साडेसाती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्योतिष शास्त्रानुसार शनी हा उग्र आणि पापग्रह मानला जातो. सुर्याभोवती भ्रमण करताना तो एका राशीत अडीच वर्ष असतो. तो ज्या राशीतून भ्रमण करत असतो त्या राशीला व त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीला साडेसाती चालु असते. उदाहरणार्थ शनी जर मकर राशीत असेल तर मकर त्याच बरोबर अगोदरची म्हणजे धनु आणि नंतरची म्हणजे कुंभ या तीनही राशीला साडेसाती असते. शनी ग्रह हा न्यायाधीश असून, न्यायीपणा, खरेपणा, प्रंचड मेहनत, चिकाटी अशा गोष्टी त्याला आवडतात असे मानले जाते. साडेसाती सुसाह्य होण्यासाठी शनी साडेसाती निवारक उपाय केले जातात.