Jump to content

साळसूद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साळसूद हा शब्द मराठी भाषेतील एक विशिष्ट अर्थ दर्शविणारा आहे.

साळसूद म्हणजे साधा,सरळ,भोळाभाबडा,निष्पाप, मनात कपट नसलेला, कुणालाही कधीही न फसवणारा व्यक्ती. हे विशेषण आहे. पिंजरा चित्रपटात एक लावणी आहे.छबीदार छबी मी तोऱ्यात उभी. त्यामध्ये साळसूद शब्द वापरला आहे. तो खालीलप्रमाणे आहे. अरं सोंगाढोंगाचा बाजार इथला साळसूद घालतोय अळीमिळी. हा शब्द त्याच्या सरळ अर्थाने कधीच वापरला जात नाही. हा शब्द वापरला जातो तो बेरकी स्वभावाचा म्हणून. साळसूद शब्द साळ शब्दापासून आलेला आहे. साळ म्हणजे भाताचे पीक. भाताचे पीक सरळसोट असते. सरळसोट वागणारी व्यक्ती म्हणजे साळसूद व्यक्ती. []

  1. महाराष्ट्र टाईम्स, शनिवार, दिनांक १५ मार्च २०२५