Jump to content

सामान्य बटलावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सामान्य बटलावा
Turnix sylvaticus

सामान्य बटलावा किंवा तिबेटी लावा (इंग्लिश: Small Buttonquail; हिंदी:दबकी, गीनवा लव्वा) हा एक पक्षी आहे.

सामान्य बटलावा हा सर्वात छोटा लावा आहे. त्याची शेपटी टोकदार व चोच राखी असते. पाय पिवळसर उदी रंगाचे असतात .त्याच्या पंखांवर रेघोट्या असतात. छातीवर तांबूस पिवळट काळे आणि लाल ठिपके असतात. नर-मादी दिसायला जवळ-जवळ सारखे असतात. परंतु मादी नरापेक्षा मोठी असते. बट लावा स्थायिक संचार कारतो. भारतात पंजाब, ते नागालँड, मणिपूर, नेपाळपासून सिक्कीम आणि दक्षिणेकडे भारतीय द्विकल्पात केरळपर्यंत आढळतात. पठार आणि डोंगरांवरील कुरणे आणि झुडपी जंगले, तसेच शेतीच्या भागात आढळतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली