मसुदा:साहित्यिक प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड
प्रा. शुक्राचार्य गायकवाड हे मराठीतील बौद्ध साहित्यिक, कवी, समीक्षक, प्रवचनकार, व्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी दलित साहित्य या परिभाषेपेक्षा बौद्ध साहित्य या संकल्पनेवर भर देऊन समाजमनात परिवर्तन घडवणारे साहित्य निर्माण केले. ते बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून महाराष्ट्रात बौद्ध साहित्याचा प्रसार व प्रचार करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.
जीवन
[संपादन]प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांचा गायकवाड यांचा जन्म भिवंडी येथे झाला. त्यांचे बालपण दारिद्र्यात गेले तरी कष्ट, सचोटी आणि शिक्षणाच्या जोरावर त्यांनी स्वतःला घडवले. त्यांच्या जीवनप्रवासात कुटुंबीयांचा, विशेषतः आई व पत्नीचा मोठा सहभाग आहे.
शिक्षण
[संपादन]- एम.ए. मराठी
- एम.ए. पाली
- राष्ट्रभाषा कोविद
- राष्ट्रभाषारत्न
- डी.एच.ई.
- हिंदी शिक्षक सनद
- डिप्लोमा इन बौद्धिझम अँड विपश्यना
ते के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले आणि तेथूनच सेवानिवृत्त झाले.
साहित्य योगदान
[संपादन]प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांनी कविता, नाटके, समीक्षण, चरित्र, बालसाहित्य, प्रवचनसाहित्य अशा विविध क्षेत्रांत विपुल लेखन केले आहे. त्यांनी सुमारे 150 ग्रंथांवर समीक्षा आणि 50 हून अधिक ग्रंथांना प्रस्तावना लिहिली आहे.
प्रमुख प्रकाशित ग्रंथ
[संपादन]साहित्य प्रकार
[संपादन]काव्यसंग्रह
[संपादन]- निंबार पहिला
- मला वाटत
- तुझ्या पावलांचे ठसे
- या निळया नभाखाली
- सप्तरंगी प्रेरणा
- चित्र कविता
- बोधिवृक्षाची फुले
नाटके व एकांकिका
[संपादन]- समानता नाटिका (पुरस्कारप्राप्त)
- मानवाचं कल्याण – संविधान
- धम्म संवेग
- तीन एकांकिका
समीक्षा व अभ्यासग्रंथ
[संपादन]- आंबेडकरी विचारधारा – एक अभ्यास
- आंबेडकरी सम्यक समीक्षा (भाग 1 व 2)
- साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड यांचा साहित्यिक प्रवास
चरित्र व आत्मकथन
[संपादन]- माझ्या आठवणी
- आदर्श माता
- ‘ब’ ला काना ‘बा’
- माझ्या गुरूंचे गुरू
बालसाहित्य
[संपादन]- बालगीतांचा खजिना
- बालगीते रविवार हवा मला
- अशी ही मुलं
- शाळेची पाटी
इतर
[संपादन]- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- बोधगया – प्रवास एक अनुभव
- विविध देशातील बौद्ध धम्म व पौर्णिमांचे महत्त्व
- धम्म संस्कार गीते
- दिशा प्रबोधन
- चला पालिभाषा शिकू या
वृत्तपत्रातील स्तंभलेखन
[संपादन]साहित्य संमेलनातील सहभाग
[संपादन]प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भरलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनांमध्ये तसेच बौद्ध साहित्य संमेलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
- त्यांनी ठाणे येथे झालेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे सलग तीन वर्ष अध्यक्षपद भूषविले.
- धम्मदिप साहित्य सभा आणि काव्यरसिक मंडळ, डोंबिवली यांच्या माध्यमातून अनेक काव्यसंमेलने व चर्चासत्रे आयोजित केली.
