Jump to content

सायंतनी घोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सायंतनी घोष
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
आडनावGhosh संपादन
जन्म तारीख६ सप्टेंबर 1985 संपादन
जन्मस्थानकोलकाता संपादन
व्यवसायअभिनेता, मॉडेल, नर्तक / नर्तकी, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाM. P. Birla Foundation Higher Secondary School संपादन

सायंतनी घोष (जन्म ६ सप्टेंबर १९८३) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी दूरदर्शन मालिकांमधील तिच्या कामासाठी ओळखली जाते.[][] २०१२ मध्ये, तिने बिग बॉस ६ मध्ये देखील भाग घेतला होता.[]

कारकीर्द

[संपादन]

सायंतनी घोषने मिस कलकत्ता सौंदर्य स्पर्धा जिंकली आणि सुरुवातीला बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यानंतर २००२ मध्ये तिला कुमकुम – एक प्यारा सा बंधन या हिंदी सोप ऑपेरामध्ये पहिली टेलिव्हिजन भूमिका मिळाली.[][]

त्या सहाय्यक भूमिकेत चार वर्षे काम केल्यानंतर, तीने नागिन - वादों की अग्निपरीक्षा या मालिकेत अमृताच्या भूमिकेत दोन वर्षांसाठी मुख्य कलाकाराचे पात्र रंगवले. त्याच वर्षी, तिने घर एक सपना मध्ये काकुल सन्मान चौधरीची मुख्य भूमिका साकारली.[] त्यानंतर अदालत मध्ये सरकारी वकील प्रणाली गुजरालची पाहुणी भूमिका साकारली. घोषने बिग बॉस च्या सहाव्या पर्वात भाग घेतला;[] पण तिसऱ्या आठवड्यात तिला घरातून बाहेर काढण्यात आले.

२०१३ मध्ये ती महाभारत या दूरचित्रवाणी मालिकेच्या मुख्य भूमिकेत दिसली, ज्यात तिने सत्यवती या कोळीण स्त्रीची भूमिका साकारली. २०१४ मध्ये घोषने इतना करो ना मुझे प्यार मध्ये खलनायिकेची भूमिका साकारली आणि डेअर २ डान्स या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून भाग घेतला.

२०१५ मध्ये, घोषने ससुराल सिमर का मध्ये राजकुमारी राजेश्वरीची सहाय्यक भूमिका साकारली. त्यानंतर ती रिश्तों का मेला, कॉमेडी नाइट्स विथ कपिल आणि कॉमेडी क्लासेस मध्ये दिसली. २०१५ च्या अखेरीस घोषला संतोषी माँ मध्ये पौलोमी माँ या मुख्य खलनायिकेच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले. २०१६ मध्ये ती नामकरण या रोमँटिक नाट्य मलिकेच्या मुख्य कलाकारांमध्ये सामील झाली, जिथे तिने फेब्रुवारी २०१८ मध्ये तिच्या पात्राच्या मृत्यूपर्यंत नीला पारिखची भूमिका साकारली.

डिसेंबर २०२० मध्ये, तिने सोनी सब वरील तेरा यार हूँ मैं या मालिकेत श्वेता गुलाटीच्या जान्हवी बन्सल या पात्राची जागा घेतली आणि दलजीत बग्गा या नवीन नायिका म्हणून मालिकेत प्रवेश केला. २०२१ मध्ये, तिला तेरा यार हूँ मैं मधील दलजीत बग्गाच्या भूमिकेसाठी गोल्ड कॉमेडी अवॉर्ड्सकडून फेव्हरेट लोकप्रिय सदस्य पुरस्कार मिळाला.[][]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

सायंतानी घोषने ६ डिसेंबर २०२१ रोजी तिचा दीर्घकाळचा प्रियकर अनुग्रह तिवारीशी विवाह केला.[][]

जानेवारी २०२२ मध्ये, घोष आणि त्यांच्या पतीला कोविड-१९ ची लागण झाली. त्यांनी शूटिंगमधून थोडा ब्रेक घेतला आणि स्वतःला क्वारंटाईन केले. बऱ्या झाल्यानंतर, त्यांनी शोचे शूटिंग पुन्हा सुरू केले.[१०][११]

संदर्भ

[संपादन]
  1. "Naamkaran actresses Sayantani Ghosh, Shruti Ulfat celebrate birthday together; see pics". Times of India (इंग्रजी भाषेत). 2017-09-16. 2020-02-06 रोजी पाहिले.
  2. 1 2 "Sayantani Ghosh is back!". The Times of India. TNN. 17 April 2010. 3 December 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  3. "Sayantani to be locked up in the Bigg Boss house". Times Of India. 6 October 2012.
  4. 1 2 "Sayantani Ghosh Biography". Bigg Boss. 10 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 October 2012 रोजी पाहिले.
  5. Service, Tribune News (16 May 2020). "'Importance of love doesn't change'". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2022-02-18 रोजी पाहिले.
  6. "Newlywed Sayantani Ghosh Calls Her Husband Lucky Charm As She Wins Award- See Pics". news.abplive.com (इंग्रजी भाषेत). 2021-12-21.
  7. "Gold Comedy Awards Winners List: Sunayana Forzdar, Shubhangi Atre, Sayantani Ghosh & Others Win Big". Filmibeat (इंग्रजी भाषेत). 21 December 2021.
  8. "Sayantani Ghosh ties the knot with beau Anugrah Tiwari in Kolkata, bride glows in red banarasi; a look at exclusive pics". The Times of India. 6 December 2021. 6 December 2021 रोजी पाहिले.
  9. "Tera Yaar Hoon Main actress Sayantani Ghosh: I have chosen to take a subtle and simple route for my own wedding". The Times of India. 3 December 2021. 3 December 2021 रोजी पाहिले.
  10. "Anugrah and I could spend some quality time together during our quarantine: Sayantani Ghosh who's now recovered from COVID". The Times of India (इंग्रजी भाषेत). 13 January 2022. 2022-02-18 रोजी पाहिले.
  11. "I'm waiting to get back to the sets: Sayantani post COVID recovery". The Times of India (इंग्रजी भाषेत). 13 January 2022. 2022-02-18 रोजी पाहिले.