साबरमती टिकी
Indian conservationist and farmer living near Bhubaneswar, Odisha. | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | इ.स. १९६८ नयागढ जिल्हा | ||||
|---|---|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||||
| व्यवसाय |
| ||||
| पुरस्कार | |||||
| |||||


साबरमती टिकी (जन्म c. 1968 ) ही ओडिशा राज्यातील नयागड जिल्ह्यात राहणारी एक भारतीय संवर्धनवादी आणि शेतकरी आहे. ती संभव नावाच्या एका गैर-सरकारी संस्थेत काम करते. या संस्थेची संकल्पना तिचे वडील पद्मश्री प्रा. राधामोहन यांची होती. ही संस्था सेंद्रिय शेती आणि स्थानिक जातींचे संवर्धन करण्यास प्रोत्साहन देते आणि इतर अनेक उपक्रमही करते. २०१८ मध्ये साबरमतीच्या कामगिरीची दखल घेत तिला नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच २०२० मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.
कारकिर्द
[संपादन]साबरमतीचा जन्म १९६८ साली झाला असून [१] ती ओडिशा राज्यातील नयागड जिल्ह्यात राहते. [२] तिचे वडील राधा मोहन यांनी १९८० च्या दशकात एक पडीक जमीन खरेदी केली होती. नंतर सेंद्रिय शेती तंत्रांचा वापर करून, वडील आणि मुलीने मिळून तीन वर्षात जमीन पुन्हा सुपीक केली. त्यानंतर त्यांनी आणखी जमीन घेतली. लवकरच त्यांच्या कडे ९० एकरपर्यंत जमीन जमा झाली.[१] ते लवंग बीन, जॅक बीन, स्वॉर्ड बीन आणि ब्लॅक राईस सह विविध पिके घेतात.[३] पिता पुत्रीने मिळून संभव नावाची एक गैर-सरकारी संस्था (एनजीओ) स्थापन केली. ही संस्था सेंद्रिय शेती आणि बियाणे देवाणघेवाणीला प्रोत्साहन देते. संभवमध्ये पूर्णवेळ काम करण्यासाठी तिने १९९३ मध्ये ऑक्सफॅममधील नोकरी सोडली.[१]
२०२१ पर्यंत, त्यांच्या या संस्थेने जतन करण्यासाठी म्हणून ५०० बियाण्यांच्या जाती गोळा केल्या होत्या. ही संस्था सर्व सामान्य लोकांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करते. शिवाय वार्षिक बियाणे महोत्सव देखील आयोजित करत असते.[२] स्थानिक गावांमध्ये महिलांचे हक्क आणि पर्यावरण संतुलन इत्यादी करता या स्वयंसेवी संस्थेने मा सरस्वती नावाच्या स्वयंसेवी गटाशी भागीदारी केली आहे.[२] हे भात उत्पादन वाढवण्यासाठी डिझाइन केलेली प्रणाली तांदूळ तीव्रता (SRI) ला प्रोत्साहन देते आणि टिकी यांच्या मते भातशेतीत काम करणाऱ्या महिलांसाठी श्रम प्रक्रिया देखील सोपी करते.[४]
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]- २०१८ मध्ये साबरमती यांना महिलांसाठीचा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार मिळाला.[५]
- २०२० मध्ये, तिला तिच्या वडिलांसोबत पद्मश्री पुरस्कार मिळाला, जो त्यांच्या दशकांपासून संवर्धन आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी होता.[३] मंत्री पीयूष गोयल यांनी "अनसंग हिरो" असा या पिता पुत्रीचा उल्लेख केला.[६]
- प्रेरणा पुरस्कार - २०१३
- ओडिशा लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड- २०१५
- संभावी पुरस्कार - २०१६
- इम्पॅक्ट वुमन अवॉर्ड-२०१८
- इम्पॅक्ट लीडर ऑफ द इयर पुरस्कार - २०२२
- ओरिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट (डीएससी)
- प्रतिभा सन्मान - २०२३
- टाईम्स पॉवर वुमन ओडिशा पुरस्कार - २०२३
निवडक लेखन कार्य
[संपादन]- Tiki, Sabarmatee; Lim, Liang Chun; Savann, Oeurm (2015). "SRI cultivates well-being for women". Farming Matters. 31 (4). 2023-02-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-07-02 रोजी पाहिले.
- Tiki, Sabarmatee (2015). "SRI: A practice that transforms the lives of women". Leisa India. 17 (4): 18–20.
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 Barua, Ananya (13 February 2020). "This Father-Daughter Duo's Organic Farming Journey Won Them a Padma Shri". The Better India (इंग्रजी भाषेत). 8 June 2022 रोजी पाहिले.
- 1 2 3 Singh, Pushpa (December 2020). "Capturing the Narratives of Sustainable Farming: Study of Marginal Women Farmers in Five Districts of Odisha". Indian Journal of Public Administration. 66 (4): 455–465. doi:10.1177/0019556120982199.
- 1 2 Staff writer (27 January 2020). "Father, daughter duo gets Padma Shri for 30-year-long conservation experiment". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 9 June 2022 रोजी पाहिले.
- ↑ "Odisha's Sabarmatee Tiki receives 'Nari Shakti Award'". KalingaTV. 9 March 2018. 9 June 2022 रोजी पाहिले.
- ↑ Staff writer (8 March 2018). "Nari Shakti of 30 women to be honoured at Rashtrapati Bhavan". The New Indian Express. 9 June 2022 रोजी पाहिले.
- ↑ "Padma Shri For Father-Daughter Who Transformed Wasteland Into A Forest". NDTV. 9 June 2022 रोजी पाहिले.