सायली (काव्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


सायली’ हा आतापर्यंतचा पहिला आणि एकमेव शब्दाधारीत काव्यप्रकार आहे. [१][संपादन]

‘हा क्षण’ (दिर्घकथा), ‘अनामिका’ (कविता संग्रह) लिहिणारे नवसाहित्यिक ‘विशाल समाधान इंगळे’ यांच्या लिखाणात सर्वप्रथम या प्रकारच्या रचना दिसून येतात.

अगदी अल्पकाळातच हा नविन काव्यप्रकार लोकप्रिय झाला असून इतर अनेक कविंनीही या प्रकारात रचना केल्या आहेत. काही निवडक कवितांचे संकलन करुन विशाल इंगळे यांनी ‘सायली’ याच नावाने नुकताच एक कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. या संग्रहात एकूण २८ कविंच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.[२] [३]

सायली रचनेचे नियम[संपादन]

 • पहिल्या ओळीत एक शब्द,
 • दुसऱ्या ओळीत दोन शब्द,
 • तिसऱ्या ओळीत तीन शब्द,
 • चौथ्या ओळीत दोन शब्द,
 • पाचव्या ओळीत एक शब्द, आणि
 • कविता आशयपूर्ण असावी.

५ ओळी, ९ शब्द, आशययुक्त. असा फक्त ९ शब्दांचा आणि पाच ओळींचा हा नियमबध्द पण तितकाच सोपी काव्यप्रकार.

विशाल इंगळे यांच्या काही सायली रचना (सायली या संग्रहामधून) : [४][संपादन]

मी

तुझ्यात गुंतलो

न माझा राहिलो

आता सर्वकाही

तूच

- विशाल इंगळे

-

वाटते

तुला भेटल्यावर. ..

आता कुणा का. ..?

भेटायचे. .. बोलायचे. ..

जाणायचे. ..

- विशाल इंगळे

इतर कविंच्या काही सायली रचना (सायली या संग्रहामधून) : [५][संपादन]

चिमणीचं

झाडावर घर

चिमणा रानात दूर

मनात हुरहुर

दोघांच्या

- प्रा. तुकाराम पाटील

-

दरवळतो

आजही तुझ्या

आठवणींचा पारिजातक मनात

उमटेना परिभाषा

प्रेमाची

- उज्वला कोल्हे

-

नदीचा

एक किनारा

कधीच भेटत नाही

दुसर्‍या किनार्‍याला

शेवटपर्यंत

- व्यंकटेश काटकर

-

आताशा

मागत नाही

मी माझ्या सावलीला

या आयुष्यभराची

सोबत

- विशाल लोणारी


[६]

संदर्भ :[संपादन]

 1. ^ मनापासून मनापर्यंत च्या संकेतस्थळावरील सायली
 2. ^ विशाल इंगळे यांची फेसबुक प्रोफाईल
 3. ^ सायली, विशाल इंगळे (सायली संग्रह) - मनापासून मनापर्यंत प्रकाशन.
 4. ^ कविची तसेच प्रकाशकाची लिखित पुर्व परवानगी घेण्यात आली आहे.
 5. ^ सर्व कविंची तसेच प्रकाशकाची लिखित पुर्व परवानगी घेण्यात आली आहे.
 6. ^ या लेखातील सर्व साहित्यासाठी सर्व कविंची तसेच प्रकाशकाची लिखित पुर्व परवानगी घेण्यात आली आहे.