Jump to content

सादिया खातीब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सादिया खातीब
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावSadia संपादन
आडनावKhateeb संपादन
जन्म तारीख८ मे 1997 संपादन
जन्मस्थानBhaderwah संपादन
व्यवसायअभिनेता संपादन

सादिया खातीब ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने विधू विनोद चोप्रा यांच्या शिकारा (२०२०) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ह्या चित्रपटातील भूमीकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. खातीब यांनी तेव्हापासून रक्षाबंधन (२०२२) चित्रपटामध्ये काम केले आहे.[]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

खातीब यांचा जन्म जम्मू आणि काश्मीर राज्यामधील दोडा जिल्ह्यातील भदरवाह शहरात १९९७ मध्ये झाला होता.[]

कारकीर्द

[संपादन]

खातीबने २०२० मध्ये चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्या शिकारा या नाट्यमय चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले.[][][] हा चित्रपट जम्मू आणि काश्मीरमधील बंडखोरीच्या शिखरावर आणि त्यानंतर काश्मिरी पंडितांच्या जीवन व त्यांच्या नरसंहाराच्या वेळीची एक प्रेमकथा सांगतो.[] १९९० च्या काश्मीरमधील बंडखोरीदरम्यान तिच्या पतीसह तिची जमीन सोडून पळून जाण्यास भाग पाडलेल्या काश्मिरी ब्राह्मण महिलेची भूमिका तिने साकारली आहे जीचे नाव शांती धर आहे. अभिनेता आदिल खानने मुख्य भूमिका साकारली होती. दोघेही काश्मिरी वंशाचे आहेत आणि चोप्रा यांना प्रामाणिकपणा टिकवून ठेवण्यासाठी असेच हवे होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या पल्लबी डे यांनी लिहिले, "सादिया, तिच्या संसर्गजन्य हास्यासह, ज्या भागात ती तरुणपणाची भूमिका साकारत आहे तिथे ती स्वाभाविक दिसते".[] टाईम्स ऑफ इंडिया आणि इंडिया टुडे या दोघांनी नवोदित सादिया खातीब आणि आदिल खान यांची प्रशंसा केली.[] खातीबला फिल्मफेर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्काराचे नामांकन मिळाले.

खातीब पुढे रक्षाबंधन चित्रपटातअक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका साकारत दिसली. ती त्याच्या विवाहित बहिणीची भूमिका साकारते; पण तिच्या सासरच्यांनी हुंड्याची मागणी केल्याने तिला त्रास होतो आणि परिणामी ती विष पिऊन आत्महत्या करते.[] चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. बॉलीवूड हंगामाच्या एका समीक्षकाने चित्रपटाला ५ पैकी ३.५ स्टार दिले आणि लिहिले, "अक्षय कुमार अभिनीत रक्षा बंधन ही एक हृदयस्पर्शी कौटुंबिक गाथा आहे, ज्यामध्ये अत्यंत भावनिक दुसरा भाग चित्रपटाला उंचावतो". तिच्या भूमिकेसाठी तिला कौतुकाचा वर्षाव झाला, समीक्षकांनी म्हटले की "सादिया खतीब जास्तीत जास्त प्रभाव पाडते आणि खूपच आकर्षक दिसते".[१०][११]

खातीब पुढे जॉन अब्राहमसोबत द डिप्लोमॅटमध्ये दिसणार आहे.[१२]

चित्रपटांची यादी

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका नोंदी संदर्भ.
२०२० शिकारा शांती सप्रू धर [१३]
२०२२ रक्षाबंधन गायत्री अग्रवाल - मिश्रा [१४]
२०२५ द डिप्लोमॅट उज्मा अहमद चित्रीकरण चालू [१२]

पुरस्कार

[संपादन]
वर्ष पुरस्कार श्रेणी चित्रपट निकाल संदर्भ.
२०२० फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण शिकारा नामांकन [१५]

संदर्भ

[संपादन]
  1. Purkayastha, Pallabi Dey. "'Shikara' actress Sadia Khateeb visits her home in Kashmir, bowls us over with these beautiful pictures!". The Times of India. 23 January 2021 रोजी पाहिले.
  2. Kulkarni, Onkar. "Shikara actress Sadia Khateeb: This is the first festival I am celebrating away from my parents". The Times of India. 10 July 2022 रोजी पाहिले.
  3. Rosario, Kennith (5 February 2020). "Vidhu Vinod Chopra: 'I want people to see Shikara without any prejudices'". द हिंदू.
  4. Purkayastha, Pallabi Dey. "#OneYearofShikara: Sadia Khateeb: Vidhu Vinod Chopra not only taught me the nuances of cinema but also the fundamentals of life". द टाइम्स ऑफ इंडिया.
  5. "Vidhu Vinod Chopra's upcoming film Shikara, described as a 'love letter from Kashmir', to release on 8 November". Firstpost. 29 August 2019. 29 August 2019 रोजी पाहिले.
  6. "Kashmiri Pandit woman lashes out at Vidhu Vinod Chopra at Shikara screening: I disown your film". India Today. 8 February 2020.
  7. Empty citation (सहाय्य)
  8. Kanyal, Jyoti (7 February 2020). "Shikara movie review: Vidhu Vinod Chopra's love letter from Kashmir". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-02-07 रोजी पाहिले.
  9. "'Raksha Bandhan': Sadia Khateeb roped in for Akshay Kumar's next". The Times of India. 22 June 2021 रोजी पाहिले.
  10. "Raksha Bandhan Movie Review: RAKSHA BANDHAN is a touching family saga, with a highly emotional second half that uplifts the film". बॉलिवूड हंगामा. 11 August 2022. 11 August 2022 रोजी पाहिले.
  11. "Raksha Bandhan Movie Review : A touching sibling bond story that turns into a social commentary". द टाइम्स ऑफ इंडिया. 11 August 2022 रोजी पाहिले.
  12. 1 2 "EXCLUSIVE: Raksha Bandhan actress Sadia Khateeb bags John Abraham-starrer The Diplomat". Bollywood Hungama. 26 September 2021. 13 November 2022 रोजी पाहिले.
  13. "Vidhu Vinod Chopra brings searing pain of Kashmiri Pandit genocide on film". India Today (इंग्रजी भाषेत). 7 January 2020. 10 January 2020 रोजी पाहिले.
  14. "Akshay Kumar and Bhumi Pednekar starrer Raksha Bandhan to release on August 11, 2022". Bollywood Hungama. 26 September 2021. 26 September 2021 रोजी पाहिले.
  15. "Nominations For The 66th Vimal Elaichi Filmfare Awards 2021". Filmfare (इंग्रजी भाषेत). 28 March 2021. 28 March 2021 रोजी पाहिले.