Jump to content

सीमा मेहता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
সীমা মেহতা (bn); Seema Mehta (fr); Seema Mehta (de); Seema Kaushik Mehta (nl); Seema Kaushik Mehta (en); सीमा मेहता (mr); ᱥᱤᱢᱟ ᱢᱮᱦᱛᱟ (sat); సీమా మెహతా (te); সীমা কৌশিক মেহতা (as); Seema Kaushik Mehta (sq); ಸೀಮಾ ಮೆಹ್ತಾ (kn); சீமா கெளசிக் மேத்தா (ta) Karatha expert in India (en); Karatha expert in India (en); Indiaas danseres (nl); இந்திய கதக் நடனக் கலைஞர் (ta) Seema Mehta (en); सीमा कौशिक मेहता (mr); Seema Kaushik Mehta (fr)
सीमा मेहता 
Karatha expert in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखc. इ.स. १९७६
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • अकॅडमी ऑफ आर्ट्स युनिव्हर्सिटी
व्यवसाय
  • नर्तक / नर्तकी
  • jewelry designer
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सीमा कौशिक मेहता (जन्म:सुमारे १९७६) ही एक भारतीय कथक तज्ञ आणि दागिन्यांची डिझायनर आहे. मुंबईतील वंचित मुलांसोबत काम केल्यानंतर तिला २०१९ मध्ये तिच्या नृत्य कलेसाठी तिला नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना

जीवन

[संपादन]
'लीला डान्स कलेक्टिव्ह'साठी नृत्य करताना मेहता (२०१९)

तिचा जन्म सुमारे १९७६ मध्ये झाला[] आणि तिने सॅन फ्रान्सिस्कोमधील अकादमी ऑफ आर्ट कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.[]

२०१० मध्ये ती चित्रेश दास यांची शिष्या बनली आणि २०१५ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या शिकणुकचे तिने पालन केले. तिने दास यांच्याकडून विशिष्ट नृत्य शैलीचे प्रशिक्षण घेतले आणि त्याच शैलीचे नृत्य भारतात सादर केले.[] तिने आणि दास यांनी २०१० मध्ये त्यांच्या शाळेची दुसरी शाखा मुंबई येथे 'छंदम नृत्य भारती' या नावाने स्थापन केली. मेहतांच्या गुरूंनी कोलकात्यातील सेक्स वर्कर्सच्या मुलांना शोषणाच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी त्यांना कथ्थक नृत्य शिकवले होते.[]

२०१९ मध्ये जागतिक महिला दिनी मेहता यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[] या पुरस्कारासाठी १००० महिलांचे नामांकन झाले होते आणि त्यापैकी ४४ महिलांची त्यातून निवड करण्यात आली होती. मुंबईतील वंचित मुलांसोबत काम केल्यामुळे मेहताची निवड झाली. ही मुले केवळ हौस म्हणून नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहताच्या शाळेत नृत्य शिकत होते.[]

मेहता अमेरिकन टॅप डान्सर जेसन सॅम्युअल्स स्मिथसोबत दिसली. सॅम्युअल्स स्मिथने यापूर्वी तिच्या गुरूसोबत दौरा केला होता. कथक आणि टॅप नृत्य एकमेकांना पूरक मानले जातात. कारण या दोन्हीही नृत्य शैलीत पायांचा वापर केला जातो. परंतु या दोन नृत्य शैलीत एक मुख्य फरक आहे आणि तो म्हणजे कथक नृत्य अनवाणी पायांनी केले जाते.[]

कबीर सांस्कृतिक केंद्रात कथक सादर करताना

दागिने

[संपादन]

'छंदम नृत्य भारती' ही शाळा चालवण्या सोबतच मेहताला दागिने निर्मितीतील कल्पकतेत देखील रस आहे. तिच्या मते, दागिन्यांची रचना आणि नृत्य हे दोन्हीही तिच्या आयुष्याचा भाग आहेत. कारण दागिने बनवणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. ती तिच्या कुटुंबाच्या दागिना निर्मितीच्या व्यवसायात सर्जनशील संचालिका (क्रिएटिव्ह डायरेक्टर) आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Pawar, Yogesh (2019-03-24). "Seema Mehta on receiving the President's award for teaching kathak to underprivileged girls". DNA India (इंग्रजी भाषेत). 2020-06-08 रोजी पाहिले.
  2. ^ a b Purushothaman, Kirubhakar (2017-03-02). "Sparkles are her business". The Asian Age. 2020-06-08 रोजी पाहिले.
  3. ^ Mumbai Mirror (2011-06-11). "Kathak dancer Seema Mehta performs". The Times of India. 2021-01-15 रोजी पाहिले.
  4. ^ "Umrao Jaan, the story untold". www.telegraphindia.com (इंग्रजी भाषेत). 2020-06-08 रोजी पाहिले.
  5. ^ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2020-06-08 रोजी पाहिले.
  6. ^ "Watch how tap dance and kathak blend on NCPA stage". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-01-20. 2020-06-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]