- त्यांच्या कवितांचे वाचन साहित्य संमेलन, काव्यसंमेलन, सांस्कृतिक संमेलन अशा विविध विचारमंचावर झाले असून प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
- त्यांनी सादर केलेल्या कविता — जसे की “या निळया नभाखाली”, “तुझ्या पावलांचे ठसे” किंवा “बोधिवृक्षाची फुले” — या सामाजिक न्याय, समता, बौद्धसंस्कृती आणि मानवी मूल्ये या विषयांवर आधारित असल्याने प्रेक्षकांना विशेष भिडल्या.
- त्यांनी अध्यक्षीयभाषणे करून साहित्य, समाज व बौद्धधम्म यांच्यातील परस्परसंबंध उलगडून सांगितले. त्यांच्या भाषणशैलीत सुलभता, प्रखर सामाजिक जाणीव आणि काव्यमय ओज दिसून येते.
विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कवी संमेलने यामध्ये त्यांची विशेष दखल घेण्यात आली
सामाजिक कार्य
[संपादन]- बौद्ध साहित्य प्रसार संस्था (संस्थापक अध्यक्ष) या संस्थेतून बौद्ध साहित्याचा प्रसार.
- धम्मदिप साहित्य सभा, डोंबिवली व काव्यरसिक मंडळ, डोंबिवली या संस्थांमध्ये कार्य.
- आंबेडकरी साहित्य संमेलन, ठाणे येथे सलग तीन वर्षे अध्यक्षपद भूषविले.
- राज्यभर जवळपास 2000 हून अधिक प्रवचन, प्रबोधनपर व्याख्याने व साहित्यविषयक कार्यक्रम.
- आकाशवाणी व दूरदर्शन मुंबई केंद्रावर कविता वाचन, प्रवचन, मुलाखती व कार्यक्रम सादर.
पुरस्कार
[संपादन]प्रा. गायकवाड यांना साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी महत्त्वाचे :
- आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – प्रथम क्रमांक
- आदर्श शिक्षक पुरस्कार
- कविरत्न पुरस्कार
- समानता एकांकीस प्रथम पुरस्कार
- साहित्यरत्न पुरस्कार
- धम्मरत्न पुरस्कार
- भिमरत्न पुरस्कार
- दै. वृत्तरत्न सम्राट साहित्यिक पुरस्कार
- माझ्या आठवणी या पुस्तकाला राज्यस्तरीय वाङ्मयीन पुरस्कार
- इतर छोटे-मोठे मिळून 25 पेक्षा अधिक सन्मान
प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्यावर वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेले लेख
[संपादन]बौद्ध साहित्यातला कोहीनुर साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड सर
डाॅ. सुरेंद्र राजाराम शिंदे,- मो. क्रमांक – 8652457099
निसर्गातील, सृष्टितील विविधता जशीच्या तशी टिपावी, जपावी आणि जशीच्या तशी मांडावी ते साहित्यिकांनीच. साहित्यिकांचे विष्वच वेगळे असते. काही मनाला भावणारे तर काही मनाचा वेध घेऊन आपल्याच मनातले गुपीत सर्वांसमोर उघड करून सांगणारे. साहित्यिकांच्या त-हा ही तेवढयाच नाना त-हेच्या.पुरस्कार मिळावा किंवा मानमरातब मिळावा म्हणुन साहित्य निर्माण न करता केवळ आपला छंद म्हणुन तो जोपासुन साहित्य निर्माण करणारा किंवा लिहितच राहणे हे ख-याखु-या साहित्यिकांचे वैशिष्ट्य होय.आपल्या साहित्याच्या पोतडीतील कलमाच्या सहाय्याने वेगवेगळे गुणधर्म तसेच वेगवेगळे कलादर्पण सादर करणारे हे ख-या अर्थाने साहित्यिकाचे लक्षण मानले जाते. तर, समाजमनाचा दर्पण म्हणुन साहित्याच्या कलाकृतीतील साहित्याकडे पाहिले जाते.श्रद्धा,अंधश्रद्धा, समाजातील आत्ताचे आणि सनातनातील रितीरिवाजांचे कथा,कवीतेच्या माध्यमातुन परिक्षण करावयास लावणारे हे साहित्यिकच होय.साहित्यिकांला आणि साहित्यिकांच्या साहित्याला कोणत्या अंगाने, कोणत्या कोनाने बघावे व कोणत्या श्रेणीने मोजावे हेच कोणाला आत्तापर्यंत जमले नाही आणि जमणारही नाही कारण साहित्यिकाला काय भावले आणि काय पाहिले याचे आपण कधिच मुल्यमापन करू शकणार नाही तसेच त्यांला भावलेले आणि त्याने पाहिलेले हे त्यांच्या मताने आपण आपल्या मताशी ताडुन पाहणे हे गैरच आहे.म्हणुनच ‘‘जे ना देखे रवि ते देख कवी’’ असे म्हटले जाते ते ख-या अर्थाने यथार्थ असेच आहे.
