सीरियातील भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


अरबी ही सीरियाची अधिकृत भाषा असुन सिरीयामधे ती सर्वाधिक प्रमाणात बोलली जाते. रोजच्या वापरत अनेक अरबी बोलीभाषा वापरल्या जातात, विशेषत: सिरियातील पश्चिमेकडील भागात लेव्हान्टाईन आणि उत्तरभागात मेसोपोटेमिया भाषा बोलली जाते. अरबी भाषेच्या एन्सायक्लोपिडियानुसार अरबी व्यतिरिक्त कुर्दिश, तुर्किश, नियो-अरामाईक (चार बोलीभाषा), सर्कसियन, चेचन, आर्मेनियन, आणि शेवटी ग्रीक या भाषा बोलल्या जातात.

इतिहासातील नोंदीप्रमाणे अरैमिक अरबी भाषेच्या आधी या भागात अरमेनिक भाषा बोलली जायची, आजदेखील अस्सिरींयन्स लोकांमध्ये अरमेनिक भाषा बोलली जाते आणि तसेच शास्त्रीय सिरियाक भाषा अजूनही अनेक सिरियाक ख्रिश्चन संप्रदायांत धार्मिक भाषा म्हणून वापरली जाते. निओ-अरामाईक भाषा अजूनही माउलोला आणि दमास्कसच्या ५६ किलोमीटर (३५ मील) पूर्व भागातील दोन गावांमध्ये बोलली जाते.

सीरियन साइन हि भाषा बहिरा समाजाची मुख्य भाषा म्हणून ओळखली जाते. [१]

अरेबिक[संपादन]

आधुनिक अरबी भाषा ही सिरीयामधे शिक्षणासाठी तसेच रोजच्या दैनंदिन जीवनात वापरली जाणारी भाषा आहे. सिरियातील बहुतेक घरांमद्धे सिरियन लेवाँटिन अरबी भाषेचा वापर होतो, तसेच सिरियातील प्रसिद्धी माध्यमांमधे प्रामुख्याने अरबीभाषेचा वापर केला जातो, दमिश्क, होम्स, हामा तसेच टार्टस शहरात बोलल्या जाणाऱ्या भाषांमधे उत्तरेकडील प्रदेशापेक्षा अधिक साम्य आढळते. किनारपट्टीच्या डोंगराळ भागात मित्र-भाषेतील बोलीभाषा बोलल्या जातात. सीरियनसह लेबनानी अरबीला उत्तर लेव्हान्टाइन अरबी (आयएसओ 639-3 भाषा कोड एपीसी) म्हणून वर्गीकृत केले आहे. लेबनान ही विशेषतः दक्षिणी सीरियन बोलीभाषा आहे, परंतु पॅलेस्टिनी अरबीवर त्याचा अधिक प्रभाव पडतो.

सीरियाचा बहुसंस्कृतीवाद आणि विदेशी साम्राज्यवादांचा दीर्घ इतिहास यामुळे तुर्की, कुर्दिश, आर्मेनियन, सिरियाक, फ्रेंच, इंग्रजी आणि फारसी भाषेतील शब्दांचा आधार येथील भाषेमधे आढळतो.

सीरियामध्ये मूळरित्या बोलल्या जाणाऱ्या भाषा पुढीलप्रमाणे :

 • जबल अल-ड्रुझ (जबल अल-अरब) पर्वतीय क्षेत्रात बोलली जाणारी भाषा.
 • मेसोपोटेमियन अरबीचा भाग (याला बहुधा "उत्तर सीरियन अरेबिक" असे म्हटले जाते) या भागाची पूर्व बोलीभाषा (अल-हसाका, अल-रक्क़ा, आणि देइर ईझ-ज़ोर);
 • बेडौई अरेबिक, बेदौईन (नोमाड) यांच्याकडून बोलली जाणारी भाषा. [२] [३]


कुर्दिश[संपादन]

कुर्दिश (विशेषतः कुर्मनजी) ही सीरियामधील दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी बोलीभाषा आहे. कुर्दिश या अल्पसंख्यांक देशाच्या उत्तरपूर्वी आणि उत्तरपश्चिम भागात बोलली जाते. [४]

तुर्कीश[संपादन]

