थेदारांनी धार्मिक शिक्षा दिली होती. त्यांनी व्हीलचेअरवर बसून दहा दिवस सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल म्हणून सेवा दिली.[२]
मृत्यू
[संपादन]धिंडसा यांचे २८ मे २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा यांचे निधन". दैनिक प्रभात. २८ मे २०२५ रोजी पाहिले.
- ^ a b c "अकाली दल के नेता सुखदेव सिंह ढींडसा का निधन:लंबे समय से बीमार थे, किसान आंदोलन के समर्थन में पद्म भूषण अवॉर्ड लौटाया था". दैनिक भास्कर (हिंदी भाषेत). २९ मे २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Parminder Singh Dhindsa". PTC News (इंग्रजी भाषेत). 2022-02-01. 2023-07-28 रोजी पाहिले.