Jump to content

सिग्नल इडूना पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्टफालेनस्टेडियॉन
Westfalenstadion
पूर्ण नाव सिग्नल इडूना पार्क
स्थान डॉर्टमुंड, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी
उद्घाटन २ एप्रिल, इ.स. १९७४
पुनर्बांधणी १९९२, १९९९, २००३, २००६
बांधकाम खर्च २० कोटी युरो
आसन क्षमता ५१,५००
संकेतस्थळ संकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
बोरूस्सिया डोर्टमुंड

सिग्नल इडूना पार्क (जर्मन: Signal Iduna Park) किंवा वेस्टफालेनस्टेडियॉन जर्मनी देशाच्या डॉर्टमुंड शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. सिग्नल इडूना नावाच्या विमा कंपनीने ह्या स्टेडियमचे प्रायोजन केल्यामुळे हे नाव दिले गेले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ६५,७१८ इतकी प्रेक्षक क्षमता असलेले सिग्नल इडूना पार्क हे जर्मनीतील सर्वात मोठे व युरोपमधील सर्वात प्रसिद्ध स्टेडियम्सपैकी एक आहे.

१९७४२००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून बोरूस्सिया डोर्टमुंड हा फुटबॉल क्लब आपले यजमान सामने खेळतो.

२००६ फिफा विश्वचषक

[संपादन]
तारीख वेळ संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षक
१० जून २००६18.00त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो00स्वीडनचा ध्वज स्वीडनगट ब62,959
१४ जून २००६21.00जर्मनीचा ध्वज जर्मनी10पोलंडचा ध्वज पोलंडगट अ65,000
१९ जून २००६15.00टोगोचा ध्वज टोगो02स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडगट ग65,000
२२ जून २००६21.00जपानचा ध्वज जपान14ब्राझीलचा ध्वज ब्राझीलगट फ65,000
२७ जून २००६17.00ब्राझीलचा ध्वज ब्राझील30घानाचा ध्वज घानाउप-उपांत्यपूर्व फेरी65,000
४ जुलै २००६21.00जर्मनीचा ध्वज जर्मनी02इटलीचा ध्वज इटलीउपांत्यफेरी65,000
सिग्नल इडूना पार्कचे विस्तृत चित्र

बाह्य दुवे

[संपादन]