बौद्ध साहित्यिक म्हणुन कवी मनाचा वंगीस यांच्याकडे पाहिले जाते.तर आजच्या हया युगात महापुरूषांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेतुन सदवर्तनाने परिवर्तनाची ज्योत चेतवणारे बौद्ध साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांचे नांव घेतले तर फारसे वावगे ठरणार नाही ते ख-या अर्थाने उचीतच आहे.आणि म्हणुन त्यांच्याच ‘‘तूझ्या पावलांचे’’ या कवितेतील एक ओळ येथे नमुद करावीशी वाटते ती येथे नमुद करतो तूझ्या पावलांचे ठसे पाहिले मी, दिशा मज कळाली,तसा चाललो मी,तसा चाललो मी,तर दुस-या एका त्यांच्याच कवितेत ते म्हणतात ‘‘ बा भिमा तूझ्या घटनेचे एकच पान माझ्या गावात आले अन् सारे गावच उजाळले ’’.मी तर असे म्हणतो काही माणसे आपल्या जिवनात येतात,येताना ते आपला प्रकाश घेऊन येतात आणि आपल्या अंधकारमयी जिवनाला प्रकाशमयी करतात,प्रकाशमयी करतात. ते काम प्रा. शुक्राचार्य गायकवाड सर हे ख-या अर्थाने करीत आहेत.त्या कामाची तर बौद्ध साहित्य प्रसार संस्था ही पाहोच पावती होय.या बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे ते पद्सिद्ध अध्यक्ष आहेत.
साहित्यातला शुक्राचार्य असे जर मी प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांना म्हटले तर फारसे वावगे ठरू नये.ते उचित असेच आहे. या साहित्यिकाने दलित साहित्य या ऐवजी बौद्ध साहित्य अशी नवी रचना करून दलित या शब्दालाच वगळले किंवा तो शब्दच काढुन टाकावयास भाग पाडला.दलित म्हणुन आपण का दलित व्हावे ? बुद्धीने अन् अंगच्या अंगमेहनतीने, कलागुणांनी,सदाचाराने आपण सर्वश्रेष्ठ असुनही आपणच आपणाला दलित म्हणुन हिनवुन का घ्यावे ? या बाबीला प्रा. शुक्राचार्य गायकवाड सरांनी चांगलीच चपराक मारली आहे.प्रवचनकार म्हणुन प्रा.शुक्राचार्य गायकवाड सर हे मानवाचे मंगल कश्यात आहे हे तथागतांनी सांगीतलेल्या 32 महामंगल सुत्ताचे आपल्या शैलीत प्रवचन करताना पाहुन सर्वांचे मंगल होण्यासाठी धडपडणारा साहित्यिक म्हणुनच मी त्यांचे वर्णन करतो.तर, अंधश्रद्धेवर प्रहार करताना प्रा. शुक्राचार्य गायकवाड सर म्हणतात अजुनही या देशात तेला शिवाय दिवा जळत आहे, लिंबु टाचणीला टोचतच आहे. असे बोचकारे आपल्या कवितेतुन काढतात.विदये विना मती गेली,मती विना निती गेली,निती विना गती गती गेली,गती विना वित्त गेले, वित्त विना शुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविदयेने केले असे महात्मा ज्योतीबा फुले म्हणतात तेव्हा प्रा. शुक्राचार्य गायकवाड सर विदयेचे महत्व सांगताना म्हणतात विदया ही सर्वांसाठी खुल्ली असली पाहिजे,जे दिल्याने वाढते ते म्हणजे ज्ञान होय. विहारे ही ज्ञानार्जनाची केंद्रे आहेत तेव्हा बौद्ध बांधवांनी दर रविवारी बौद्ध विहारात गेलेच पाहिजे.ज्ञानार्जनाची दरवाजे हे सतत उघडेच असले पाहिजे तेव्हा शिक्षणाचे राष्ट्रियकरण व्हावे असे त्यांचे मत आहे.