सीरियामध्ये बोलली जाणारी तुर्की ही तिसरी सर्वात मोठी भाषा आहे. तुर्कमेनिस्तान / तुर्कमेन अल्पसंख्यकांमद्धे, युफ्रेटीसच्या सीरिया आणि सीरियन-तुर्कच्या सीमेजवळ असलेल्या भागामध्ये तुर्की भाषा बोलली जाते. याव्यतिरिक्त कलामम क्षेत्र आणि होम्स क्षेत्रातील बेटे यावर तुर्की भाषा बोलली जाते, याशिवाय, सीरियन अरबी बोलीभाषांनी तुर्किशमधून विशेषतः तुर्क भाषेतील अनेक शब्द घेतलेले आहेत. [५]

अरामीक[संपादन]

सीरियामध्ये निओ-अरामीकच्या चार बोलीभाषा बोलल्या जातात, न्यु-वेस्ट अरामाईक दमास्कसजवळ (मालाउला सहित ) तीन गावांमध्ये हि भाषा बोलली जाते. तूरोयो भाषा बोलणारे तूर अब्दिन हे अल-हसाकह येथील प्रांतात स्थायिक झाले आहेत. [६]

सर्कसियन[संपादन]

अलेप्पोच्या दक्षिणेस तसेच होम्स भागात आणि गोलान हाइट्सच्या काही गावांमध्ये सर्कसियन भाषा बोलल्या जातात. विशेषतः, कबार्डियन या अल्पसंख्यांकाद्वारा सर्कसियन भाषा बोलली जाते. [७]

चेचन[संपादन]

खबुर नदीच्या बाजूस वसलेल्या दोन अल्प्संखांक गावांमध्ये चेचन भाषा बोलली जाते. [८]

आर्मेनियन[संपादन]

अलेप्पो आणि इतर प्रमुख शहरांतील आर्मेनियन समुदायामध्ये आर्मेनियन भाषा बोलली जाते. अरमेनियन हा असं एकमात्र समुदाय आहे ज्यांनासिरीयामधे अरबी भाषेशिवाय स्वत: च्या भाषेत शिकवण्याची परवानगी दिली जाते. [९]

ग्रीक[संपादन]

सीरियामध्ये काही ग्रीक भाषिक लोक आहेत. प्रामुख्याने क्रेतन मुस्लिमान आणि अल-हामियादि लोकांतर्फे हि भाषा बोलली जाते. या लोकांनी त्यांच्या शाळांमध्ये ग्रीक शिकविण्याची मागणी केली होती परंतु मुस्लीम असल्याचे कारण देत त्यांची मागणी राज्याने नाकारली. [१०]

परकीय भाषा[संपादन]

इंग्रजी आणि फ्रेंच या भाषा बहुतेक शहरी आणि शिक्षित भागातील सिरीयन लोकांना समजतात.

संदर्भ[संपादन]

 • इंग्रजी विकिपीडिया
 • ^ "What Languages Are Spoken in Syria?". WorldAtlas (en मजकूर). 2018-12-04 रोजी पाहिले. 
 • ^ "The Languages spoken in Syria". Studycountry (en-US मजकूर). 2018-12-04 रोजी पाहिले. 
 • ^ "Syria". Ethnologue (en मजकूर). 2018-12-04 रोजी पाहिले. 
 • ^ "Who are the Kurds?". BBC News (en-GB मजकूर). 2017-10-31. 2018-12-04 रोजी पाहिले. 
 • ^ Ashawi, Khalil. "Falling lira hits Syrian enclave backed by Turkey". U.S. (en-US मजकूर). 2018-12-04 रोजी पाहिले. 
 • ^ Miller, Judith. "ARAMAIC, JESUS' LANGUAGE, IS STILL SPOKEN IN SYRIA" (en मजकूर). 2018-12-04 रोजी पाहिले. 
 • ^ "What languages do Syrians speak? - SyriaHR.org". SyriaHR.org (en-US मजकूर). 2018-05-07. 2018-12-04 रोजी पाहिले. 
 • ^ Muysken, Pieter (2008-02-06). From Linguistic Areas to Areal Linguistics (en मजकूर). John Benjamins Publishing. आय.एस.बी.एन. 9789027291363. 
 • ^ "Armenian language". Encyclopedia Britannica (en मजकूर). 2018-12-04 रोजी पाहिले. 
 • ^ "Hellenic Electronic Center - ServerGR01". www.greece.org. 2018-12-04 रोजी पाहिले.