साधना महिला संघ
Indian non-governmental organization supporting sex workers | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | संस्था | ||
---|---|---|---|
स्थान | बंगळूर, बंगळूर शहर जिल्हा, बंगळूर विभाग, कर्नाटक, भारत | ||
स्थापना |
| ||
| |||
![]() |
साधना महिला संघ ही बंगळुरूमधील एक स्वयंसेवी संस्था आहे जी लैंगिक कामगारांना मदत करते. २०१९ च्या कोरोनाव्हायरस साथीच्या काळात त्यांना अशा लैंगिक कामगारांना जेवण द्यावे लागले ज्यांना आता ग्राहक सापडत नव्हते.
इतिहास
[संपादन]ही संघटना २०११ मध्ये स्थापन झाली, तर तिची कार्यालयीन नोंदणी २०१३ मध्ये झाली. पोलिसांकडून लैंगिक कामगारांना त्रास दिला जातो, तसेच त्यांच्या सोबत गैरवर्तन देखील केले जाते.[१] साधना महिला संघाच्या सचिव एम. गीता म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाने २००९ मध्ये दिलेल्या एका निर्णयामुळे लैंगिक कामगारांना अभयदान मिळाले आहे. ही संस्था अशा लैंगिक कामगारांना देखील मदत करते जे त्यांचे काम बदलू इच्छितात परंतु त्यांना सतत तुच्छतेचा सामना करावा लागतो. त्यापैकी अनेक महिलांनी आधीच त्यांचे पती आणि कुटुंब गमावले असून त्यांना एचआयव्ही सारख्या जोखमी व मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. ही स्वयंसेवी संस्था दर तीन महिन्यांनी लैंगिक कामगारांसाठी एचआयव्ही चाचणीची व्यवस्था करते आणि जर त्यांचा चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्यांना समुपदेशन देखील दिले जाते. ते त्यांना निरोध वापरण्याचा सल्ला देतात आणि असे न केल्यास त्यांच्यावर येणाऱ्या संकटाची जाणीव करून देतात. काही जण पॉझिटिव्ह चाचणी आल्यावर लैंगिक काम सोडतात तर काहींना घराबाहेर काढल्यामुळे ते बेघर होतात. अशा दोन्ही प्रकरणांमध्ये एनजीओ या महिलांना मदत करते.[२]
कोरोनाविषाणू महामारी
[संपादन]मार्च २०२० पर्यंत लैंगिक कामगारांना करोनाची बाधा होत असल्याचे दिसून येत होते.[१] त्यापैकी बरेच जण दररोज सकाळी कामावर बाहेर जायचे. साथीच्या काळात बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. ग्राहकांना विषाणूची लागण होण्याची भीती वाटत असल्याने हा व्यवसाय ठप्प झाला आणि त्यामुळे लैंगिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. कारण त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या ग्राहकांवर संपूर्णपणे अवलंबून होता. त्याकाळात संस्थेचा असा अंदाज होता की बंगळुरूमध्ये १,००० सेक्स वर्कर्स असून[१] कोरोनामुळेत्यांचे उत्पन्न सुमारे ५५% ने कमी झाले होते.[१] जर एखाद्या सेक्स वर्करला दिवसातून दोन ग्राहक मिळू शकत असतील तर दोन वेळच्या जेवणाची सोय होऊ शकते. पण खूप मोठ्या प्रमाणावर ग्राहक दुरावा राखून होते. त्यामुळे साधना महिला संघ बेरोजगारांना नियमित अन्न पुरवत होती.[१]
पुरस्कार
[संपादन]संघटनेच्या या कार्यासाठी नारी शक्ती पुरस्कार [३] देऊन संपूर्ण संस्थेचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे देण्यात आला आणि गटाला प्रशस्तिपत्र आणि एक लाख रुपये मिळाले. २०१७ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात दिलेल्या ३१ पुरस्कारांपैकी एक पुरस्कार त्यांना मिळाला. [४]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d e Reddy, Y. Maheswara (2020-03-24). "Fear of coronavirus keeps clients away". Bangalore Mirror (इंग्रजी भाषेत). 2021-01-23 रोजी पाहिले.
- ^ "Chigurida Badaku: Sadhana Mahila Sangha Works To Protect HIV+ Sex Workers From Endless Cycles of Harassment". Radio Active CR 90.4 MHz (इंग्रजी भाषेत). 2019-03-13. 2021-01-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-23 रोजी पाहिले.
- ^ "Nari Shakti Awardees- Sadhana Mahila Sangha, Karnataka | Ministry of Women & Child Development". wcd.nic.in. 2021-01-23 रोजी पाहिले.
- ^ Service, Tribune News. "Prez honours 31 with Nari Shakti Puraskar on Women's Day". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2021-01-23 रोजी पाहिले.