लोकांच्या ज्ञानात वृत्तीत अन् कृतीत अमुलाग्र बदल झाल्या शिवाय या देशात क्रांती होणार नाही यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारा साहित्यिक म्हणुन प्रा. शुक्राचार्य गायकवाड सर हे इतर साहित्यिकांहुन फारच वेगळे आहेत. त्यांच्या या वेगळेपणामुळेच त्यांना बौद्ध साहित्यिक असेच सर्वांनी म्हणावे यातच त्यांचा अन् आपण बौद्ध असल्याने आपलाही गौरव आहे.बौद्ध म्हणुन बौद्धांनी आपली अस्मिता जपली पाहिजे अन् बौद्ध म्हणुन बौद्धांची, देशाची, राष्ट्राची प्रगतीही केली पाहिजे असे तळमळीने सांगणारे अन् आपल्या कृतीतुन आचरणात आणणारे साहित्यातला महामेरू प्रा.शुक्राचार्य गायकवाड सर हे होत.
आपल्या अठराविष्व दारिद्रयातुनही मोठेपण आणि मोठेमन असलेले प्रा.शुक्राचार्य गायकवाड सर हे सिंहावलोकन करताना आपण प्रा. शुक्राचार्य गायकवाड कसे झालो हे आवर्जुन सांगतात.भिवंडी येथील आपल्या गावी उपभोगलेले कष्ट अन् प्रामाणिकपणातुन, सचोटीने व कसोटीतुन शिक्षणाने प्राध्यापक कसे झालो हे त्यांच्या एका पुस्तकात त्यांनी लिहिलेले आहे.त्यांच्या या यशात त्यांच्या मागे स्त्रिचाही तिकाच मोठा हात आहे कारण तथागत म्हणतात स्त्रिची पावित्र्यता, कोमलता, भक्ती, औदार्य, धैर्य, धिरोदात्तता, उदारता या पवित्र सद्गुणांच्या जोरावर पुरूशाला यष प्राप्त होते. तेव्हा सरांच्या या यषाच्या मागे त्यांची बा,माऊली, पत्नी यांचा सिंहाचा वाटा आहे.
लेखक,कवी,वक्ता,व्याख्याता,प्रवचनकार,चित्रकार,समिक्षक,प्रस्तावनाकार, नाटककार,संगीतकार,सहित्यिक अशा विविध अश्टपैलु गुणांनी कोंदणात बसवावा असा कोहिनुर हिरा म्हणजेच प्रा.शुक्राचार्य गायकवाड त्यांचा विविध अष्टपैलु गुणांचा जिवनपट पहावयाचा झाल्यास त्याची सुरुवात परिचय येथुन होते.त्यांचे शिक्षण एम.ए. मराठी, राष्ट्रभाषा कोविद,डी.एच.ई.,एम.ए.पाली, राष्ट्रभाषारत्न,हिन्दी शि क्षक सनद,डिप्लोमा इन बुद्धिझम अॅन्ड विपष्यना असे शिक्षण घेऊन के.वी.पेंढारकर महाविदयालय,डोंबिवली येथुन ते सेवानिवृत्त झाले.त्यांचे प्रकाषीत साहित्य समानता नाटिका पुरस्कार प्राप्त,निंबार पहिला काव्यसंग्रह,मला वाटत कविता संग्रह, अभिनय गीते, बालगीते, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,तुझ्या पावलांचे ठसे,बुद्धगया - प्रवास एक अनुभव,माझ्या गुरूंचे गुरू,विविध देशातील बौद्ध धम्म व पौर्णिमांचे महत्व,,तीन एकांकीका,चित्र कविता, बोधिवृक्षाची फुले, सप्तरंगी प्रेरणा,22 आंबेडकरी विचाराचं एकपात्री