डग्लस सी-१२४ ग्लोबमास्टर २
Appearance
(सी.१२४ या पानावरून पुनर्निर्देशित)
डग्लस सी-१२४ ग्लोबमास्टर २ हे अमेरिकेच्या डग्लस कंपनीने (आता बोईंगमध्ये विलीन) तयार केलेले चार टर्बोप्रॉप इंजिने असलेले सैनिकी मालवाहू विमान होते. अतिअवजड सामानाची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या विमानाची बांधणी लॉंग बीच, कॅलिफॉर्निया येथे व्हायची.
याची रचना डग्लस कंपनीच्याच डग्लस सी-७४ ग्लोबमास्टर या विमानावर आधारित होती. याला लावण्यात येणारी प्रॅट अँड व्हिटनी आर-४३६० प्रकारची चार मोठी इंजिने प्रत्येकी ३,८०० हॉर्सपॉवर (२,८०० किलोवॅट) इतका जोर लावीत असे. यातून एकावेळी ३१,१०० किलोग्रॅम वजन वाहून नेता येत असे. याला ओल्ड शेकी असे टोपण नाव दिले गेले होते.