Jump to content

सातारा संस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सातारा राज्य हे महाराष्ट्रातील एक संस्थान होते. मूळ मराठा साम्राज्याचा वारसा सांगणारे हे संस्थान १८१८ च्या तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धानंतर निर्माण झाले. १८४९ मध्ये ब्रिटिशांनी डॉक्ट्रीन ऑफ लॅप्सच्या धोरणाखाली आपल्या ताब्यात घेतले. शिवाजी महाराजांचे वंशज या संस्थानाचे शासक व वारस आहेत.

१८१८ मध्ये पेशवा बाजीराव दुसरा यांचा पराभव केल्यानंतर ब्रिटिशांनी राजा प्रताप सिंह भोसले यांना गादीवर बसवले. १८३८ मध्ये त्यांना पदच्युत केले आणि त्यांचे भाऊ शहाजी यांना गादीवर बसवले. १८४८ मध्ये त्यांचा नैसर्गिक वारस नसताना मृत्यू झाला. त्या वेळी, ईस्ट इंडिया कंपनी सरकारने तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केलेल्या कंपनीच्या डॉक्ट्रीन ऑफ लॅप्सच्या धोरणानुसार शहाजींच्या दत्तक मुलाला राज्याचे उत्तराधिकारी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि सातारा संस्थान ब्रिटिश साम्राज्यात विलीन करून घेतले. [] []

संस्थानिक

[संपादन]
  • प्रताप सिंह (१८०८-१८३९) – १८१८ मध्ये पेशवाईच्या पतनानंतर, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी करार करून त्यांचे सार्वभौमत्व स्वीकारले आणि राज्याचा मोठा प्रदेश ब्रिटिशांना दिला. []
  • तिसरे शहाजी (आप्पा साहेब) (१८३९-१८४८) (ब्रिटिशांनी सातारा ताब्यात घेण्यापूर्वीचे शेवटचे शासक)
  • व्यंकोजी (भाऊसाहेब) (१८४८-१८६४)
  • पहिले प्रतापसिंहजी (भाऊ साहेब) ( १८६५-१८७४)
  • तिसरे राजाराम (आबासाहेब) (१८७४-१९०४)
  • शिवाजी राजाराम भोसले (अण्णा साहेब) ( १९०४-१९१४)
  • दुसरे प्रतापसिंह (भाऊ साहेब) (१९१४-१९२५)
  • चौथे शाहू (बाळा साहेब) (१९२५-१९५०)
  • तिसरे प्रतापसिंह (बाबासाहेब) (१९५०-१९७८)
  • उदयनराजे भोसले (१९७८-)

प्रदेश

[संपादन]

सातारा संस्थानात आधुनिक सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि कर्नाटकातील विजापूर जिल्हा यांचा समावेश होता.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Kulkarni, Sumitra (1995). The Satara raj, 1818-1848 : a study in history, administration, and culture (1st ed.). New Delhi: Mittal Publications. pp. 2–3. ISBN 9788170995814.
  2. ^ Ramusack, Barbara N. (2007). The Indian princes and their states (Digitally print. version. ed.). Cambridge: Cambridge Univ. Press. pp. 81–82. ISBN 978-0521039895. 13 October 2016 रोजी पाहिले.
  3. ^ Kulkarni (1995), p. 21.