अभिनय,गाथा थोरांची,आंबेडकरी विचारधारा एक अभ्यास, या निळया नभाखाली कविता संग्रह,चला पालिभाषा शिकू या !, आंबेडकरी सम्यक समिक्षा भाग - 1, साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड यांचा साहित्यिक प्रवास,प्रा. शुक्राचार्य गायकवाड व्यक्तीत्व वेध,आदर्श माता,माझ्या आठवणी, आंबेडकरी सम्यक समिक्षा भाग - 2,‘ब’ ला काना ‘बा’,धम्म संस्कार गीते, दिशा प्रबोधन,बालगीतांचा खजिना, मानवाच कल्याण संविधान नाटक,धम्म संवेग नाटक,अशी साहित्य संपदा प्रकाशीत करण्यात आली आहे.तर त्यांनी आता पर्यंत 150 पुस्तकांना सम्यक समिक्षा लिहिलेल्या आहेत तर, विविध अशा 50 पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या.लेखक म्हणुन माझ्या भावाला माझी माया कळु दे !,अशी ही मुलं, शाळेची पाटी अशा त्यांनी कथा लिहिल्या.महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध विषयांवर जवळपास 2000 प्रबोधन ,भाषणे, व प्रवचन करीत आहेत. आकाशवाणी दुरदर्शन मुंबई केंद्रावर विविध भाषणे,कविता वाचन,पुस्तक परिक्षण,बालगीतांचा कार्यक्रम तर श्रृतीका ही त्यांनी सादर केल्या. दुरदर्शन वरळी कविता वाचन,लेखक आपल्या भेटीला मुलाखत, कवी मंगेश पाडगावकर, कवी विं.दा.करंदीकर यांची मुलाखतही त्यांनी घेतली.आत्ता प्र्यंत त्यांनी अदमासे 65 पेक्षाही जास्त विविध विषयांवर लेख लिहिले आहेत.त्यांच्या बालगीते रविवार हवा मला रविवार हवा,धम्मगीते तुझ्या पावलांचे अशा या दोन सी.डी. प्रकाशीत झालेल्या आहेत.संपादक म्हणुनही त्यांनी आपली भुमीका बजावलेली आहे.साहित्य संमेलनातही अध्यक्षपद भुशविलेले असुन सामाजिक,धार्मिक अशा विविध संस्थांमध्येही त्यांनी अध्यक्षपद भुषवुन त्यामध्येही मोलाचे योगदान दिलेले आहे.सध्या बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष म्हणुन समर्थपणे धुरा वाहत आहेत. आत्ता पर्यंत त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.त्यातील काही पुरस्कार येथे नमुद करीत आहे.आंतर महाविदयालयीन वत्कृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक, आदर्श शिक्षक पुरस्कार, कविरत्न पुरस्कार, समानता एकांकीस प्रथम पुरस्कार,छोटे मोठे अअसे 25 पुरस्कार,साहित्यरत्न पुरस्कार,धम्मरत्न पुरस्कार, दै वृत्तरत्न सम्राट मुंबई साहित्यिक पुरस्कार,स्मृती विशेष, भिमरत्न पुरस्कार, माझ्या आठवणी या पुस्तकास राज्यस्तरीय वाडःमयीन पुरस्कार असे त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत.
