सुंदर बटवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुंदर बटवा (पक्षी) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
सुंदर बटवा
सुंदर बटवा

सुंदर बटवा (इंग्लिश: Common Teal) हा एक पक्षी आहे. सोनुली किंवा खैरा बड्डा या नावानेही हा पक्षी ओळखला जातो आणि हिंदीत या पक्ष्याला चैती, पतारी, लोहिया किर्रा, सौचुरूक ही नावे आहेत.

सुंदर बटवा बदकापेक्षा लहान असतो व वनकीपेक्षा मोठा असतो. नराच्या अंगावर करड्या रंगाच्या दाट काड्या असतात. डोके तांबूस व डोळ्यांपासून मानेपर्यंत हिरव्याकंच रंगाचा पट्टा असतो. पत्त्याला पांढरी किनार असते. त्यांचे पंख उडताना काळे, हिरवेबदामी असे ठळक तिरंगी दिसू लागतात. मादीच्या अंगावर गडद व फिकट रंगाचे ठिपके दिसतात. खालील भाग पिवळसर असतो. उडताना पंख काळे व हिरवे असे दोन रंगी दिसतात. सुंदर बटवा हा भारत, श्रीलंका, मालदीव आणि अंदमान तसेच निकोबार बेटात हिवाळाी पाहुणे असतात. सुंदर बटवा झिलानी व सरोवरे या ठिकाणी आढळतात.

ओळख[संपादन]

सुंदर बटवा

बदकापेक्षा लहान. वनकिपेक्षा मोठा. नराच्या अंगावर करडया रंगाच्या दाट काडय.डोके तांबूस डोळ्यांपासून मानेपर्यंत हिरव्याकंचरंगाचा पट्ट. पट्ट्याला पांठरी किनार. उडताना पंख काळे,हिरवे व बदामी असे ठळक तिरंगी दिसू लागते मादीच्या अंगावर गडद व फिकट रंगाचे ठिपके. खालील भाग पिवळसर उडताना पंख काळे व हिरवे असे दुरंगी दिसतात.

वितरण[संपादन]

सुंदर बटवा

भारत, श्रीलंका, निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे असतात. युरोप, आशिया, जपान येथे वीण.

Anas crecca

निवासस्थाने[संपादन]

झिलानी आणि सरोवरे.

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली