सुकरी बोम्मागौडा
भारतीय लोक गायिका | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | इ.स. १९३७ उत्तर कन्नड जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | फेब्रुवारी १३, इ.स. २०२५ | ||
व्यवसाय | |||
| |||
![]() |
सुकरी बोम्मागौडा (१९३७ - १३ फेब्रुवारी, २०२५) ह्या भारतातील कर्नाटकातील अंकोला येथील हलक्की वोक्कलिगा जमातीतील लोक गायिका होत्या.[१] कलांमधील योगदानासाठी आणि पारंपारिक आदिवासी संगीताचे जतन करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी बोम्मागौडा यांना अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्मश्री पुरस्काराचा देखील समावेश आहे.[२]

जीवनी
[संपादन]बोम्मागौडा यांचा जन्म उत्तरा कन्नडमधील बडिगेरी येथील हलक्की वोक्कलिगा जमातीत झाला होता. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. या जोडप्याच्या पोटी दोन मुले जन्माला आली. तसेच त्यांनी आणखी एक मूल दत्तक घेतले.[३]
बोम्मगौडा यांना लहानपणी त्यांच्या आईने गाणे गायला शिकवले होते. याच छंदातून त्यांनी हलक्की वोक्कालिगा जमातीचे पारंपारिक संगीत आणि गाणी जपण्याचे काम केले.[३] पतीच्या मृत्यूनंतर, बोम्मागौडा यांनी कर्नाटकातील हलक्की वोक्कालिगा जमातीचे पारंपारिक संगीत सादर करण्यास सुरुवात केली.[४] स्वतःच्या जमातीतील लोकांना त्या पारंपारिक संगीत आणि गाणी शिकवत असत.[३] ज्यामुळे त्यांना "हलक्कीची कोकिळा" असे संबोधले जाऊ लागले.[५][६] मौखिक परंपरेचा भाग म्हणून आदिवासी गाण्यांचा मोठा संग्रह जतन करण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल बोम्मगौडा यांना सार्वजनिकरित्या मान्यता देण्यात आली.[७][८] भारताचे राष्ट्रीय प्रसारण ऑल इंडिया रेडिओ आणि कर्नाटक जनपद अकादमी हे बोम्मगौडा यांच्यासोबत या गाण्यांचे रेकॉर्डिंग, भाषांतर आणि जतन करण्यासाठी काम करत होते.[७]
१९८८ मध्ये कर्नाटक राज्य सरकारने बोम्मागौडा यांच्या कामाची दखल घेतली. ज्यामुळे कला आणि संगीतातील योगदानासाठी त्यांना अनेक राज्य पुरस्कार आणि सन्मान प्रदान करण्यात आले. ज्यात नादोजा पुरस्कार आणि जनपद श्री पुरस्कार यांचा देखील समावेश आहे.[३] २०१७ मध्ये, संगीतातील योगदानासाठी त्यांना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[३]
संगीतातील त्यांच्या कामाव्यतिरिक्त, बोम्मगौडा कर्नाटकातील बडिगेरी येथील ग्रामपंचायत सदस्य देखील बनल्या.[३] स्वतः निरक्षर असूनही, त्यांनी साक्षरतेसाठी, विशेषतः मुलींमध्ये, मोहीमा राबवल्या. एकदिवस दारू मधून झालेल्या विषबाधेमुळे त्यांच्या दत्तक मुलाचा मृत्यू झाला. ज्यामुळे स्वतःच्या परिसरात दारू बंदीसाठी देखील त्यांनी मोहीमही राबवली.[३]
मृत्यू
[संपादन]बोमागौडा यांचे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी कर्नाटकातील मणिपाल येथील रुग्णालयात निधन झाले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यू समयी त्या ८८ वर्षाच्या होत्या.[९]
पुरस्कार
[संपादन]वर्ष | पुरस्कार | संदर्भ |
---|---|---|
१९८८ | कर्नाटक सरकारकडून पुरस्कार ("स्वदेशी जमातींच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी") | [३] |
१९९९ | जनपद श्री पुरस्कार (कर्नाटक सरकारकडून कला क्षेत्रातील योगदानासाठी) | [१०] |
२००६ | नादोजा पुरस्कार (कन्नड विद्यापीठाकडून दिला जातो) | [३] |
२००९ | संदेशा कला पुरस्कार, अल्वा नुडिसिरी पुरस्कार | |
२०१७ | पद्मश्री पुरस्कार | [३] |
लोकप्रिय संस्कृतीत
[संपादन]कर्नाटकातील माध्यमिक शाळेच्या पाठ्यपुस्तकात बोम्मगौडा यांचे संगीतातील योगदानाबद्दल वर्णन केले आहे. [३]
संदर्भ
[संपादन]- ^ Correspondent, Special (2022-05-08). "Sukri Bommagowda continues to be stable". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-06-14 रोजी पाहिले.
- ^ "PM Modi meets inspiring Padma recipients Tulsi Gowda, Sukri Bommagowda from Karnataka - CNBC TV18". CNBCTV18 (इंग्रजी भाषेत). 2023-05-03. 2024-06-14 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f g h i j k "Unsung hero of Karnataka, Sukri Bommagowda wins Padma Shri award". The News Minute (इंग्रजी भाषेत). 2017-01-25. 2020-10-06 रोजी पाहिले.
- ^ "Padma award winners from Karnataka are an eclectic mix". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2017-01-25. ISSN 0971-751X. 2020-10-06 रोजी पाहिले.
- ^ Hebbar, Nistula; Singh, Vijaita (2017-01-25). "Padma Vibhushan for Pawar, M.M. Joshi, Yesudas; Kohli to get Padma Shri". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2020-10-06 रोजी पाहिले.
- ^ "PV Sindhu, Sakshi Malik to be in Padma Bhushan list". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-01-24. 2020-10-06 रोजी पाहिले.
- ^ a b TNN (26 January 2017). "Padma: Padma for these pearls of Karnataka". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-10-06 रोजी पाहिले.
- ^ Rao, Sunitha R. (31 October 2014). "Live singing is the secret of Sukri's success". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-10-06 रोजी पाहिले.
- ^ "Padma Shri-winning Karnataka folk singer Sukri Bommagowda passes away" (इंग्रजी भाषेत). १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Profile of recipients of 'Janapada Shri Awards'". Government of Karnataka. 2020-10-06 रोजी पाहिले.