आर्थिक संस्था मध्ये विषेशतः डोंबिवली नागरी सहकारी बँक शेडयुल्ड बँक मध्ये 6 वर्षे संचालक म्हणुन धुरा त्यांनी वाहीली,तर, संजिवनी पतपेढी डोंबिवली मध्ये ही सक्रिय सभासद म्हणुन त्यांचे योगदान हे महत्वाचे ठरले आहे साहित्यिक संस्थामध्ये त्यांचे योगदान पाहता धम्मदिप साहित्य सभा डोंबिवली, काव्य रसिक मंडळ डोंबिवली,5 वे आंबेडकरी साहित्य संमेलन ठाणे अध्यक्ष पदावर सतत तिन वर्षेकाम पाहिले.सध्या बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत. त्यांचा आवडता छंद लेखन, वाचन, चित्रकला,संगीत, गायन,वादन हे असुन कबड्ढी, खो-खो, हाॅली बाॅल हे आवडते खेळ आहेत.त्यांना संगीत या क्षेत्रातील हार्मोनियम,तबला, ढोलकी,बासरी, ताशा,ढोल,बाॅंगो - काॅंगो,खंजेरी,पखवाज, जलतरंग, काचतरंग अशी विविध वादय वाजवण्यातही त्यांचा हातखंडा आहे.उत्कृष्ठ कव्वाल म्हणुनही प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांचा हा देखील एक पैलु असुन सन 1970 ते 1974-75 पर्यंत त्यांनी गायन पार्टी,जलसा असे कार्यक्रम देखील केलेले आहेत.प्रा. शुक्राचार्य गायकवाड या बहुगुणी आयामी व्यक्तीमत्वाचे अनेक असे पैलु आहेत ते सर्व काही मांडण्याचा या लेखात अल्पसा प्रयत्न केलेला आहे.
साहित्यात रमणारे अन् साहित्यावरच प्रेम करणारे,कवितेत गुंगणारे आणि कविता करणारे असे सरांबद्यल बोलताही येईल.त्यापलिकडेही जाऊन समाजाची दशा अन् दिशा यावर तर ते भरभरून बोलतात. समाजाची भावी पिढीची काळजी करताना ते हळवेही होतात, समाजावरील अन्याय, अत्याचाराने पेटुनही उठतात तर समाजाने विहाराकडे दुर्लक्ष केल्याने क्रोधीतही होतात. मेणाहुनही मऊ असणारे सर असत्याने, अधम्माचरणाने वज्राहुनही कडक होतात.धम्म अभ्यासता यावा यासाठी सतत प्रयत्नशील असलेले प्रा. शुक्राचार्य गायकवाड सर हे धम्ममार्गावर आरूढ आहेत.तेच त्यांचे अधिष्ठान होय.धम्म प्रचार व प्रसार करून ते सम्यक आजिविकेतुन निर्दोष निरोगी सुखसमृद्ध आहेत. सरांचे वैशिश्टय म्हणजे कोणही सरांना प्रवचन, प्रबोधन, वक्ता,व्याख्याता म्हणुन बोलाविले तर ते कोणालाच नाराज करीत नाहीत. ते स्वखर्चाने स्वतः त्या ठिकाणी वेळेआधी पोहोचतात ते यासाठी कोणतेही मानधन घेत नाहीत.सर्वाशी आपुलकीने विचारपुस करणारे, सर्वांना भरभरून प्रेम देणारे तथागतांची मंगल मैत्री सर्वांना देणारे प्रा. शुक्राचार्य गायकवाड हे डोंबिवली साहित्य नगरीतले विरळाच साहित्यिक आहे.
साहित्यिकांचे गुणधर्म कोणते असावे अन् कोणते नसावे याचे मुल्यमापन जर कोणी करीत असेल तर, माझ्या मते महामानवांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेने सद्वर्तनातुन परिवर्तनाची ज्योत चेतवणारा साहित्यातील कोहीनुर म्हणुन मी प्रा.शुक्राचार्य गायकवाड सर यांचेच नांव सुचवेल असे त्यांचे सद्गुण आहेत.बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचा सहसचिव म्हणुन सरांचा जिवनयापना प्रवास निर्दोष,निरोगी,सुखसमृद्ध होवो हिच तथागतांकडे मंगलकामना .अन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा .
संदर्भ
[संपादन]https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4775139937964582822
https://www.youtube.com/channel/UCYw8PYhYx1xnLLeANd56Rng/videos