सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया 
SEBI is regulator for securities markets in India
SEBI Bhavan.jpg
सेबी ईमारत
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
प्रकारसरकारी संस्था
स्थान भारत
मुख्यालयाचे स्थान
स्थापना
  • इ.स. १९९२
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
সিকিউরিটি অ্যান্ড এক্সচেঞ্জ বোর্ড অফ ইন্ডিয়া (bn); sebi (gu); sebi (te); ଭାରତୀୟ ପ୍ରତିଭୂତି ଓ ବିନିମୟ ବୋର୍ଡ଼ (or); സെക്യൂരിറ്റീസ് ആന്റ് എക്സ്ചേഞ്ച് ബോർഡ് ഓഫ് ഇന്ത്യ (ml); सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (mr); Совет по ценным бумагам и биржам Индии (ru); भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (hi); ಭಾರತೀಯ ಬಂ‍‍ಡವಾಳ ಪತ್ರಗಳು (kn); ਭਾਰਤ ਦਾ ਜ਼ਾਮਨੀ ਅਤੇ ਵਟਾਂਦਰਾ ਬੋਰਡ (pa); চিকিউৰিটিজ এণ্ড এক্সচেঞ্জ ব’ৰ্ড অফ ইণ্ডিয়া (as); Securities and Exchange Board of India (en); 印度證管會 (zh); இந்திய பங்கு மற்றும் பரிவர்த்தனை வாரியம் (ta) SEBI is regulator for securities markets in India (en); SEBI is regulator for securities markets in India (en) सिक्योरिटीज़ एवं एक्स्चेंज बोर्ड, सेबी (hi); ଭାରତୀୟ ପ୍ରତିଭୁତି ଓ ବିନିମୟ ବୋର୍ଶ଼, ସେବି, ସିକ୍ୟୁରିଟିଜ ଏଣ୍ଡ ଏକ୍ସଚେଞ୍ଜ ବୋର୍ଡ଼ ଅଫ ଇଣ୍ଡିଆ (or); भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ, सेबी, सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (mr); സെബി (ml); செபி, இந்திய ஈடுகள் மற்றும் சந்தை வாரியம் (ta)

सिक्‍युरिटीज ॲन्ड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ( सेबी ) ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे.

इतिहास[संपादन]

भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने दोन कायदे संमत केले होते.

तरीसुद्धा भांडवल बाजारात अनेक दोष/उणीवा होत्या. १९८० नंतर भांडवल बाजाराचा विस्तार लक्षणीय होता परंतु शिस्तबद्ध नव्हता. म्हणून सरकारला भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण व विकास घडवून आणण्यासाठी एक स्वतंत्र संस्था असावी अशी गरज भासत होती. त्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली.

स्थापना[संपादन]

जी.एस. पटेल समितीच्या शिफारसीच्या आधारावर एक अवैधानिक संस्था म्हणून १२ एप्रिल १९८८ रोजी सेबी ची स्थापना करण्यात आली. ३१ जानेवारी १९९२ रोजी सेबीला वैधानिक दर्जा व विस्तृत अधिकार देण्यासाठी राष्ट्रपतीचा वटहुकूम प्रसिद्ध करण्यात आला. कालांतराने 'सेबी बिल' संसदेत संमत करण्यात येऊन ३१ मार्च १९९२ पासून सेबीला स्वायत्त व वैधानिक दर्जा देण्यात आला. एप्रिल १९९८ मध्ये भारत शासनाने सेबीला संपूर्ण भांडवली बाजाराचा नियंत्रक म्हणुन घोषित केलेले आहे .सेबीचे मुख्यालय मुंबईला असून कोलकाता, दिल्ली व चेन्नईला तिची विभागीय कार्यालये आहेत.

सेबीचे व्यवस्थापन सहा सदस्यीय संचालक मंडळामार्फत केले जाते.

निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रेय शंकर सोमण हे सेबीचे काही काळ सल्लागार होते. आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी काय करता येईल याविषयी 'सेबी'ला त्यांनी सल्लागाराच्या भूमिकेत मदत केली. यामुळे 'सेबी' बळकट झाली आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्यात यशस्वी झाली.अजय त्यागी हे सध्या सेबीचे चेअरमन आहेत

सेबीची उद्दिष्टे[संपादन]

  • कंपन्या / संस्था यांना आपल्या प्रतिभूतींच्या(शेअर्स,डिबेंचर्स इ.) विक्रीसाठी योग्य वातावरण निर्मिती करणे.
  • गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण करणे.
  • सर्व रोखे बाजाराच्या व्यवस्थापनावर परिणामकारक नियंत्रण ठेवणे.
  • रोखे बाजारात व्यवहार करणाऱ्यांसाठी आवश्यक,योग्य व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील राहणे. तसेच रोखे बाजारांचा कारभार स्पर्धात्मक व व्यावसायिक तत्त्वांवर चालण्यासाठी वातावरण निर्मिती करणे.

सेबीची कार्यपद्धती -

१) सेबी तीन घटकांसाठी काम करीत असते

अ) प्रतिभूती निर्गमक

ब) गुंतवणूकदार

क) बाजारातील मध्यस्थ आणि बाजार

सेबीची महत्वाची कार्ये

१) कार्यकारी प्रमुख म्हणून सेबी गैरव्यवहारांची तपासणी आणि त्यावर कारवाई करते.  

२) कायदेपालक म्हणून नियंत्रणाचे सर्व कायदे करण्याचा सेबीला अधिकार देण्यात आला आहे.  

३) न्यायालयीन प्रमुख म्हणुन घोषणा ,नियम,आदेश काढण्याचा सेबीला अधिकार आहे .