साचा चर्चा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पॅरामीटर्समध्ये सुधारणा हव्यात[संपादन]

१) पिन_कोड पॅरामीटर मध्ये पिन कोड क्रमांक भरूनही पिन कोड क्रमांक दिसत नाही आहे.

२) जनगणना_कोड हा नवा पॅरामीटर साचात जोडून हवा आहे. भारत सरकारच्या जनगणना विषयक या वेब साईटवर जनगणना_कोड सहजपणे उपलब्ध आहेत. (आंतरराष्ट्रीय "UN/LOCODE जगभरातील केवळ ८०००० गावांचीच नोंद घेतो.भारतीय पोस्ट खात्याचा पिन कोड सोबतच माहिती जोडण्याच्या दृष्टीने जनगणना कोड हा एक चांगला नेमका उपलब्ध पर्याय असू शकतो असे दिसते.)

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:०२, २० जानेवारी २०१३ (IST)


काही राज्यांना उपराजधानी आहे ? उदा. महाराष्ट्र सध्या या साच्यात उपराजधानी नमुद करण्याची व्यवस्था नाही. उपलब्ध करुन द्यावी अथवा या साच्यात बदल करण्याबाबत मार्गदर्शन मिळावे. रविकुमार बोडखे

विकिपीडिया:धूळपाटी ४० पहावे आणि साचा:धूळपाटीसाचा येथे केलेला बदल अभ्यासावा. बहुधा हा बदल सोपा असल्याने आपणही करू शकाल शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:००, २१ डिसेंबर २०१३ (IST)

देवनागरी आणि रोमन अंक[संपादन]

या साच्यातल्या काही पॅरामीटर्ससाठी (उदा. लोकसंख्या_एकूण, पिन_कोड) त्यांची किंमत देताना रोमन अंक टाईप करावे लागतात तर काहींसाठी रोमन, देवनागरी दोनही चालतात. त्यामुळे साच्याचा वापर करताना गोंधळ होतो आणि ज्यांना रोमन अंकांची गरज आहे असे पॅरामीटर्स किंमत मराठी अंकात दिल्यावर दिसत नाहीत. त्यामुळे स्रोतामध्ये किंमत देताना कोणतेही वापरले तरीही ते चालतील अशी व्यवस्था करावी. त्यासाठी साचा:अंक परिवर्तन हा साचा वापरता येईल.

प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ०२:३२, २२ डिसेंबर २०१६ (IST)
हा विचार माझे मनातही आला होता व त्यास पर्याय/सुधरविण्यासाठी इंग्रजी विकिवर जाऊन आलो. असे दिसले कि,मुळातच, हा साचा आता कालबाह्य झाला आहे. त्यास पर्याय म्हणून इंग्रजी विकिवर en:Template:Infobox settlement हा मॉड्युल आधारीत साचा तेथे टाकण्यात आलेला आहे. तो आयात करावा लागेल. तो आयात करण्यात व सलगपणे त्यावर काम करण्यास, त्याचे मराठीकरणास व विमोचनापूर्वी त्याची तपासणी करण्यास बराच वेळ लागेल. सध्या हातात घेतलेल्या कामातून जशी सवड मिळेल तसे ते काम करावे असा मानस आहे. बघु कसे जमते ते. दुसरे असे कि, जेथे-जेथे पूर्वी हा साचा वापरलेला आहे तेथे त्या-अनुषंगिक काय-काय (स्वीकार्य-अस्वीकार्य) बदल होतात तेही तपासावे लागेल. थोडक्यात, हे काम अत्यंत किचकट व डोक्याचा भूगा करणारे आहे. त्यासाठीच्याच काय पण तत्सम कोणत्याही तंत्रज्ञानात मी तितकासा प्रगत नाही. पण,मनाची खात्री आहे कि आपण ते काम करु शकू. थोडा धीर धरावा. हे काम माझ्या डोक्यात आहेच.

--वि. नरसीकर (चर्चा) ११:४१, २२ डिसेंबर २०१६ (IST)

साच्यातील बदल[संपादन]

या साच्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत ज्यामुळे वर नमूद केले प्रश्न मिटले आहेत. जनगणना कोड साठी नवीन पॅरामीटर जोडला आहे. en:Template:Infobox settlement हा साचा फारच किचकट आहे त्यामुळे या जुन्या साच्यातच बदल केला आहे. आणखी काही बदल करावयाचा असल्यास कळवावे. --प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १९:५५, १० मार्च २०१७ (IST)