Jump to content

सिंधू लिपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंधू लिपी ही सिंधू संस्कृतीची लिपी म्हणून ओळखण्यात येते. सिंधू संस्कृती सन १९२१ साली उजेडात आली.पंजाब मधील हडप्पा मध्ये जे उत्खनन करण्यात आले त्यामध्ये सिंधू संस्कृतीचे स्वरूप समजले.दयाराम सहानी ह्यांचा त्यात सहयोग होता.राखालदास बँनर्जी ह्यांनी सन १९२२ मध्ये मोहेंजोदडो चा शोध लावला.स्वातंत्र्यानंतर ही दोन्ही नगरे पाकिस्तानात गेली. परंतु भारतात राजस्थान आणि गुजरात मध्येही बऱ्याच ठिकाणी सिंधू संस्कृतीच्या खुणा सापडल्या आहेत. सिंधू संस्कृतीचे तीन कालखंड आढळले आहेत.

  1. आद्य
  2. नागरी
  3. उत्तर

हे कालखंड साधारणपणे इसवी सन पूर्व ३२०० ते १५०० असे समजले जातात. ह्या तिन्ही कालखंडात सिंधू लिपी आढळून येते. सिंधू लिपी ही ढोबळमानाने एका पुढे एक काढलेली चित्रमाला ह्या स्वरूपात आहे. उत्खननात जे शिलालेख सापडले त्यावर ती कोरलेली आढळते. शिलालेखांप्रमाणेच व्यापाऱ्यांच्या मुद्रावर ही लिपी आढळली आहे. ह्या मुद्रा मेसोपोटेमिया मध्ये सापडल्या आहेत. आताचा इराक हाच पूर्वीचा मेसोपोटेमिया होय. ही लिपी वेगवेगळ्या चौकोनी आणि आयताकृती मुद्रांवर सापडली आहे.वरच्या बाजूला अक्षरे तर खालच्या बाजूला प्राणी चित्र असे लिपीचे स्वरूप आढळून आले आहे. मातीच्या मुद्रांवर फक्त अक्षरे आढळली आहेत. अद्याप ही लिपी वाचणे शक्य झालेले नाही. लिपी वाचण्यासाठी तिच्या खुणा किंवा भाषा ओळखीची पाहिजे. ब्राह्मी आणि इजिप्त ची चित्रलिपी ह्या प्राचीन लिप्या आहेत.ह्या लिपी वाचता येण्यासाठी इंडो-ग्रीक राजांच्या काळातील नाणी उपयोगी पडली ज्यावर एका बाजूला ग्रीक भाषा आणि ग्रीक लिपी आणि दुसऱ्या बाजूला प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहे.जेम्स प्रिन्सेप ह्यांनी ब्रिटिश काळात ग्रीक लिपीच्या साहाय्याने ब्राह्मी अक्षरांची मांडणी केली. सिंधू लिपी आणि दुसरी एखादी लिपी एकत्र असलेला लेख किंवा मुद्रा अद्याप सापडलेली नाही त्यामुळे सिंधू लिपी वाचन अजूनही शक्य झालेले नाही.ही लिपी डावीकडून उजवीकडे की उजवीकडून डावीकडे लिहिली जाते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.संगणकाच्या साहाय्याने ह्या लिपीचा शोध घेतला जात आहे परंतु अजूनही त्यात यश आलेले नाही. भारतातील विविध राज्यातील सरकारे ही लिपी वाचण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत जेणेकरून लवकरात लवकर ह्या लिपीचा शोध लागेल व जगाला सिंधू संस्कृतीचा सखोल अभ्यास करायला मदत होईल. []

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार, दिनांक १६ जानेवारी २०२५