Jump to content

सुखकर्ता दुःखहर्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुखकर्ता दुखहर्ता (म्हणजे सुख आणणारा व दुःख दूर करणारा), ही एक प्रसिद्ध मराठी आरती आहे. ती हिंदु देवता गणपतीला उद्देशून रचलेले काव्य आहे. हे पद समर्थ रामदास (१६०८ - १६८२) ह्यांनी लिहिले आहे. ही आरती पूजेच्या शेवटी म्हणण्यात आलेल्या आरत्यांपैकी पहिली असते म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात ही आरती गणेश चतुर्थीपासून उत्सव काळात किंंवा नित्य पूजेतही म्हटली जाते,

पूर्वभूमी

[संपादन]
संत समर्थ रामदास

गणेश हा बुद्धी ज्ञान, व नव्या प्रारंंभाचे हिंदू दैवत आहे. पुण्यातील अष्टविनायकांमधील एक, मयुरेश्वर, ह्या मोरगावातील गणपतीची मूर्ती पाहून ही आरती लिहिण्याची प्रेरणा समर्थ रामदास ह्यांना मिळाली असे मानले जाते. ही आरती जोगिया ह्या रागात रचली आहे.

अन्य आरतींप्रमाणे हीसुद्धा, प्राचीन मंत्रांप्रमाणे संस्कृतमध्ये लिहिलेली नसून, तिची रचना देशी भाषेमध्ये केली गेली आहे.

मजकुर व समालोचन

[संपादन]

सुखकर्ता दुखहर्ताची तीन कडवी आहेत, प्रत्येक कडव्यानंतर धृपद म्हणले जाते.

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥

अर्थ : गणपती कसा सुख आणतो व दुःख दूर करतो, ह्याने होते. पुढे गणपती कसा भक्ताचे जीवन प्रेमाने भरून टाकतो ह्याचे वर्णन केलेले आहे. साप्ताहिक ’लोकप्रभ”त विदित केल्याप्रमाणे, ह्या कडव्यातील नुरवी हा शब्द नुर्वी म्हणुन अनेकदा चुकीचा उच्चारला जातो.

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥धृ॥

ह्या कडव्यात गणपतीचे मंगलमूर्ती म्हणून वर्णन केले गेले आहे. या देवाचे केवळ दर्शन हे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते, असे सांगितले आहे.

पुजारी (डावीकडील, खाली) गणेशची आरती करताना

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी, कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

या दुसऱ्या कडव्यात गणपतीचे गौरी (पार्वती) पुत्र म्हणून वर्णन आहे. भर्पूर रत्‍ने असलेला फरा (एक दागिना) लावलेले त्याचे कपाळ चंदन, कुंकू, व केशर यांनी चोपडलेले आहे व तो हि्ऱ्याचे मुकुट व वाजणारे दागिने घालतो, असे वर्णन केलेले आहे.

लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥३॥

शेवटचं कडवं हे गणपतीचे पोट मोठे असल्याचे वर्णन करते. त्याने पितांबर नेसला आहे. त्याच्या कंबरेभोवती एका नागाचा बंध (कंबरपट्टा) आहे. या गणपतीला तीन डोळे असून त्याचे तोंड वाकडे पण सोंड सरळ आहे. गणपतीच्या मूर्तीला सहसा तिसरा डोळा नसतो, पण मोरगावच्या गणपतीला तो आहे. शेवटी, कवीचे नाव आहे, व दास रामदास हा देवाची वाट पाहतो आहे, असा उल्लेख आहे. ह्या कडव्यात गणपतीला, भक्त संकटात असतांना त्याला प्रसन्न होण्याची, व अखेरच्या क्षणी रक्षण करण्याची विनंती केली गेली आहे.

समकालीन सांगीतिक आवृत्त्या

[संपादन]

गणपतीचि ही आरती ही आरतीसाठी असलेल्या परंपरागत चालीत घरोघरी म्हटली जाते. पण १९७० साली लता-उषा मंगेषकरांनी नव्या चालीत ही आरती म्हटली, तीसुद्धा लोकप्रिय आहे. अनुराधा पौडवालने ही आरती तिच्या 'गणेश मंत्र' ह्या संकलनात गायली. विशाल राणे व समीर बंगारेने हे गीत त्यांच्या राॅक संगीत मैफिलीत सुरुवातचे गीत म्हणून गायले. बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटात ह्या गाण्याची एक आवृत्ती आहे, या चलचित्रात देवाच्या रूपात मणसाची मोठी कलाकृतिपूर्ण मांडणी दर्शवली गेली आहे.

हे ही पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]