सिमला शिष्टमंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १८९२ च्या सुधारणा कायद्याने राष्ट्रीय सभेला काहीही सुधारणा न मिळाल्याने या सभेने निरनिराळ्या अधिवेशनामधून वाढत्या प्रमाणात सुधारणाची मागणी सुरू केली. अर्ज - विनंत्याद्वारे सुधारणा मिळू शकणार नाहीत ; संघर्ष करूनच आपले अधिकार मिळवावे लागतील ; असे विचार मांडणारा जहालमतवादी गट राष्ट्रीय सभेत प्रभावी बनला. क्रांतिकारकाच्या चळवळी वाढू लागल्या. शासनाने काही घटनात्मक सुधारणा देऊन जहालाना दूर राखण्याचे धोरण आखले. मात्र या सुधारणा देताना मुस्लिम समाज राष्ट्रीय सभेपासून अलग राहील , याची व्हाइसराॅय लाड॔ मिंटो याने दक्षता घेतली. नव्या सुधारणा कायद्याने निवडणुकीचे तत्त्व लागू केल्यास एकही मुसलमान कायदे मंडळात निवडून येणार नाही , याची मुस्लिमांना धास्ती वाटू लागली . त्यामुळे मुस्लिमांची स्वतंत्र राजकीय संघटना असावी , तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदार संघ असावा अशी मागणी वाढू लागली. आपल्या मागण्याचे एक निवेदन व्हाइसराॅयला सादर करण्याकरता मुस्लिम शिष्टमंडळाने व्हाइसराॅयची भेट मागितली . लाड॔ मिंटोने आपल्या अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने ही भेट सिमला येथे व्हावी व शिष्टमंडळाने मुस्लिम समाजाच्या राजकीय मागण्या आपणास सादर कराव्यात, अशी व्यवस्था केली. १ ऑक्टोबर १९०६ रोजी सर आगाखान व अलिगढ कॉलेजचे सेक्रेटरी नबाब मोह्शीन -उल -मुल्क यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ व्हाइसराॅयला सिमला येथे भेटले. त्यांनी त्या वेळी दिलेल्या निवेदनात मुस्ल्मानासाठी स्वतंत्र मतदार संघ हवेत ; त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात नव्हे तर राजकीय महत्त्वानुसार कायदे मंडळात व इतर प्रातिनिधिक संस्थात जागा दयाव्यात; मुस्लिमासाठी सरकारी नोकऱ्यात राखीव जागा ठेवाव्यात व व्हाइसराॅयच्या मंडळातही मुस्लिमांना काही जागा दयाव्यात अशी मागणी केद्लीयावे . या मागण्या म्हणजे लाड॔ मिंटोने अवलंबलेल्या धोरणाचीच फळे होती. त्याने या शिष्टमंडळाचे अतिशय उत्साहाने स्वागत केले. शिष्टमंडळाला गार्डन पार्टी दिली. या वेळी त्याने कायदे मंडळावर इतर प्रतिनिधी घ्यावयाचे असतील तर मुस्लिम समाजास वेगळा समाज म्हणून निवडणूकीचा हक्क असावा ; तसेच मुस्लिम समाजाने पाठवावयाच्या प्रतिनिधीची संख्या लोकसंख्येवर अवलंबून ठेवता त्या समाजाचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा प्रतिनिधीत्व द्यावे या मागण्यांना सहमती दर्शविली .